पाऊस म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय येत? वाफाळता चहा आपली एखादी खास व्यक्ती काही जुन्या आठवणी मातीचा सुगंध गरमागरम भजी आणि आपल्या सगळ्यांचं कंफर्ट फूड वडापाव! वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती अगदी Rarely च सापडेल. पण वडापाव खाताना तुमच्या कधी मनात असा प्रश्न आलाय का की हा पदार्थ कोणी तयार केला असेल कसा तयार झाला असेल जर हे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्ही देणार आहोत.(Vadapav History)
मुंबई म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स! याच मुंबईने अनेकांना स्वप्न बघायला शिकवलं आणि त्यांची स्वप्न पूर्णही केली. पण हे स्वप्न पूर्ण करताना रात्रंदिवस मेहनत घेताना प्रत्येकाच्या वाट्याला आला तो संघर्ष आणि याच संघर्षाच्या काळात अनेकांच्या पोटाची खळगी भरण्याचं काम स्वस्त आणि मस्त पदार्थाने केलं, तो पदार्थ म्हणजे वडापाव! बटाट्याची भाजी आणि बेसन यांनी तयार केलेला बटाटे वडा लुसलुशीत पाव लाल चटणी आणि मिरची वडापावचं हे ओरिजनल स्वरूप. आज या वडापावची जागा चीज वडापाव, मंचुरियन वडापाव, तंदुरी वडापाव, ग्रील वडापाव अशा वेगवेगळ्या चवीच्या आणि फ्लेवरच्या वडापावने घेतली असली तरीही ओरिजनल वडापावची चव विसरणं कोणालाही शक्य नाही. (Top Stories)
तसा वडापावचा शोध नेमकं कुणी लावला, याची माहिती आपल्याला मिळत नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात वडापावचे अनेक उल्लेख सापडले आहेत. पनवेल भागात त्याकाळीही वडापावची गाडी लागत होती. साधारण बटाटा वडा हा प्रकार सगळ्याच मराठी घरांमध्ये बनत असतो. त्यातच पाव ही गोष्ट १६व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात आणली. त्यामुळे वडापावचा जनक कोण हे शोधण मात्र कठीण आहे. पण तरीही हे श्रेय मुंबईतल्या दादरच्या अशोक वैद्य यांना जातं.(Vadapav History)
यांची स्टोरी अशी आहे की, 60 वर्षांपूर्वी याच दादरकर अशोक वैद्य यांचा दादर स्टेशन बाहेर बटाटेवडे आणि पोहे याचा एक छोटासा स्टॉल होता. पण दररोज फक्त बटाटावडा विकण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं त्यांच्या डोक्यात आलं आणि इथेच जन्म झाला वडापावचा. अशोक वैद्य यांनी एक दिवस लुसलुशीत पाव बटाटावडा चटणी आणि मिरची अस कॉम्बिनेशन करून ते आपल्या स्टॉलवर विकायला ठेवलं मग काय बघता बघता ही डिश इतकी फेमस झाली की आज ती जागतिक स्तरावर विकली जातेय. (Top Stories)
पूर्वीच्या काळी दादर परळ, लालबाग, गिरगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार असायचे. मेहनतीचं काम पण उत्पन्न कमी त्यामुळे प्रचंड भूक लागलेली असतानाही या कामगारांना मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन खाणं खिशाला परवडणार नव्हतं. अशातच त्यांच्यासाठी Rather त्यांच्या भुकेसाठी वरदान ठरला तो म्हणजे हा वडापाव. 1966 मध्ये अशोक वैद्यांनी वडापाव विकायला सुरुवात केली. त्याच दरम्यान म्हणजे 1970 ते 80 च्या दशकात महाराष्ट्रातील अनेक मिल बंद पडत होत्या त्यामुळे मिल कामगारांनी उदरनिर्वाह करण्यासाठी लहान लहान खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू केले. त्यात अनेकांनी वडापावला प्राधान्य दिलं. कारण त्याची वाढती मागणी लक्षात घेता अनेकांना ते सोयीचं पडत होत. त्यामुळे कमी पैशात पोट भरेल असा पदार्थ तयार करण्याचा निर्णय अशोक वैद्यांनी घेतला आणि वडापावचा शोध लागला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.(Vadapav History)
================
हे देखील वाचा : Salad : सॅलड खाण्याचे फायदे आणि विविध सॅलड रेसिपी
================
वडापाव बद्दल आणखी एक किस्सा म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अशोक वैद्य यांच्या वडापावचे चाहते होते ते त्यांच्या स्टॉलला नेहमी भेट द्यायचे त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रिणी निर्माण झाली आणि बाळासाहेबांनी तर बीएमसीच्या अधिकाऱ्यांना बजावून सांगितलं होतं की वैद्य यांच्या स्टॉल आणि त्यांना कुठलाही त्रास आपल्याकडून होता कामा नये. त्याच काळात म्हणजे साधारण आयुष्याच्या दशकात शिवसेनेने दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली त्यामुळे दादर माटुंगा सारख्या भागातल्या उडपी हॉटेल्स मध्ये दाखवत ते खाद्यपदार्थ खाण्याचा निश्चित करण्यासाठी शिवसेनेने वडापावचा प्रचार सुरू केला आणि शिवसेनेने वडापावला राजकीय पातळीवर ब्रँड बनवलं त्यामुळे वडापावच्या यशात शिवसेनेचाही खारीचा वाटा आहे हेही तितकच खरं. (Top Stories)
आज वडापावची क्रेझ फक्त मुंबईतच नाही तर जगभरात आहे. सामान्य माणसापासून ते अगदी फेमस क्रिकेटर्स सेलिब्रिटीज राजकारणी सगळेच हे वडापावचे चाहते आहेत. इतकच काय तर याच प्रेमापोटी २३ ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.