Home » राहुल गांधींची तुलना जयचंद यांच्यासोबत का केली जातेय? कोण होते ते?

राहुल गांधींची तुलना जयचंद यांच्यासोबत का केली जातेय? कोण होते ते?

by Team Gajawaja
0 comment
Jaychand Rathod
Share

अरुणाचल प्रदेशातील तवांग मध्ये भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापाटीवरुन राजकरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी असे म्हटले की, चीनने आपल्या जमीनीवर ताबा मिळवला आहे. चीन आपल्या जवानांना मारहाण करत आहे. युद्धाची तयारी केली जात आहे आणि भारत सरकार मात्र झोपले आहे. अशातच आता भाजपचे प्रवक्ता गौरव भाटिया यांनी राहुल गांधीवर निशाणा साधत त्यांची तुलना जयचंद (Jaychand Rathod) यांच्यासोबत केली आहे.

गौरव भाटिया यांनी असे म्हटले की, भारतातील सैन्यातील प्रत्येक जण हा भारतीयांसाठी गौरवशाली आहे. आपले जवान आपली ताकद दाखवत आहेत. मात्र भारतातील जयचंद राहुल गांधी सैन्याचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रश्न उपस्थितीत राहतो की, नक्की जयचंद आहेत कोण आणि त्यांची तुलना राहुल गांधींसोबत का केली जात आहे?

कोण होते जयचंद?
त्यांचे संपूर्ण नाव जयचंद राठोड होते. ते उत्तर भारतातील गाहडवाल वंशातील कन्नौज साम्राज्याचे शासक होते. राजा जयचंद यांच्यासंदर्भात काही कथा आहेत. त्यापैकी त्यांनी देशद्रोही आणि गद्दार असल्याचे म्हटले गेले आहे. तर काहींनी त्यांना उत्तम शासक मानले. बीबीसीच्या रिपोर्ट्नुसार, ११९२ च्या तराइन युद्धात भारताचा इतिहास बदलला गेला. त्या वेळी मुहम्मद गोरी एक लाख २० हजार सैनिकांसह भारतात आगेकुच करत होता. त्याच्या सैन्यात भरपूर घोडेस्वार आणि १० हजार घोडेस्वारांसह तीरबाजी करणारे होते. त्याचे लक्ष्य भारतावर ताबा मिळवण्याचे होते.

जयचंद यांनी हात मागे केले
इतिहासकार सतीश चंद्र यांच्या मते, त्यांच्या निशाण्यावर पृथ्वीराज चौहान होते. जेव्हा पृथ्वीराज चौहान यांना गोरीच्या सैन्याकडून युद्धात त्यांना निशाण्यावर ठेवण्यात आल्याचे कळले तेव्हा त्यांनी काही धोके पाहून काही राजांकडे मदत मागितली. त्या सर्व राजांनी त्यांची मदत केली पण राजा जयचंद याने हात मागे केले.(Jaychand Rathod)

ते असे लिहितात की, यामागील कारण पृथ्वीराज चौहान यांचा विवाह संयोगिता सोबत लग्न करणे नव्हे तर जुना वाद होता. त्यामुळेच जयचंद यांनी त्यांची मदत करण्यास नकार देण्याचा निर्णय घेतला होता. परिणाम असा झाला की, पृथ्वीराज आणि मोहम्मद गोरी यांच्या सैन्यात युद्ध सुरु झाले. भारतीय सैन्य भले संख्येने अधिक होती पण नेतृत्वात मोहम्मद गोरी याचे सैन्य काही पटींनी अधिक पुढे होते. अशा युद्धात मोठ्या संख्येने भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. युद्धात पृथ्वीराज हे बचावले पण सिरसाजवळ पकडले गेले. तुर्की सैनिकांनी त्यांच्या काही गडांवर ताबा मिळवला आणि नंतर अजमेरवर सुद्धा आपला झेंडा फडकवला. काही काळाने कथित षडयंत्र करुन पृथ्वीराज यांची हत्या केली गेली.

हे देखील वाचा- होमी भाभांचा अपघात झाला नसता तर भारताकडे असती हजारो परमाणू हत्यारे

जेव्हा जयचंद यांनी श्वास सोडला
तइरानच्या युद्धानंतर मोहम्मद गोरी कुतुबुद्दीन ऐबक सारख्या सरदारांच्या हवाली दिल्ली सोडून परतला. ११९४ मध्ये मोहम्मद गोरी पुन्हा आला. त्याचे युद्धा यावेळी जयचंद यांच्यासोबत होते. युद्ध जिंकण्याच्या अखेरच्या टप्प्यात पोहचलेल्या जयचंद यांना अचानक एक तीर लागला आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.