Home » PAN Card च्या प्रत्येक क्रमांकामागे लपलीय तुमच्या बद्दलची माहिती

PAN Card च्या प्रत्येक क्रमांकामागे लपलीय तुमच्या बद्दलची माहिती

by Team Gajawaja
0 comment
PAN Card
Share

पॅन कार्डच्या (PAN Card) मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीबद्दलची बहुतांश माहिती मिळवू शकता. ते बँक ते नोकरी, पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणी कामी येते. पॅन कार्डला आयकर विभागाकडून जारी केले जाते. यावर परमनेंट अकाउंट क्रमांक असे म्हटले जाते. हे १० अंकांचे एक अल्फान्युमरेरिक क्रमांक असतो, ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती करुन घ्यायचे आहे. अशातच या अल्फान्युमरिक क्रमांकाचे खास अर्थ सुद्धा आहे. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

आयकर विभागाकडून एखाद्या व्यक्तीला त्याचे पॅन कार्ड देण्यासाठी एका खास प्रोसेसचा वापर करतात. त्यानुसार व्यक्तीला १० अंकी क्रमांक दिला जातो. दहा डिजिटल असणाऱ्या प्रत्येक पॅन कार्डवर क्रमांक आणि अक्षर असतात. यामधील पहिले पाच कॅरेक्टर हे नेहमीच अक्षर असतात आणि पुढील ४ हे क्रमांक असतात. तर अखेरीस एक अक्षर येते.

PAN Card च्या क्रमांकाचा अर्थ
पॅन कार्डवर आपण पाहिले की १० अंकी एक क्रमांक असतो. त्यामधील प्रत्येकाचा अर्थ हा वेगवेगळा असतो. आयकर विभागानुसार तुम्ही कोण आहात हे चौथ्या अक्षरावरुन कळते. तर P चा अर्थ इंडिविज्युअल असा होतो. अशा प्रकारे C- कंपनी, H- हिंदू अविभाजित, A- लोकांचा संघ, B- बॉडी ऑफ इंडिविज्युअल, T-ट्रस्ट,L- लोकल अथॉरिटी, F- फर्म, G- शासकीय एजेंसी आणि J- ज्युडिशियल असा होतो.

५ वे अक्षर सांगते तुमचे आडनाव
या व्यतिरिक्त पॅन कार्डवरील पाचवे अक्षर हे तुमच्या आडनावाचे पहिले अक्षर सांगते. जर तुमचे आडनाव शर्मा असेल तर पॅन क्रमांकावरील पाचवे अक्षर हे S असेल. या व्यतिरिक्त नॉन इंडिविजुअल पॅन कार्डधारकांसाठी पाचवे अक्षर त्यांच्या नावाचे पहिले अक्षर दर्शवते. तर पुढील ४ कॅरेक्टर हे 0001 ते 9990 च्या दरम्यान असू शकतात. त्याचसोबत शेवटी अक्षरच असते. (PAN Card)

हे देखील वाचा- जेव्हा जापान प्रिंट करायचा भारतीय चलन; छापलेल्या ५, १० आणि १०० च्या नोटा

दोन प्रकारचे असतात पॅन कार्ड
पॅन कार्ड हे दोन प्रकारचे असतात. भारतीय नागरिकांना ते बनवण्यासाठी फॉर्म 49A भरावा लागतो. तर परदेशी नागरिक सुद्धा पॅन कार्ड तयार करु शकतात. त्यासाठी त्यांना फॉर्म 49AA भरावा लागतो. कोणत्याही कंपनीच्या नावावर ट्रांजेक्शन करण्यासाठी वेगळे पॅन कार्ड तयार करावे लागते. त्याला सामान्य शब्दात बिझनेस पॅन कार्ड असे म्हटले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.