Child care in summer : उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना शाळेत पाठवणे मुश्किल होऊ शकते. मुलांच्या त्वचेसह आरोग्य सेंसिटिव्ह असल्याने काही पालक अशा चूका करतात ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शको. खरंतर, एप्रिल महिन्यात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण या महिन्यापासून उन्हाळा अधिक वाढला जातो. यामुळे शरिरात पाण्याची कमतरता, त्वचेवर खाज येणे किंवा जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात. पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. याबद्दलच अधिक सविस्तर जाणून घेऊया…..
खाण्यापिण्याकडे लक्ष न देणे
तुमचे मुल पहिल्यांदाच शाळेत जात असल्यास त्याच्या खाण्यापिण्याकडे पालकांनी आवर्जुन लक्ष दिले पाहिजे. मुलांना डब्यामध्ये मसालेदार पदार्थ किंवा पराठे देण्याची चूक करू नये. उन्हाळ्यात मुलांमध्ये अॅसिडिटी, पोट दुखी, पोटासंबंधित आजार उद्भवू शकतात. पालकांच्या या चुकांमुळे मुलांना उलटी होण्याचीही समस्या उद्भवू शकते.
उन्हाळ्यात पचनास जड असणाऱ्या पदार्थांमुळे मुलांना त्रास होऊ शकतो. यामुळे मुलांना पचण्यास हलके असे पदार्थ द्यावेत. याशिवाय ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अत्याधिक आहे अशी फळ देखील खाण्यास द्यावीत.
मुलांच्या स्वच्छतेची काळजी
काही पालक मुलांना त्यांचे शाळेचे ड्रेस सातत्याने दोन ते तीन दिवस परिधान करण्यास सांगतात. यामुळे घाम आणि अस्वच्छतेमुळे त्वचेवर इंफेक्शन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पालकांच्या या आशळीपणाचा त्रास मुलांना होऊ शकतो. मुलांचा गणवेश नेहमीच स्वच्छ असावा. याशिवाय मुलांना तुळस किंवा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ घालावी.
सॉक्स न बदलणे
काही पालक मुलांचे सॉक्स एक-दोन दिवस झाले तरीही त्यांना तेच घालण्यास सांगतात. यामुळे मुलांच्या पायांच्या बोटांना इंफेक्शन होण्याची शक्यता वाढली जाते. कारण घाम आणि अस्वच्छतेमुळे पायांच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. यामुळे असे करण्यापासून पालकांनी दूर रहावे. (Child care in summer)
रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठणे
आजकाल मुल मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात अत्याधिक वेळ घालवतात. यामुळे पालकांना मुल शांत राहतेय असे वाटते. पण याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. झोपेची वेळ बदलली जाते. सकाळी शाळा लवकर असल्यास त्यांना रात्री उशिरा झोपल्यानंतर उठवल्यास झोपही पूर्ण होत नाही. मुलांना पुरेशी झोप मिळणे अत्यावश्यक आहे. यामुळे पालकांनी या गोष्टीकडेही लक्ष दिले पाहिजे.