Home » मेटाकडून इंस्टाग्राम-फेसबुक युजर्ससाठी पेड वेरिफिकेशन सर्विस लॉन्च

मेटाकडून इंस्टाग्राम-फेसबुक युजर्ससाठी पेड वेरिफिकेशन सर्विस लॉन्च

by Team Gajawaja
0 comment
Meta Paid Verification Service
Share

ट्विटरनंतर आता मेटाने सुद्धा आपली पेड वेरिफिकेशन सर्विस लॉन्च केली आहे. ट्विटरचा वापर करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. त्यानंतर आता मेटाने पेड वेरिफिकेशन सुरु केले आहे. याबद्दलची घोषणा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे. कंपनीने या सर्विसला अमेरिकेत सुरु केले आहे. ही सर्विस फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या युजर्सला पेड वेरिफिकेशनची परवानगी देते. एलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी पेड वेरिफिकशन यापूर्वी सुरु केले होते. अशातच आता अन्य प्लॅटफॉर्म ही त्याच मार्गाने जात आहेत.(Meta Paid Verification Service)

मेटाला सब्सक्राइब केल्यानंतरच ही ब्लू टीक मिळणार आहे. या युजर्सला एक आयडी कार्ड आणि ९९० रुपये प्रति महिना असा शुल्क द्यावा लागणार आहे. युजर्सला अॅप्पल आयओएस आणि अॅन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मसाठी १२४० रुपये द्यावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप बद्दल मेटाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. अशातच व्हॉट्सअॅप युजर्सला सध्या त्रस्त होण्याची काहीच गरज नाही.

काही वर्षांपूर्वी तीन अॅप एकत्रित करत एक कंपनी तयार करण्यात आली होती. त्याचे नाव मेटा होते. आता मेटा कंपनीकडे व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकचे मालकी हक्क आहेत. म्हणजेच मेटा युजर्सला काही पैशांमध्ये काही अॅडवान्स फिचर्स देणार आहे. यासाठी कंपनी एक नवे प्रोडक्ट संघटना स्थापना करणार आहे. जी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर पेड फिचरवर काम करणार आहे.

कंपनी या सर्विस बद्दल गेल्या काही काळआपासून काम करत होती. अमेरिकेतील मार्केटपूर्वी ही सर्विस मेटाने ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये रोलआउट केली होती. यापूर्वी Snap च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Snapchat आणि मेसेंजिंग अॅप टेलिग्रामने सुद्धा आपली पेड सर्विस लॉन्च केली होती. यामुळे आता सोशल मीडिया कंपन्या रेवेन्यूचे अन्य दुसरे पर्याय शोधत आहे. सध्या कंपन्यांचा बहुतांश रेवेन्यू जाहीरातीमधून येतो.(Meta Paid Verification Service)

हे देखील वाचा- e-SIM कार्डचे फायदे आणि तोटे

फेसबुक आणि इंस्टग्रामच्या पेड सब्सक्रिप्शनसाठी कंपनीने काही गाइडलाइन्स ही तयार केल्या आहेत. युजर्सचे कमीत कमी वय १८ वर्ष असावे. सब्सक्रिप्शन घेण्यापूर्वी कंपनीला आपला फोटो आणि ईमेल आयडी सुद्धा द्यावा लागणार आहे. रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, एकादा वेरिफिकेशन झाल्यानंतर युजर्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नाव, प्रोफाइल नाव, जन्मतारीख अखिंवा फोटो तोपर्यंत बदलू शकत नाहीत जो पर्यंत वेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.