Home » श्रीमंत लोक आर्ट वर्क,पेटिंग्स खरेदी करणे का पसंद करतात?

श्रीमंत लोक आर्ट वर्क,पेटिंग्स खरेदी करणे का पसंद करतात?

बहुतांश श्रीमंत लोक जेव्हा शॉपिंग करण्यासाठी जातात तेव्हा खासकरुन आर्टवर्क, घड्याळ आणि ज्वेलरी सारख्या वस्तू खरेदी करतात.

by Team Gajawaja
0 comment
Knight Frank Index
Share

सामान्य कमाई करणारी लोक जेव्हा बाजारात जातात तेव्हा घरात लागणाऱ्या गोष्टीं खरेदी केली जाते. यामध्ये ग्रॉसरी, कपड्यांसह अन्य काही गोष्टींचा समावेश असतो. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, बहुतांश श्रीमंत लोक जेव्हा शॉपिंगसाठी जातात तेव्हा काय-काय खरेदी करतात? (Knight Frank Index)

बहुतांश श्रीमंत लोक जेव्हा शॉपिंग करण्यासाठी जातात तेव्हा खासकरुन आर्टवर्क, घड्याळ आणि ज्वेलरी सारख्या वस्तू खरेदी करतात. नाइट फ्रँक लक्झरी इंवेस्टमेंटच्या नव्या रिपोर्ट्सनुसार, बहुतांश लोक जेव्हा शॉपिंग करण्यासाठी जातात तेव्हा सुद्धा त्यांची खरेदी गुंतवणूकीच्या उद्देशाने असते. यामुळे ती लोक अशा गोष्टी खरेदी करतात ज्याची वॅल्यू वेळेसह कमी होण्याऐवजी वाढली जाते. रिपोर्ट्सनुसार, जगभरातील अस्ट्रा रिच म्हणजेच मोठ्या उद्योजकांची पहिली पसंदी आर्टवर्कला असते.

रिपोर्टमध्ये असे सुद्धा सांगण्यात आले आहे की, २०२३ मध्ये ५३ टक्के हाय नेटवर्थ इंडिविज्युअलने सर्वाधिक पैसे घड्याळ, ज्वेलरी आणि हँन्डबॅग्स सारख्या सामानांची खरेदी करतात. नाइड फ्रँन्कच्या या रिपोर्टनुसार, अल्ट्रा रिच लोकांना अशा गोष्टी खरेदी करण्याची आवड असते ज्याची किंमत वाढण्याची शक्यता अशते. त्याचसोबत आर्टवर्कच्या एकूणच किंमतीत ३० आणि घड्याळ व ज्वेलरीच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असते.

अत्यंत श्रीमंत लोक अशा सुद्धा काही गोष्टी खरेदी करतात ज्यांची किंमत वाढत नाही मात्र त्यांचे शौक पूर्ण होतात. रिपोर्टनुसार, अल्ट्रा रिच लोक क्लासिक कार आणि वाइनवर सुद्धा खर्च करतात. याचे कारण क्लासिक कार आणि महागड्या वाइन क्षेत्रात सुद्धा मागणी वाढली गेल्याचे दिसून आले आहे. त्याचसोबत पॅशन इन्वेस्टमेंट सुद्धा करतात. सोप्या भाषेत बोलायचे झाल्यास तर अशा गोष्टी जमा करतात जे त्यांच्या पॅशनला नफ्यात कंन्वर्ट करतील. यामुळे एकतर त्यांचा शौक पूर्ण होतो आणि दुसरे म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा होते. जेणेकरुन त्यांच्या रक्कमेत वाढ होते. (Knight Frank Index)

हेही वाचा- टायटॅनिकपेक्षा पाच पटींनी विशाल असणाऱ्या ‘या’ क्रुजची खासियत माहितेय का?

नाइट फ्रँन्क इंडियाच्या अध्यक्षांच्या मते, भारत सुद्धा या मध्ये पुढे आहे. श्रीमंत भारतीयांनी सुद्धा २०२३ मध्ये आर्टवर्क, घड्याळ आणि लक्झरी हँन्डबॅग्स सारख्या गोष्टी खरेदी करण्यासाठी खुप खर्च केला आङे. भारतात सुद्धा आता अल्ट्रा रिच लोक गुंतवणूकीतून प्रेरित होत शॉपिंग करु लागले आङेत. ते पारंपरिक गुंतवणूकीच्या ऑप्शनपेक्षा वेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करणे पसंद करत आहेत. यामुळे भारतातील श्रीमंतासाठी गुंतवणूकीचे नवे मार्ग खुले झाले आहेत.

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.