Home » ISRO अंतराळयानाच्या उड्डाणासाठी ‘या’ कारणास्तव निवडते श्रीहरिकोटा

ISRO अंतराळयानाच्या उड्डाणासाठी ‘या’ कारणास्तव निवडते श्रीहरिकोटा

चंद्रयान- 3 मिशन 14 जुलैला लॉन्च झाले. याचे अपडेट सातत्याने इस्रोकडून दिले जात आहे. अंतराळयान हे यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने पुढे जात आहे.

by Team Gajawaja
0 comment
Chandrayaan-3
Share

चंद्रयान- 3 मिशन 14 जुलैला लॉन्च झाले. याचे अपडेट सातत्याने इस्रोकडून दिले जात आहे. अंतराळयान हे यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने पुढे जात आहे. मात्र इस्रोचे प्रत्येक मिशन श्रीहरिकोटा येथूनच का होतात? याची काय नेमकी खासियत आहे याच बद्दल सविस्तर जाणून घेऊयात. (Chandrayaan-3)

1971 मध्ये सुरु करण्यात आले अंतराळस्टेशन
भारतातील उपग्रह आणि स्पेस क्राफ्ट सतीश धवन अंतराळ केंद्राच्या येथून लॉन्च केले जातात. खरंतर हे केंद्र 1971 मध्ये सुरु करण्यात आले होते. तेव्हा आरएच-125 साउंड रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. याआधी श्रीहरिकोटा अंतराळ केंद्राला रेंज असे म्हटले जाते. 5 सप्टेंबर 2002 मध्ये इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांच्या सन्मानार्थ SHAR चे नाव सतीश धवन अंतराळ केंद्र असे ठेवले गेले.

तर भारतीय वैज्ञानिकांना अंतराळ संशोधनात एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. यामुळेच त्यांना स्वत:चे एक अंतराळ केंद्र हवे असे वाटत होते. यासाठी ते योग्य ठिकाण ही शोधत होते. तेव्हा विक्रम साराभाई यांनी एक उपयुक्त असे अंतराळ स्टेशन शोधून काढण्याच्या मोहिमेत नेतृत्व केले.

Chandrayaan-3

Chandrayaan-3

 

श्रीहरिकोटाच का निवडले गेले?
भारतीय अंतराळ केंद्राच्या स्थापनेसाठी श्रीहरिकोटा निवडण्यात आले. यामागे दोन मुख्य कारणे होती. एक म्हणजे श्रीहरिकोटा भारताच्या पूर्व भागात आहे. येथून स्पेस क्राफ्टचे उड्डाण करणे शक्य आहे. खरंतर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वेगाने फिरते. त्यामुळेच याच गतिचा फायदा घेत रॉकेट श्रीहरिकोटा येथून पूर्वेकडून जाऊ शकते.

तसेच श्रीहरिकोटा विषुववृत्ताजवळ आहे. येथे पृथ्वीची गती सर्वाधिक असते. तर श्रीहरिकोटा एका तटावर आहे. याच्या पूर्व-दक्षिण दिशेला बंगालचा विशालकाय समुद्र आहे. अशातट एखाद्या दुर्घटनेच्या स्थइतीत अंतराळ यानाचे अवशेष समुद्रात पडले तर ते सुरक्षित ठरु शकते. त्याचसोबत स्थानिक वस्ती सुद्धा यापासून दूरवर राहते.

समुद्र तटाजवळ अंतराळ केंद्र
उपग्रहांच्या प्रेक्षपणासाठी श्रीहरिकोटा निवडण्याचे कारण असे की, भौगोलिक स्थिती. श्रीहरिकोटा समुद्र तटावर आहे. जहाजाचा मार्ग हा पूर्णपणे समुद्रातूनच जातो. यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय मिशन यशस्वी होण्याची शक्यता वाढते. (Chandrayaan-3)

हेही वाचा- चंद्रयान-3 च्या मोहिमेची जबाबदारी असणाऱ्या रितु कारिधाल यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

सतीश धवन कोण होते?
सतीश धवन यांचा जन्म श्रीनगर मध्ये झाला होता. ते भारतातील प्रसिद्ध रॉकेट वैज्ञानिक होते. त्यांना प्रायोगिक द्रव गतिशीलता संशोधनाचे जनक म्हटले जाते. त्यांच्या कार्यकाळात देशाने अंतराळ संशोधनात लक्षणीय कामगिरी केली. त्यांच्या कठोर मेहनतीमुळे इस्रोने दूरसंचार उपग्रह, भारतीय रिमोट सेंसिंग सॅटेलाइट, पीएसएलवी-ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनासारख्या विविध उपग्रहांची निर्मिती केली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.