नो कॉस्ट ईएमआय म्हणजेच झिरो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI) आजच्या काळात सर्वाधिक प्रसिद्ध योजनेपैकी एक आहे. ई-कॉमर्स कंपन्याच नव्हे तर रिटेल स्टोर्स सुद्धा नो कॉस्ट ईएमआयचा ग्राहकांना ऑप्शन देत शॉपिंग करण्याची सुविधा देतात. याच्या मदतीने रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, मोबाईल फोन किंवा अन्य काही गोष्टी सुद्धा खरेदी करता येतात. म्हणजेच तुम्ही सामानावर कोणतेही व्याज किंवा प्रोसेसिंग फी देत नाही. परंतु तुम्ही जर असा विचार करत असाल नो कॉस्ट ईएमआयच्या माध्यमातून शॉपिंग केल्यास तुम्हाला सामानाच्या किंमतीव्यतिरिक्त कोणतेही पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही चुकीचे आहात. नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शनमध्ये काही लपवलेले चार्जेसचा समावेश असतो.
बहुतांश ई-कॉमर्स कंपन्या नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. खरंतर नो-कॉस्ट ईएमआय ही ऑफर पाहून ग्राहक सुद्धा ती गोष्ट खरेदी करण्यास उत्सुक होते. त्यांना असे वाटते की, खरेदी करण्याची हिच योग्य संधी आहे. त्यांना व्याजा शिवाय किंवा अधिक पैसे देण्याची गरज नसते. सामानाची किंमत आरामात काही महिन्यांमध्ये भरु शकतो. परंतु हाच विचार त्यांच्या खिशावर परिणाम करतो. खासकरुन त्या ग्राहकांना जे याबद्दल अधिक जाणून न घेता खरेदी करतात. विचार न करताच जर तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर शॉपिंग करत असाल तर तुम्हाला सामानाच्या मुळ किंमतीपेक्षा अधिक रक्कम भरावी लागू शकते.
नो-कॉस्ट ईएमआय
नो-कॉस्ट ईएमआय ही ऑफर बहुतांश कंपन्या फेस्टिव्हलच्या दरम्यान आणतात. अशातच तुम्ही एखाद्या सणावेळी मोबाईल फोन असो किंवा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि हा ऑप्शन निवडला तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तर तज्ञांच्या मते, ज्या गोष्टींवर ही सुविधा दिली जाते त्याची किंमत अधिक असू शकते. नो-कॉस्ट ईएमआयवर काही कंपन्या प्रोसेसिंग फी सुद्धा वसूल करु शकतात. या व्यतिरिक्त हे ऑप्शन देऊन खरेदी करण्यात आलेल्या सामानावर डिलिवरी शुल्क सुद्धा लावू शकतात. जर तुम्ही हा ऑप्शन न देता वस्तू खरेदी करत असाल तर हा शुल्क द्यावा लागणार नाही. (No Cost EMI)
हे देखील वाचा- UAN क्रमांक विसरला असाल तर ‘या’ पद्धतीने शोधून काढा
खरेदीपूर्वी करा हे का
जर तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर सामान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. नो-कॉस्ट ईएमआयवर कोणतेही सामान खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमतीबद्दल ते अन्य ई-कॉमर्स साइटवर सुद्धा त्याची किंमत जाणून घ्या. ई-कॉमर्स कंपनी अथवा स्टोर मधील नियम, अटी, प्रोसेसिंग फी अशा सर्व गोष्टी सुद्धा जाणून घ्या. हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की, या योजनेत तुमचे पैसे वाचत आहेत की नाही. अथवा सामान विक्री करण्यासाठी कंपनी केवळ नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन तुम्हाला देत आहेत.