Home » न्याय देवता म्हणून ‘गोलू देवता’ प्रसिद्ध

न्याय देवता म्हणून ‘गोलू देवता’ प्रसिद्ध

by Team Gajawaja
0 comment
Golu Devta
Share

उत्तराखंड या राज्याला देवांची भूमी म्हटली जाते. येथे भगवान शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यातील केदारधाम, जागेश्वर धाम, गोपीनाथ मंदिर, विश्वनाथ मंदिर, टपकेश्वर महादेव मंदिर, दक्षेश्वर महादेव मंदिर, बाबा बागनाथ मंदिर अशी अनेक प्रसिद्ध भगवान शंकाराची मंदिरे उत्तराखंडमध्ये आहेत. समस्त उत्तराखंड हा भगवान शंकराचे वास्तव्याचे स्थान म्हणूनही ओळखला जातो.  माता सितेचीही येथे अनेक मंदिरे आहेत. मात्र या प्रचलित मंदिरांसोबत अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे भगवान शिवाची अन्य रुपात पूजा केली जाते. 

उत्तराखंडामधील कुमाऊनी समुदायात गोलू देवता (Golu Devta) प्रसिद्ध आहे. ही गोलू देवता न्याय देवता म्हणून पुजण्यात येते. या गोलू देवाच्या मंदिरात भक्तांनी आपल्या इच्छा व्यक्त करुन देवाकडे मागणी मागायची असते,  ती मागणी पूर्ण झाल्यावर भक्त आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला घंटा वाहतात. अशा लाखो घंटा या गोलू महाराज मंदिरात (Golu Devta) लावण्यात आल्या आहेत. चिताई गोलू देवता मंदिर आणि , घोरखल मंदिर ही गोलू देवाची प्रसिद्ध मंदिरे आहेत.  हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहेत. अल्मोडा येथील बिनसार वन्यजीव अभयारण्यापासून जवळ असलेल्या या मंदिरात अनेक भाविकांची गर्दी असते.  आता चालू झालेला अधिक महिना आणि त्यानंतर येणारा श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी वाढती राहणार आहे.  उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल भागातील अनेक गावांमध्ये गोलू देवता (Golu Devta) ही प्रमुख देवता म्हणून पूजली जाते.  कुळ देवता म्हणून या देवाची पूजा होते.  गोलू देवतेला तूप, दूध, दही, हलवा, पुरी आणि पांढरे वस्त्र, पांढरा फेटा आणि पांढरी शाल अर्पण केली जाते.

या भागात गोलू देवतेबाबत (Golu Devta) एक कथा सांगण्यात येते. कात्यु वंशातील राज झालराय याचा मुलाग म्हणजे गोलू देवता.  राजा झालराय हा निपुत्रिक होता.  त्याला सात राण्या होत्या. काशीच्या सिद्धबाबांनी राजाला आठवे लग्न करण्याचा सल्ला दिला. राजाने आठवा विवाह कलिंका या तरुणी सोबत केला.  लवकरच ही आठवी कलिंका राणी गरोदर राहिली.  पण याचा सातही राण्यांना राग आला.  या राणीला मुलगा झाल्यास राजा त्यालाच राज्याचा उत्तराधिकारी करेल, म्हणून अन्य राण्यांनी कालिका राणीला बाळा झाल्यावर त्याच्याजागी दगड ठेवला आणि राणीला झालेला मुलगा काली नदीत फेकून दिला.  मात्र या लहान बाळाला भाना नावाच्या मच्छिमाराने पाहिले.  त्यानं या मुलाला मोठं केलं.  हा मुलगा पुढे खूप पराक्रमी झाला.  त्याला घोड्यावरुन फिरण्याची आवड होती.  पण मच्छिमार गरीब असल्यामुळे त्यानं या मुलाला लाकडाचा घोडा करुन दिला.  हा मुलगा आधी सर्व घोड्याला देत असे, आणि मग स्वतः खात असे.  या मुलाचा पराक्रम आणि त्याची घोड्याबाबतची आवड राजाच्या कानावर गेली. तेव्हा त्याला हा आपलाच मुलगा असल्याचे समजले. राणी कालिंका आणि तिच्या मुलाला न्याय मिळाला.  हाच गोलू महाराज (Golu Devta) म्हणून प्रसिद्ध झाला. या राजानं आपले घोड्याप्रती असणारे प्रेम कायम ठेवले. राजा झाल्यावर गोलू महाराज घोड्यावर स्वार होऊन राज्यात सर्वत्र फिरत असत आणि कोणाची काही तक्रार असल्यास लगेच न्यायनिवाडा करत असत. म्हणून त्यांची ओळख न्यायदेवता म्हणून झाली.  

======

हे देखील वाचा : भारतातील दुसरे सर्वात मोठे सूर्य मंदिर

=====

या गोलू देवाच्या (Golu Devta) मंदिरांमध्ये घंटांची मोठी माळच दिसते.  त्यापैकी, घोरखळ मंदिर तर पूर्णपणे घंटांनी भरलेले आहे.  येथे भाविक आपला नवस कागदावर लिहून देवाच्या चरणी ठेवतात.  हा नवस पूर्ण झाल्यावर देवाला घंटा अर्पण करण्यात येते.  नवविवाहित जोडपेही येथे देवाला घंटा देतात. गोलू देवता हा गौरभैरव म्हणजेच भगवान शिवाचा अवतार मानला जातो. भगवान शिवाची अनेक रुपे आहेत, त्यापैकीच एक रुप म्हणून गोलू देवाची (Golu Devta) पूजा करण्यात येते. आजही या भागात गोलू देवता (Golu Devta) पांढ-या घोड्यावरुन फिरतात, अशी धारणा आहे. या गावांत जागर नावाचा उत्सव केला जातो. त्यावेळी “जय न्याय देवता गोलजू तुम जय हो. सबुक लिजे दिन है” असे बोलून गोलू देवतेची पूजा करतात. कुमाऊं गावांमध्ये गोलू देवतेची अनेक मंदिरे आहेत.  त्यात चितई, चंपावत, घोराखल, चामरखान अशी मंदिरे प्रसिद्ध आहेत.  मंदिरे अनेक असली तरी गोलूदेवाची एकाच पद्धतीनं, घंटा अर्पण करुन पुजा केली जाते.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.