Home » सुरतमध्ये आशियातील सर्वात मोठे पार्क 

सुरतमध्ये आशियातील सर्वात मोठे पार्क 

by Team Gajawaja
0 comment
Park In Surat
Share

गुजरातमधील सुरत हे देशातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. गुजरातमध्ये सुरत दुस-या क्रमांकाचे शहर आहे. सुरतची ओळख ही भारताची डायमंड सिटी अशीही आहे. जगातील 90% पेक्षा जास्त हिरे सुरतच्या डायमंड बाजारातून आल्याचे सांगितले जाते. याशिवाय सुरत हे  गुजरातमधील प्रमुख औद्योगिक केंद्रही आहे. याशिवाय सुरतचा कपडा बाजार हा जगात प्रसिद्ध आहे. यापाठोपाठ सुरतच आणखी एक ओळख होऊ पाहत आहे, ती म्हणजे सुरत हे जगातील प्रमुख असे उद्यानांचे शहर म्हणूनही नावारुपास येत आहे. सध्या सुरतमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या बागेची निर्मिती करण्यात येत आहे. (Park In Surat)   

आशियातील सर्वात मोठे जैव विविधता उद्यान सुरतच्या अल्ठन कांकरा नदी किना-यावर होत असून यामध्ये  9 किमी होणारा वॉकिंग ट्रॅक हा वैशिष्टपूर्ण ठरणार आहे. या उद्यानात जवळपास 9 लाख रोपे लावण्यात येणार आहेत. ही सर्व रोपे औषधी झाडांची असणार आहेत. तसेच या उद्यानात जे पशू पक्षी ठेवण्यात येणार आहेत, त्यांचा पूरक आहार या वृक्षांच्या पानांपासून होईल, अशी काळजी घेण्यात येणार आहे. या जैवविविधता उद्यानात 13 किमीचा सायकल ट्रॅक बांधण्यात येणार आहे. सर्वात मोठे जैवविविधता उद्यान उभारणीच्या कामाला जोर आला असून येत्या काही महिन्यात हे उद्यान पूर्णत्वास जाणार आहे. हे जैवविविधता उद्यान अल्ठण येथील कांकरा नदीच्या काठावर 87 हेक्टर जागेवर उभारले जात आहे. मुख्य म्हणजे ज्या जमिनीवर हे जैवविविधता उद्यान उभारले जात आहे, ती जमीन एकेकाळी नापीक  होती. मात्र आता याच नापिक जमिनीवर सर्वप्रकारच्या झाडांची लागवड केली असून येथे फुलांच्या बागांचे छोटे छोटे ताटवेही तयार करण्यात येत आहेत. (Park In Surat)  

या जैवविविधता उद्यानात विविध प्रजातींची सहा लाख रोपे लावण्यात येणार आहेत. याशिवाय या उद्यानात अनेक वैशिष्टे जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्ये जगातील बहुतांश फुलपाखरांसाठी येथे अधिवास तयार करण्यात येत आहे. तसेच पक्षी अधिवास क्षेत्र, औषधी वनस्पती येथे लावण्यात येत असून या उद्यानातील प्राण्यांना नैसर्गिक अधिवासाची जाणीव व्हावी यासाठी मोठे कुरणही असणार आहे.   याशिवाय या उद्यानात सांस्कृतिक वन रोपवाटिका असेल.  पर्यावरण आणि वन्यजीवनावर होणा-या व्याख्यांनासाठी स्वतंत्र केंद्र असेल.  हे उद्यान नदीच्या काठावर होत असल्यामुळे या काठावर विविध पुजाविधी करण्याची खोस सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.   याशिवाय ग्रीन वॉल पार्क आणि तलाव हे या जैवविविधता उद्यानाचे सर्वात मोठे आकर्षण असेल. हे जैवविविधता उद्यान कांकरा खाडीच्या दोन्ही बाजूला 3-5 किमी लांबीच्या परिसरात तयार केले जात असून त्यातील बहुताश काम पूर्ण झाले आहे. (Park In Surat) 

जैवविविधता उद्यानात विविध जैविक प्रजाती आढळतात. जैवविविधता उद्यानात या विविध जैविक प्रजातींचे जतन करण्यात येते.  तसेच सुरत येथील या उद्यानात असणार आहे. या जैवविविधता उद्यानाच्या मार्फत अभ्यास आणि संशोधनासोबत निसर्गाचे संरक्षणही करण्यात येते.  सोबत पर्यटन वाढ हे यातील मुख्य उद्दिष्ट आहे.  आशियातील सर्वात मोठे जैवविविधता उद्यान सुरत येथे होत असल्यानं या परिसरातील अन्यही पर्यटन क्षेत्रांचा विकास होणार असून पर्यटकांची संख्या वाढणार आहे. (Park In Surat) 

==========

हे देखील वाचा : न्यूयॉर्क शहर बुडण्याचा धोका 

==========

सुरत हे पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. यात आता जैवविविधता उद्यानाची भर पडणार आहे.  सुरतमधील अनेक पर्यटन स्थळे ही पर्यटकांची आवडती आहेत.  त्यातील प्रमुख म्हणजे सुरतचे कपडा मार्केट. अतिशय स्वस्त आणि उत्तम दर्जाचे कपडे या बाजारात मिळतात.  त्यामुळे सुरतमध्ये येणार प्रत्येक पर्यटक या कपडे बाजारात जातोच.  याशिवाय  सरदार पटेल संग्रहालय हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.  या संग्रहालयात पुरातन वास्तूंचा मोठा संग्रह आहे. संग्रहालयात तारांगण आहे. विश्वाच्या निर्मितीचा शोध घेणारे दृक-श्राव्य सादरीकरण हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.   याशिवाय सुरतमध्ये तापी रिव्हरफ्रंट,  समुद्रकिनारे, सरठाणा निसर्ग उद्यान आदी पर्यटकांचे पसंतीचे स्थान आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.