आज, १४ एप्रिल संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस खास आहे. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य हे समाज कल्याणासाठी दिले. त्यांनी अस्पृश्यता, जाती भेद, उच्च-निचता सारख्या वाईट गोष्टींना समाजातून संपवण्यासाठी कठोर संघर्ष केला. या व्यतिरिक्त स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचे फार मोठे योगदान होते. भीमराव आंबेडकर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यंतचा त्यांचा प्रवास हा सोप्पा नव्हा. त्यांना या दरम्यान काही कठीण परिस्थिींचा सामना करावा लागला होता.(Ambedkar Jayanti 2023)
बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहेत जे कठीण परिस्थिती आल्यानंतर मागे हटतात. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची जबाबदारी उचलण्याव्यतिरिक्त आंबेडकरांनी भारताचे संविधान ही तयार केले. तर त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्याबद्दलच्या खासी गोष्टी जाणून घेऊयात.
बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १९८१ मध्ये मध्य प्रदेशातील महू नगर सैन्य छावणीतील रामजी मालोजी सकपाळ आणि भामाबाई यांच्या घरी झाला. भीमराव त्यांचे १४ वे मुलं होते. महार जातीचे असल्याने लहानपणापासूनच अस्पृश्यता आणि भेदभाव यासारख्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. आंबेडकरांच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम नव्हती. तरीही त्यांना आपल्या मुलाला शिकवायचे होते. भीमराव यांचे वडिल इंग्रजी सैन्यात सुबेदाराच्या पदावर काम कर होते. त्यांना सुद्धा भेदभावदीचा सामना करावा लागला होता.
७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस
१९८७ मध्ये आंबेडकर यांचा संपूर्ण परिवार मुंबईत आला. आंबेडकरांनी साताऱ्यातील शासकीय शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी इंग्रजीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला होता. हेच कारण आहे की, महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. जेव्हा ते चौथीत होते तेव्हा ते इंग्रजीत पास झाले तेव्हा त्यांच्या समाजातील लोकांनी जल्लोष साजरा केला. तेव्हा आंबेडकर केवळ १५ वर्षांचे होते आणि त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला होता.
दलित वर्गाला दिला समानतेचा दर्जा
भले ही आपल्या सुरुवातीच्या शिक्षणात आंबेडकरांना काही समस्यांचा सामना करावा लागला. पण तरीही ते पुढे जात राहिले. १९०७ मध्ये मॅट्रिक पास केल्यानंतर ते एल्फिंस्टन कॉलेजला गेले. त्यानंतर १९१२ मध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटीत अर्थशास्र आणि राजकीय विज्ञानात ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर बडौदा सरकारमध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. वयाच्या २२ व्या वर्षात ते पुढील वर्षात संयुक्त राज्य अमेरिकेत गेले. डॉक्टर आंबेडकर अर्थशास्रात पीएचडी करणारे देशातील पहिले अर्थशास्री सुद्धा होते.(Ambedkar Jayanti 2023)
हे देखील वाचा- जेव्हा महात्मा फुलेंना मारण्यासाठी आले होते आपलेच निकटवर्तीय…
आंबेडकरांनी अस्पृश्यतेला हे गुलामगिरी पेक्षा अत्यंत वाईट असल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या जाती-धर्मातील लोकांना शिक्षित होण्यास सांगितले. त्यांचे असे म्हणणे होते की, शिक्षणच समानतेचा हक्का मिळवून देऊ शकते. जातिवाद आणि अस्पृश्यता संपण्यासाठी काही आंदोलने सुद्धा केली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी काँग्रेस सरकारने त्यांना पहिले कायदे आणि न्याय मंत्रीच्या रुपात निवडले होते.