Home » कुठून आणि कशी केली जाते BBC ला फंडिंग?

कुठून आणि कशी केली जाते BBC ला फंडिंग?

by Team Gajawaja
0 comment
BBC
Share

ब्रिटेन मधील प्रसार माध्यम कंपनी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. ईडीने नुकत्याच बीबीसी इंडियाच्या विरोधात परदेशी फंडिगमध्ये अनियमितता असल्याचा आरोपात FEMA अंतर्गत खटला दाखल केला आहे. हे पहिल्यांदा असे होत नाही आहे की, जेव्हा बीबीसीवर अशा प्रकारची कारवाई केली गेलीय. यापूर्वी सुद्धा पीएम मोदी यांच्यावर बनवण्यात आलेल्या डॉक्युमेंट्रीमुळे ही बीबीसीवर प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते.(BBC)

बीबीसीवर केवळ भारतातच नव्हे तर जगातील अन्य देशांच्या विरोधात एजेंडा चालवत असल्याचा आरोप लावले गेले आहेत. याआधी ही खुप वेळा याच्या फंडिंगवरुन प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी सुद्धा बीबीसी इंडियावर परदेशी फंडिग प्रकरणीच फेमा म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत खटला दाखल केला आहे. अशातच जाणून घेऊयात बीबीसी कसे काम करते आणि याची फंडिंग नक्की कोण करतं त्याबद्दल अधिक.

भारतात ८३ वर्षांपासून काम करतेय बीबीसी
बीबीसीची स्थापना १९२२ मध्ये ब्रिटेनमधील एका खासगी संस्थेच्या रुपात झाली होती. १९२६ मध्ये झालेल्या एका सामान्य आंदोलनादरम्यान बीबीसीने केलेल्या कवरेजचे कौतुक केले गेले. त्यानंतर बीबीसीने १९३२ मध्ये अन्य देशांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. हे तेच वर्ष आहे जेव्हा बीबीसीने आपली वर्ल्डवाइट सेवेला सुरुवात केली होती. भारतात सुद्धा ११ मे १९४० रोजी बीबीसी इंडियाची स्थापना रेडियो पासून झाली होती. आता हे सर्व मीडिया माध्यमांतून लोकांपर्यंत पोहचले गेले आहेत.

BBC
BBC

कशी केली जाते बीबीसीला फंडिंग
बीबीसीला बहुतांश फंडिंग ही फीसच्या माध्यमातून येते. ते लाइव्ह टेलिकास्टचा अधिकार देण्यासंबंधिक संस्थांकडून घेतली जाते. खास गोष्ट अश की, या परवान्याची फीसची वसूली ब्रिटेन सरकार आणि त्यांचे आर्थिक विभाग करते. त्यानंतर सरकार हे पैसे बीबीसीला देते. या परवाना शुल्काला अशा पद्धतीने घेतले जाते की, जसे की भारतात लाइट बिलाचे पेमेंट केले जाते. म्हणजेच जर दिले नाही तर तुरुंगात जावे लागते.

या व्यतिरिक्त व्यावसायिक सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमातून ही बीबीसीला उत्तम महसूल मिळतो. एका रिपोर्टनुसार बीबीसी फंडिंगचा सर्वाधिक मोठा हिस्सा बीबीसी आपल्या त्या कार्यक्रमांमधून कमावते जे आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केले जातात. बीबीसी न्यूज सेवा, डिजिटलच्या माध्यमातून ही त्यांची बक्कळ कमाई होते. गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा ट्विटरवर समर्थित सरकार मीडिया ऑर्गेनाइशन असल्याचे म्हटल्याने बीबीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी असे म्हटले होते की, केवळ ते परवाना फीसच्या आधारावरच शुल्क वसूल करतात.(BBC)

हे देखील वाचा- श्रीलंकेतील महाबोधी वृक्षावर मोठे संकट

कसे काम करते बीबीसी
बीबीसीचे काम रॉयल चार्टर अंतर्गत सुरु असते. हे ब्रिटेनच्या सत्तेकडून दिले जाणारे लाइसेंस प्रमाणेच आहे. प्रत्येक दहामध्ये त्याचे नुतनीकरण होते. या चार्टरमध्ये संबंधित कंपन्यांचा उद्देश काय आहे हे स्पष्ट केलेले असते. आधी कंपनीचे संचालन बीबीसी ट्रस्ट कडून केले जायचे. २०१६ मध्ये ते बंद करुन बीबीसी बोर्डाची स्थापना केली गेली आणि तेच आता याची देखभाल करतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.