Home » करोडपतींचे गाव- हिवरे बाजार

करोडपतींचे गाव- हिवरे बाजार

केवळ 305 परिवारांचे असलेले गाव आणि त्यामधील 80 लोक ही करोडपती. ही अत्यंत हैराण करणारी गोष्ट आहे. मात्र हे खरं आहे.

by Team Gajawaja
0 comment
Richest village in India
Share

केवळ 305 परिवारांचे असलेले गाव आणि त्यामधील 80 लोक ही करोडपती. ही अत्यंत हैराण करणारी गोष्ट आहे. मात्र हे खरं आहे. या गावात एक मच्छर सुद्धा नाही. ऐवढेच नव्हे तर जो कोणी मच्छर शोधून काढेल त्याला 400 रुपयांचे बक्षीस ही दिले जाते. या गावात ना पाण्याची ना निसर्गाच्या सौंदर्याची कमतरता आहे. उन्हाळ्यात या गावाचे तापमान आसपासच्या गावापेक्षा 3-4 डिग्री कमीच असते. खरंतर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात येते. हिवरे बाजार असे या गावाचे नाव आहे. या गावाचे नशीब तेथील गावऱ्यांनी स्वत:च पालटले आहे. कारण 1990 मध्ये 90 टक्के लोक ही गरीब बोती. पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. सर्वत्र दुष्काळाची स्थिती असायची. मात्र आता गावाचे नशीब पालटले गेले आहे. (Richest village in India)

काही दशकांपूर्वी हिवरे बाजार सुद्धा अन्य गावांप्रमाणेच आनंदाने आयु्ष्य जगत होता. 1970 च्या दशकात हे गाव आपल्या हिंद केसरी पहलवानांसाठी प्रसिद्ध होते. मात्र परिस्थिती बिघडत गेली. या गावचे सरपंच पोपट राव यांनी असे म्हटले होते की, हिवरे बाजारात 80-90 च्या दशकात फार मोठा दुष्काळ पडला होता. पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. काही लोकांनी हे गाव सोडून पलायन केले. गावात एकूण 93 विहिरी होत्या. जलस्तर सुद्धा 82-100 फूटांवर पोहचला गेला होता. मात्र लोकांनी स्वत:चा जीव वाचवण्यास सुरुवात केली. 1990 मध्ये एक जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमेटी तयार करण्यात आली. या गावाअंतर्गत विहिरी खोदणे आणि झाडं लावण्याचे काम श्रमदानाच्या माध्यामातून सुरु करण्यात आले. या कामासाठी महाराष्ट्र एम्पॉलयमेंट गॅरेंन्टी स्किम अंतर्गत फंड मिळाला.त्यामुळे फार मोठा फायदा झाला. 1994-95 मध्ये आदर्श ग्राम योजना आली. त्यामुळे या कामाला अधिक वेग आला. त्यानंतर कमिटीने गावात त्या शेतीवर बंदी घातली ज्यामध्ये अधिक पाण्याची गरज भासणार होती. पोपट राव यांच्या मते गावात 340 विहिरी असतील.

गावात आता 305 परिवार असून बाराशेहून अधिक लोक राहतात. यापैकी 80 टक्के लोक ही करोडपती आहेत. पंन्नासपेक्षा अधिक परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 10 लाखांपेक्षा अधिक आहे. एका सर्वेक्षणाच्या मते 1995 मध्ये 180 पैकी 168 परिवार हे द्रारिद्र रेषेखाली होते. मात्र 1998 च्या सर्वेक्षणात ही आकडेवारी 53 वर पोहचली गेली. आता येथे केवळ दोन-तीन परिवाराच या श्रेणीतील असतील. (Richest village in India)

पोपट राव यांच्या मते गावात अशी स्थिती निर्माण झाली होती की, लोकाना परिवारासह घर सोडण्याची वेळ आली होती. हळूहळू 40 परिवार कामाच्या शोधात गाव सोडून गेले. मात्र एका काळानंतर येथील स्थिती बदललीगेली. जे सोडून गेले होते ते पुन्हा गावात आले.

हेही वाचा- Success Story: दलित समाजातील अरबपति- राजेश सरैया

यापूर्वी या गावात उस, ज्वारी याची शेती केली जायची. मात्र आता या शेतीवर बंदी घातली गेली आहे. येथे आता कांदा आणि बटाट्याची शेती केली जाते. यामधून गावकरी खुप कमावतात. गावातील लोक या शेतीसाठी पावसाची वाट पाहत बसत नाही. ते कमी पाण्यात सुद्धा याची शेती करतात.खरंतर हे गाव सात सुत्रांवर काम करते. जसे की, रस्त्यांवरील वृक्षतोड करु नये, परिवार नियोजन, नशाबंदी, श्रमदान, लोटा बंदी, प्रत्येक घरात टॉयलेट आणि ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.