Home » मीर जाफरच्या कारणास्तव इंग्रजांनी भारतावर केले शासन, प्रियंका गांधींनी असे का म्हटले?

मीर जाफरच्या कारणास्तव इंग्रजांनी भारतावर केले शासन, प्रियंका गांधींनी असे का म्हटले?

by Team Gajawaja
0 comment
Mir Jafar
Share

दिल्लीतील राजघाटावर संकल्प सत्याग्रहादरम्यान प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी असे म्हटले की, केंद्रातील मंत्री गांधी परिवाराचा अपमान करतात. माझ्या परिवाराने या देशाच्या लोकशाहीसाठी रक्त वाहिले आहे. शहीद वडिलांच्या मुलाला देशद्रोही असे म्हटले जात आहे. त्यांना मीर जाफर (Mir Jafar) असे म्हटले जात आहे. त्यांनी नेहमीच आमच्या परिवाराचा अपमान केला. संसदेत माझ्या भावाने पंतप्रधानांची गळाभेट करत त्यांना असे म्हटले होते की, मी तुमचा द्वेष करत नाही, पण केवळ आपली विचारसरणी वेगळी आहे आणि आमची विचारसरणी ही द्वेषाची नाही आहे.

अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, मीर जाफर नक्की कोण होता? इंग्रजांनी भारतावर जवळजवळ २०० वर्ष शासन केले. इतिहासात कधी असा गद्दार सुद्धा होता का ज्याच्यामुळे इंग्रजांनी भारताला गुलाब बनले. त्याचे नाव मीर जाफरच होते.

कोण होता मीर जाफर?
मीर जाफर हा असा व्यक्ती होता ज्याने बंगालचे नवाब सिराजुद्दोला फसवले. याच कारणास्तव ब्रिटिशांची गुलामगिरी झाली. तर मीर जाफर याचे नाव ऐवढे बदनाम झाले की, लोक आपल्या मुलाचे नाव मीर जाफर ठेवण्यासाठी सुद्धा घाबरायचे. अशा प्रकारची गद्दारी आणि ढोंगीपणाचे उदाहरण दिल्यास तर मीर जाफर याचे नाव घेतले जाते.

तर मिर्जा मुहम्मद सिराजुलद्दौलाला अखेरचा नवाब म्हटले जाते. आजोबांच्या मृत्यूनंतर त्याला बंगालची सत्ता मिळाली होती. सत्ता सांभाळताना त्याचे वय ३२ वर्ष होते. तो असा काळ होता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आपली पायमुळं भक्कम करण्याचा प्रयत्न करत होती. कमी वयात नवाब झाल्याने काही नातेवाईक नाराज झाले होते. पदवी सांभाळल्यानंतर काही वर्षांपासूनचे बंगालचे सेनापति राहिलेले मीर जाफर यांना हटवून मीर मदान यांना पद दिले गेले. यामुळेच मीर जाफर नाराज झाला. या नाराजीसाठी त्याने सुड घेण्याचा विचार केला.

भारतात आल्यानंतर इंग्रजांची नजर ही बंगालवर होती. मात्र त्यांच्या मार्गातील सर्वाधिक मोठा अडथळा होता नवाब सिरजुद्दौला. इंग्रजांना आपली योजना यशस्वी करण्यासाठी एक विरोधकाची गरज होती. इंग्रजी सैन्याचे सेनापति रॉर्ब क्लाइव यांनी काही गुप्तहेर बंगालमध्ये पाठवले. तेथे यावर तोडगा शोधावा असे ही सांगितले. गुप्तहेरांनी असे सांगितले की, मीर जाफर तुमच्या समस्येचे निवारण करु शकतो. अशा प्रकारे सुरु झाला होता सुडाचा प्रवास.

इंग्रजांनी एक प्लॅन तयार करत बंगालवर हल्ला केला. नवाब सिराजुद्दौलाच्या संपूर्ण फोजोचा वापर इंग्रजांचा सामना करण्यासाठी करु शकत नव्हते. कारण उत्तरेकडून अहमद शाह आणि पश्चिमेकडून मराठ्यांकडून धोका होता. त्यामुळे ते सै्याच्या एका हिस्स्याला घेऊन प्लासीला गेले.

युद्ध सुरु झाले आणि त्या दरम्यान सेनापति मीर मदान याचा मृत्यू झाला. नवाबने मीर जाफरला (Mir Jafar) पैगाम पाठवत सल्ला मागितला. मीरने असे म्हटले की, या वेळी युद्ध थांबवणे हाच एक पर्याय आहे. नवाबने मीर जाफरचे बोलणे ऐकून जे केले ते त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक मोठी चुक होती.

नवाबने युद्ध थांबवले. सैन्य कॅम्पच्या दिशेने जाऊ लागले होते. दुसऱ्या बाजूला मीर जाफरने (Mir Jafar) रॉबर्ट क्लाइवला याची माहिती दिली. याचा परिणाम असा झाला की, क्लाइवने पुन्हा एकदा हल्ला केला आणि सिराजचे सैन्य बिथरले गेले. सैन्याने एकत्रित येऊन ही युद्ध लढता आले नाही. अशातच क्लाइव युद्ध जिंकला आणि नवाबला युद्धाचे मैदान सोडून पळ काढावा लागला.

हे देखील वाचा- ‘सायमन गो बॅक’ म्हणणारे लाला लजपत राय

सत्तेची कमान इंग्रजांच्या हाती लागली आणि ठरवलेल्या प्लॅननुसार मीर जाफरला बंगालचा नवाब बनवण्यात आले. सिराजुद्दौला अधिक दिवस स्वातंत्र्यात राहू शकला नाही आणि त्याला नंतर इंग्रजांनी पकडले. त्याला मुर्शिदाबादला आणण्यात आले आणि मीर जाफरचा मुलगा मीर मीरनने त्यांना संपण्याचा हुकूम देत दिला. २ जुलै १७५७ ला नवाब सिराजुद्दौला फाशीची शिक्षा दिली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.