Home » १९ वर्षाची मुलगी बनली इटलीची नवी राणी 

१९ वर्षाची मुलगी बनली इटलीची नवी राणी 

by Team Gajawaja
0 comment
Italy Queen
Share

जगातील राजेशाही कधीची संपुष्ठात आली. आता सर्वत्र लोकशाही नांदत आहे. लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते देश चालवत आहेत. मात्र काही राजघराणीही काळाच्या ओघात नष्ट झाली तरी त्यांची जागा जनतेच्या मनातून काढून घेता आली नाही. भारतातही अशी अनेक राजघराणी आहेत की, ज्यांच्याबाबत अजूनही जनतेच्या मनात आदराची भावना आहे. ब्रिटीश राजघराण्याचीही अशीच कहाणी आहे. प्रत्यक्षात जरी या राजघराण्याला काहीही अधिकार नसले तरी या ब्रिटीश राजघराण्याचा प्रमुख हा तमाम ब्रिटन वासीयांचा प्रमुख असतो. अगदी तेथील पंतप्रधानापेक्षाही त्याचा मान अधिक असतो. असेच एक राजघराणे इटलीमधील आहे. इटलीच्या या राजघराण्याची आता नव्यानं चर्चा होऊ लागली आहे, कारण या राजघराण्याची राणी एक 19 वर्षीय युवती होण्याची शक्यता आहे.  इटलीच्या राजघराण्याच्या प्रमुखपदी व्हिटोरिया क्रिस्टिना ही प्रसिद्ध मॉडेल बसणार आहे. तिच्या वडीलांनी राजघराण्याचा पदभार स्विकारायला नकार दिल्यामुळे व्हिक्टोरियाला आता इटलीच्या राणीपदाचा मुकुट मिळणार आहे. वास्तविक इटलीच्या राजघराण्याकडे कसलेही प्रशासनिक अधिकार नाहीत. पण त्यांचे राजघराण्याचे वलय अद्यापही असून व्हिटोरिया क्रिस्टिनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Italy Queen)  

इटलीच्या राजघराण्याच्या इतिहासात राणी (Italy Queen) व्हिटोरिया क्रिस्टिना हिच्या नावानं आता नवं पान जोडण्यात येणार आहे. केवळ 19 वर्षांची तरुणी, मॉडेल म्हणून काम करणारी व्हिटोरिया क्रिस्टिना इटलीची राणी होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे इटलीतील घराणेशाहीची एक परंपरा संपुष्टात येणार असून सिंहासनावर प्रथमच एक महिला विराजमान होणार आहे. जेव्हा ब्रिटनमध्ये राणीची सत्ता संपून आता राजा चार्ल्स यांची राजेशाही सुरु झाली आहे, तेव्हाच इटलीमध्ये राजाची सत्ता संपूष्ठात येणार असून तेथे राणी व्हिटोरियाचा उदय होत आहे.  

प्रिन्सेस व्हिटोरिया क्रिस्टिना अॅडलेड चियारा मारिया डी सॅव्होया, हाऊस ऑफ सॅवॉयच्या सिंहासनाची वारस आहे. ती इमॅन्युएल फिलिबर्टो, व्हेनिसचा राजकुमार आणि पिडमॉन्ट आणि क्लोटिल्ड कौरो यांची पहिली मुलगी आहे. व्हिटोरिया क्रिस्टिना यांचा जन्म 28 डिसेंबर 2003 रोजी जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे झाला. ती इटलीच्या सॅवॉय राजघराण्याची राजकुमारी आहे. प्रिन्स इमॅन्युएल आणि क्लोटिल्ड कोरो यांची सर्वात मोठी मुलगी असलेली व्हिटोरिया अतिशय प्रतिभावान म्हणून ओळखली जाते. लंडन विद्यापीठातून तिनं राज्यशास्त्र आणि इतिहासाची पदवी संपादन केली आहे. त्यानंतर व्हिटोरियानं मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला. अतिशय सुंदर असलेल्या व्हिटोरियानं चित्रपटातही भूमिका केल्या आहेत.  राजघराण्यातील मोठी मुलगी असली तरी व्हिटोरियाचा परंपरेनुसार राजगादीवर अधिकार नव्हता. तिचे वडील या इटलीच्या सिंहासनावर विराजमान होणार होते. मात्र इटलीच्या राजकुमारनं आपला सिंहासनावरील अधिकार सोडला आहे. हे करतांना राजकुमारनं, जगाला आणि देशाला एक नवा दृष्टीकोन या घटनेतून मिळणार आहे. राजकुमारी व्हिटोरिया या नव्या जबाबदारीसाठी सक्षम असल्याचेही या राजकुमारानं म्हटलं आहे. इटलीकडील राजघराण्यातील या बदलाकडे मोठा बदल म्हणून बघण्यात येत आहे. सध्या इमॅन्युएल फिलिबर्टो हे इटलीमध्ये व्हेनिसचे राजकुमार आहेत. राजगादीवरील आपला दावा सोडून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त करताच त्यांच्या या निर्णयाची संपूर्ण जगात चर्चा रंगली आहे. (Italy Queen)

=========

हे देखील वाचा : प्रिन्स हॅरीला स्पेअर भोवणार…

=========

व्हिटोरिया ही स्वतंत्र विचारांची तरुणी म्हणून ओळखली जाते. राजघराण्याच्या परंपरेच्या चौकटीत न राहता तिनं तिच्या व्यक्तीमत्वाला विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. 2007 मध्ये फ्रेंच चित्रपट La Vie en Rose मध्ये व्हिटोरियाने काम केले होते. व्हिक्टोरिया सोशल मिडीयावरही बरीच अक्टिव्ह असते. तिचे वडील, प्रिन्स इमॅन्युएल, तिचा उल्लेख रॉक एन रोल प्रिन्सेस करतात. 1946 मध्ये सार्वमत घेतल्यानंतर इटलीमध्ये राजेशाही संपुष्टात आली आहे. पण सेवॉयच्या राजघराण्यात ही परंपरा अजूनही सुरू आहे. प्रिन्स इमॅन्युएल आणि त्यांची मुलगी व्हिटोरिया हाऊस ऑफ सेव्हॉयशी संबंधित आहेत. येथे राजघराण्यातूनच उत्तराधिकारी निवडला जातो. विशेष म्हणजे, व्हिक्टोरियाचे आजोबा देखील आहेत, ते 86 वर्षांचे आहेत. त्यांची नात राणी (Italy Queen) झाली तर राजघराण्याच्या परंपरेत मोठा बदल होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. आता लोक सभागृह काय निर्णय घेते यावर सर्व अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.