Home » ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातुन खोटा प्रचार – शरद पवार

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातुन खोटा प्रचार – शरद पवार

by Team Gajawaja
0 comment
शरद पवार
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर (The Kashmir File) केलेल्या वक्तव्यावरून भाजप (BJP) आणि आम आदमी (AAP) पार्टीमध्ये शब्दयुद्ध सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.

काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाबद्दल खोटे पसरवून देशात “विषारी वातावरण” निर्माण केल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. आपल्या पक्षाच्या दिल्ली युनिटच्या अल्पसंख्याक विभागाच्या अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार म्हणाले, “अशा चित्रपटाला प्रदर्शनासाठी मंजुरी मिळायला नको होती.

मात्र त्यात करसवलत दिली जात असून देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा चित्रपट लोकांना भडकवण्याचे काम करतो, ज्याला प्रोत्साहन दिले जात आहे.”

Pawar card in play to head UPA- The New Indian Express

====

हे देखील वाचा: बॉलिवूड कोरिओग्राफर गणेश आचार्यवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोप दाखल

====

यापूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनवरून काँग्रेसनेही भाजपवर हल्लाबोल केला होता. काँग्रेस पक्षाच्या संपर्क विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार चित्रपटाच्या माध्यमातून समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. शरद पवार म्हणाले की, काश्मिरी पंडितांना खरे तर खोऱ्यातून पलायन करावे लागले, पण मुस्लिमांनाही त्याच पद्धतीने लक्ष्य करण्यात आले.

पवार म्हणाले, “काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांना पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जबाबदार आहेत. नरेंद्र मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असेल, तर त्यांनी त्यांच्या पुनर्वसनासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत आणि अल्पसंख्याकांविरुद्ध लोकांमध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीत शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. जवाहरलाल नेहरूंना काश्मीरच्या चर्चेत ओढत असल्याची टीकाही शरद पवार यांनी भाजपवर केली.

खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले तेव्हा व्हीपी सिंह हेच पंतप्रधान होते आणि त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता, असा युक्तिवाद त्यांनी केला.

शरद पवार म्हणाले, व्हीपी सिंह सरकारला भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद हे गृहमंत्री होते आणि जगमोहन, ज्यांनी नंतर दिल्लीतून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली, ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते.”

How The Kashmir Files has caught our bleeding-heart liberals off guard and  their lies exposed

====

हे देखील वाचा: कपिल शर्माच्या ‘शो’वर जाॅन अब्राहमने केल मोठं वक्तव्य, म्हणाला…

====

ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जगमोहन यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला होता आणि राज्यपालांनीच काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून पळून जाण्यास मदत केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.