Home » चिनी शास्त्रज्ञाने लावला कायम चिरतरुण राहण्याचा शोध

चिनी शास्त्रज्ञाने लावला कायम चिरतरुण राहण्याचा शोध

by Team Gajawaja
0 comment
Share

तुम्हाला सर्वात कोणाची भीती वाटते? या प्रश्नावर अर्ध्याअधिक जनसंख्येचं एकच उत्तर असतं ते म्हणजे मृत्यू….कोणालाच मृत्यू आवडत नाही.  फारकाय चेह-यावर येणा-या वार्धक्याच्या खुणाही आवडत नाहीत. त्यामुळे चेह-यावर आलेल्या वार्धक्याच्या खुणा दूर सारण्यासाठी लाखो-करोडो खर्च करुन प्लॅस्टिक सर्जरीच्या माध्यमातून तरुण राहण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. जगात असे अनेक शास्त्रज्ञ आहेत, जे चिरतारुण्यांचे रहस्य उलगडण्यासाठी प्रयोग करीत आहेत. कोरोनानंतर तर मृत्यू या शब्दाला घाबरणा-यांची संख्या अधिक झाली आहे.  प्रसिद्ध पॉप सिंगर मायकेल जॅक्सन याला किमान दिडशे वर्ष तरी जगायचे होते.  त्यासाठी तो रोज स्वतःची वैद्यकीय तपासणी करुन घ्यायचा. त्याच्याकडे स्पेशलिस्ट अशा डॉक्टरांची एक टिम चोवीस तास तैनात होती. तरीही मायकेल सर्वांना सोडून गेलाच. मृत्यू हा असा आहे की, कोणीही त्याच्याबाबत नक्की सांगू शकत नाही. पण या मृत्यूलाच मात द्यायची कोणी तयारी केली असेल तर यासंदर्भात चीनमधील एका शास्त्रज्ञाने धक्कादायक खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञाने आपण मृत्यूला मात देणारे संशोधन केल्याचा दावा केला आहे. या चीनी शास्त्रज्ञाला त्याच्या आधीच्या एका शोधासाठी तुरुंगाची वारी करावी लागली आहे. मात्र आता त्याच्या या चिरतारुण्याच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. (China Scientist) 

चिरतारुण्यासाठी आवश्यक डिएनएचा शोध लावल्याचा दावा करणारा हा शास्तज्ञ आहे, जियानकुई. जियानकुई यांनी दावा केला आहे त्यांनी लोकांना वृद्ध होण्यापासून रोखता येईल, असे संशोधन केले आहे. चिनी शास्त्रज्ञ हे जियानकुई यांनी दावा केला आहे की, त्यांनी असे संशोधन केले आहे, ज्यामुळे लोकांना वृद्ध होण्यापासून रोखता येईल. या संशोधनातून मानवाचे वाढणारे वय थांबू शकते आणि त्यातून मानवाला चिरतारुण्य प्राप्त होणार आहे. (China Scientist)

एका अहवालानुसार जगभरातील अनेक शास्त्रज्ञ फक्त वाढत्या वयावर संशोधन करीत आहेत. मानवी शरीरातील डिएनएमध्ये चिरतारुण्याचे रहस्य लपले आहे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.  गेल्या काही वर्षापूर्वी अमेरिकेतील विद्यापिठात लहान बाळाच्या नाळीमध्ये असणारे द्रव चिरतारुण्यासाठी वरदान असल्याचे सांगितले होते. मात्र या सर्व संशोधनात कुठल्याही शास्त्रज्ञानं पुढे येऊन आपल्या संशोधनाबाबत दावा केला नाही. मात्र आता चीनमधील एका शास्त्रज्ञानं या संशोधनात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.  वय वाढले की, चेह-यावर सुरकुत्या दिसायला लागतात.  या वाढत्या वयाला आपण रोखू शकतो ,असा दावा चिनी शास्त्रज्ञ जियानकुई यांनी केला आहे. त्यांच्या शोधानं  माणसाचे वृद्धत्व थांबू शकते आणि वृद्धत्व टाळता येऊ शकते. जियानकुई हे चीनमधील वादग्रस्त शास्त्रज्ञ असून त्यांनी 2018 मध्ये पहिला डिएनए प्रयोग केला होता. (China Scientist)

अर्थात जियानकुई यांचा हा शोध प्रत्यक्षात कधी येईल ते सांगता येत नाही. कारण त्याच्यावर आतापासून वाद सुरु झाला आहे. या शोधाचे वर्णन अनैतिक आणि धोकादायक म्हणून केले जात आहे. चीनमध्ये वृद्ध माणसांचे प्रमाण जास्त आहे. तरुणांमध्ये विवाहाचे प्रमाण कमी झाले आहे.  आणि ज्यांचा विवाह झाला आहे, त्यांना आपले कुटुंब वाढवण्याची उत्सुकता नाही.  परिणामी चीनची लोकसंख्या कमी होत आहे.  अशातच याप्रकारचे प्रयोग सुरु झाले तर जननदर अजून खाली येऊ शकतो, असा धोका काही जाणकार व्यक्त करीत आहेत. जियानकुईचा हा प्रस्ताव वैज्ञानिकदृष्ट्या निराधार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (China Scientist)

===========

हे देखील वाचा : पाकिस्तानने सर्वात प्रथम बनवला होता कंप्युटर वायरस

===========

काही वर्षापूर्वी याच जियानकुई यांना बेकायदेशीर वैद्यकीय शोधांसाठी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती.  तुरुंगात गेल्यावरही जियानकुई यांचे प्रयोग थांबले नाहीत. कारण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, त्यांनी बीजिंगमध्ये संशोधन प्रयोगशाळा चालू करुन आपल्या नवीन प्रयोगाची घोषणा केली आहे. जियानकुई यांच्या घोषणेनं आश्चर्य व्यक्त होत आहे. जियानकुई हे दुर्मिळ आजारांवर जीन थेरपीद्वारे उपचार करण्यासंदर्भातही संशोधन करीत आहेत. त्याच संशोधनातील पुढचा टप्पा म्हणून जियानकुई चिरतारुण्याच्या शोधाकडे बघतात. यातून मानवाचे वाढते वय रोखता येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. जियानकुई यांनी आपला हा शोध जाहीर केल्यावर एकच खळबळ उडाली आहे. कारण वाढते वय रोखण्यासाठी सर्वांचाच प्रयत्न असतो.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.