Home » चंद्रयान-3 च्या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या रितु कारिधाल यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

चंद्रयान-3 च्या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या रितु कारिधाल यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

by Team Gajawaja
0 comment
Chandrayaan-3 Mission
Share

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन म्हणजेच इस्रोने आपले महत्त्वाकांक्षी चंद्रयान मिशन-३ हे १४ जुलै रोजी लॉन्च केले. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे उड्डाण झाले. हे यान आता येत्या २३ किंवा २४ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रावर चंद्रयान उरतवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितु कारिधाल यांना दिली गेली आहे. (Chandrayaan-3 Mission)

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ मधील रितु कारिधाल यांना ‘रॉकेट वुमन ऑफ इंडिया’म्हणून ओळखले जाते. अंतराळ क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या रितु यांना चंद्रयान-३ मिशनचे डायरेक्टर बनवले आहे. यापूर्वी त्या चंद्रयान-२ सह काही मोठ्या अंतराळ मिशन मध्ये सुद्धा होत्या. खास गोष्ट अशी की, रितु कारिधाल त्या वैज्ञानिकांपैकी एक आहे ज्यांनी इस्रोचा युवा वैज्ञानिक पुरस्कार जिंकला होता.

रितु कारिधाल मूळच्या लखनौ मधील आहेत. त्यांचे निवासस्थान राजाजीपुरम मध्ये आहे. रितु यांनी सुरुवातीचे शिक्षण लखनौ मधील सेंट एग्गनिस स्कूल मधून केले. त्यानंतर त्यांनी नवयुग कन्या विद्यालयातून शिक्षण घेतले. लखनौ युनिव्हर्सिटीत भौतिकी मधून एमएससी केल्यानंतर त्यांनी एयरोस्पेस इंजिनिअरिंग मधून एमटेक करण्यासाठी इंस्टीट्युज ऑफ सायन्स बँगलोर मध्ये प्रवेश घेतला.

MTech केल्यानंतर रितु कारिधाल यांनी पीएचडी करण्यास सुरुवात केली होत. एका कॉलेजमध्ये पार्ट टाइम प्रोफेसर म्हणून त्या शिकवू लागल्या होत्या. स्टारसनच्या रिपोर्टनुसार याच दरम्यान १९९७ मध्ये त्यांनी इस्रोत नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यांची नियुक्ती झाली. समस्या अशी होती की, नोकरीसाठी त्यांना पीएचडीचे शिक्षण सोडावे लागणार होते. मात्र त्यासाठी त्या तयार नव्हत्या. ज्या प्रोफेसर मनीषा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत होत्या. पण जेव्हा त्यांना रितु यांच्या इस्रोच्या नोकरी बद्दल कळले तेव्हा त्यांनी रितु यांना इस्रोत नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

रितु कारिधाल यांची पहिली पोस्टिंग यू आर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये होती. त्यांच्या कामामुळे सर्वजण आनंदित होते. २०७ मध्ये त्यांना इस्रोच्या युवा वैज्ञानिकाचा पुरस्कार मिळाला. हा तो काळ होता जेव्हा मंगलायन मिशनचे काम सुरु होणार होते. एका मुलाखतीत रितु कारिधल यांनी असे सांगितले होते की, अचानक मला सांगण्यात आले होते मंगलायन मिशनच्या तुम्ही हिस्सा असणार आहात. ते माझ्यासाठी शॉकिंग होते, पण आनंद ही खुप झाला होता. कारण हा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. (Chandrayaan-3 Mission)

दरम्यान, रितु कारिधल या चंद्रयान-२ मिशनच्या सुद्धा डायरेक्टर होत्या. त्यांचा अनुभव पाहता २०२० मध्ये इस्रोने ठरविले की, त्यांच्याकडे मिशन-३ सुद्धा द्यायचे. मिशनचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी वीरामुथुवेल आहेत. या व्यतिरिक्त चंद्रयान-३ मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर असलेल्या एम वनिता यांना या मिशनमध्ये डेप्युटी डायरेक्टरची जबाबदारी दिली गेली आहे. ज्या पेलॉड, डाटा मॅनेजमेंटचे काम सांभाळत आहेत.

हेही वाचा- Success Story: पद्म भूषण पुरस्काराने गौरवलेल्या सत्य नडेला यांच्या आयुष्याचा प्रवास

रितु आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय हे आपल्या परिवाराला देतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते त्यांच्या परिवाराला माहितेय की, त्यांच्यासाठी मिशन हे किती महत्त्वाचे आहेत. ते प्रत्येक मदतीने माझी मदत करतात, त्यामुळे मला त्यांची अधिक चिंता करावी लागत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.