Home » देवी लक्ष्मी- गणपतीची मुर्ती खरेदी करताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

देवी लक्ष्मी- गणपतीची मुर्ती खरेदी करताना ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

by Team Gajawaja
0 comment
Laxmi-Ganpati Idol
Share

दिवाळी हा दिव्यांचा सण मानला जातो. दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे-उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीचा प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. या दरम्यान गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे फार महत्वाचे मानले जाते. दिवाळीची सुरुवात धनतेरसपासून होते. या दिवशी धनाची देवता कुबेरचा आणि आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा करण्यात येते. अशातच तुम्ही या देवांच्या मुर्त्या खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. (Laxmi-Ganpati Idol)

गणपतीची मुर्ती
जर गणपतीची मुर्ति खरेदी करणार असाल तर त्याची सोंड ही डाव्या बाजूला असावी. अशाच प्रकारे त्याच्या एका हातात मोदक आणि पायाच्या येथे उंदीर सुद्धा असावा.

त्याचसोबत गणपतीची पूजा ही कोणत्याही शुभ कामांवेळी केली जाते. गणपतीली मंगलमूर्ती असे सुद्धा म्हटले जातेच. पण एखाद्यावरील विघ्न दूर करण्यासाठी त्याला हाक मारली जाते त्यामुळे त्याला विघ्नहर्ता असे सुद्धा म्हटले जाते. तर गणपतीला बुद्धिचा देवता असे ही म्हणतात.

Laxmi-Ganpati Idol
Laxmi-Ganpati Idol

देवी लक्ष्मीची मुर्ती
देवी लक्ष्मीची मुर्ती खरेदी करताना सर्वात प्रथम त्या मुर्तीच्या रंगाकडे लक्ष द्या. गुलाबी रंगाची देवी लक्ष्मीची मुर्ती अधिक शुभ मानली जाते. त्याची खरेदी करताना या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या की, ती कमळावर किंवा हत्तीवर बसलेली असावी.तिच्या एका हातात कमळ तर दुसऱ्या हातातून धनाचा आशीर्वाद देत असलेली असावी. तिच्या पायाजवळ जर घुबड असेल तर अधिक शुभ मानले जाते.

तर देवी लक्ष्मी ही भगवान विष्णू यांच्या पत्नी आहे. पार्वती आणि सरस्वतीसह देवी लक्ष्मी सुद्धा त्रिदेवीपैंकी एक आहे. धन, संपदा, शांती आणि समृद्धीचे प्रतिक म्हणून ती ओळखली जाते. दिवाळीदरम्यान, देवी लक्ष्मीची गणपती सोबत पूजा करण्यात येते. याचा उल्लेख सर्वात प्रथम ऋग्वेदाच्या श्री सूक्त मध्ये मिळतो. (Laxmi-Ganpati Idol)

हे देखील वाचा- दिवाळीच्या दिवशी कुठे आणि कशी काढाल रांगोळी, जाणून घ्या वास्तू संदर्भातील नियम

अन्य महत्वाच्या गोष्टी
गणपतीची मुर्ती आणि देवी लक्ष्मीची मुर्ती एकत्रित असेल असा फोटो खरेदी करु नका. काळ्या रंगाची गणपतीची किंवा लक्ष्मीची मुर्ती खरेदी करुन नका. त्याचसोबत या मुर्त्यांना एखाद्या ठिकाणाहून तडा गेला असेल तरीही ती खरेदी करु नका. प्लास्टिक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची मुर्ती सुद्धा कधीच खरेदी करु नका. माती किंवा धातुपासून तयार करण्यात आलेली मुर्ती खरेदी करणे उत्तम मानले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.