प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांना देशातच नव्हे तर परदेशात ही प्रसिद्धी मिळाली. ७ एप्रिल १९२० रोजी उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये जन्मलेले पंडित रविशंकर हे ७ भावंडांमधील सर्वाधिक लहान होते. लहानपणापासूनच संगीत आणि नृत्याची आवड असल्याने वयाच्या १० व्या वर्षी भावासोबत डांन्स ग्रुपमध्ये सहभागी झाले. मात्र हळूहळू संगीताकडे त्यांची ओढ अधिक वाढू लागली होती. अशातच वयाच्या १८ व्या वर्शी सतार शिकण्यास त्यांनी सुरुवात केली. मैहरचे उलाउद्दीन खान यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पंडित रविशंकर यांनी काही रेकॉर्ड केले. त्याचसोबत त्यांच्या अशा काही गोष्टी होत्या त्यासाठी हे फार ओळखले जायचे. जसे की, विमान प्रवासादरम्यान एक सीट सुरशंकर यांच्या नावे बुक करायचे.(Pandit Ravi Shankar Birth Anniversary)
या कारणास्तव सुरशंकर यांच्या नावे सीट बुक करायचे
पंडित रविशंकर जेव्हा विमानातून प्रवास करायचे तेव्हा दोन सीट्स बुक करायचे. एक सीट त्यांच्या नावे आणि दुसरी सीट ही सुरशंकर यांच्या नावे. दोन्ही सीट बाजूबाजूलाच असायच्या. दीर्घकाळापर्यंत ही गोष्ट फार चर्चेत होती. एका सीटवर रविशंकर बसायचे आणि दुसऱ्या सीटरवर सुरशंकर. म्हणजेच त्यांचा सतार. त्यांचे त्यांच्या सतारशी ऐवढे सखोल नाते होते की हे ते सीट्स बुकिंग करण्यावरुनच कळते.
३ ग्रॅमी अवॉर्ड्स जिंकले
भारतीय संगीताला पाश्चिमात्य देशांत लोकप्रिय बनवण्यासाठी पंडित रविशंकर यांचे मोलाचे कार्य आहे. परदेशी दौऱ्यादरम्यान १९६६ मध्ये त्यांची भेट जगातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या बीटल्स ग्रुपचे जॉर्ज हॅरिसन यांच्यासोबत झाली. तो असा काळ होता जेव्हा रॉक आणि जॅज म्युझिक तरुणांची पहिली पसंद होती. पण त्यांची ही भेट खरंच फळली. पंडित रविशंकर यांनी जॉर्ज हॅरिसन, गिटारिस्ट जिमी हँड्रिक्स आणि वायलिन एक्सपर्ट येहुदी मेनुहिनी सारख्या दिग्गज संगीत कलाकारांसोबत मिळून फ्युजन म्युझिक बनवले. जे जगभरात पसंद केले गेले.
पंडित रविशंकर यांनी नेहमीच आपल्या अटींनुसार काम केले. याचे एक उदाहरण १९६९ मध्ये पहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी पाहिले की पाहिले की, ऑडियंन्स मधील काही लोक ड्रग्ज घेत आहेत. त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आणि असे म्हटले की, संगीत आमच्यासाठी ईश्वरापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे. या पवित्रतेत ड्रग्ज संबंधित लोक मला नकोत. असे सांगत त्यांनी कार्यक्रमातून एक्झिट घेतली.(Pandit Ravi Shankar Birth Anniversary)
हे देखील वाचा- वयाची ५३ वर्ष व्हीलचेअरवर घालवली… स्टीफन हॉकिंग अनेकांचे बनले प्रेरणास्थान
पंडित रविशंकर यांना संगीतवर अथांग प्रेम होते. प्रकृति बिघडली होती तरीही त्यांनी ४ नोव्हेंबर २०१२ मध्ये कॅलिफोर्नियातील आपली मुलगी अनुष्का हिच्यासोबत परफॉर्मेंन्स दिला होता. त्यांचा तो शेवटचा प्रोग्राम होता. तर संगीतावरील प्रेम हे त्यांचे अत्यंत नितळ होते की, यापूर्वी ३ वेळा शो रद्द केल्यानंतर प्रकृती जरी बिघडली असली तरीही त्यांनी ऑक्सिजन मास्क लावून परफॉर्मेन्स दिला होता. त्यांच्या नावे अनेक पुरस्कार आहेत. तीन वेळेस त्यांना ग्रॅमी पुरस्काराने ही गौरवण्यात आले. देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने ही त्यांना सन्मानित केले गेले. १९८६ ते १९९२ पर्यंत राज्यसभेचे सदस्य ही होते. १२ डिसेंबर २०१२ रोजी अमेरिकेतील सॅन डिएगो मधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.