Bollywood : सध्या रणदीप हुड्डा स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात रणदीप हुड्डाने विनायक दामोदर सावकरांची भुमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहितेय का, रणदीप हुड्डाआधी अन्नू कपूर यांनी सावकरांची भुमिका साकारली होती.
वर्ष 1996 मध्ये प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘कालापानी’ प्रदर्शित झाला होता. यामध्ये मोहनलाल, अमरीश पुरी, तब्बू आणि अन्नू कूपर सारखे कलाकार झळकले होते. सिनेमात अन्नू कपूर यांनी विनायक दामोदर सावरकर यांची भुमिका साकारली होती.
अन्नू कपूर यांनी एका मुलाखतीत वीर सावरकरांच्या भुमिकेबद्दल सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, जेव्हा मात्रभूमीबद्दस बोलले जाते त्यावेळी मला फार गर्व होतो. याशिवाय सिनेमा तयार करण्यादरम्यान मी पोर्ट ब्लेअरच्या सेलुलर तुरुंगातही गेलो होतो. तेथे जाणे म्हणजे एखाद्या तीर्थयात्रेला जाण्यासारखे असल्याचे अन्नू कपूर यांनी म्हटले होते. (Bollywood)
सिनेमासाठी पैसे घेतले नव्हते
अन्नू कपूर यांनी सिनेमासाठी पैसे घेतले नव्हते. खरंतर ती एक खासगी गोष्ट होती. मी फ्री मध्ये काम करणार असल्याचा निर्णय माझा होता आणि याबद्दल अधिक स्पष्टीकरण देऊ शकत नाही. भले मी पैसे न घेता काम केले होते. खरंतर, कालापानीसाठी ते नव्हते. जर एखाद्याला उत्तम कामासाठी विचारले असता तो देखील असेच करू शकतो. केवळ केलेल्या कामाचा काहीतरी अर्थ असावा असे मला वाटत असल्याचेही अन्नू कपूर यांनी म्हटले.
रणदीपचा स्वातंत्र्य वीर सावकर सिनेमा येत्या 22 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अंकिता लोखंडे मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर लाँच करण्यात आला होता.