Home » या २० विचित्र गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? 

या २० विचित्र गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? 

by Team Gajawaja
0 comment
Strange Things
Share

अभ्यास करताना काही वेळानंतर सलग अभ्यास केल्यामुळे अनेकांना कंटाळा येतो. पण जर अर्धा तास अभ्यास करून १० मिनिटाचा ब्रेक घेतल्यास मन पुन्हा अभ्यासात रमते. आहे ना थोडी विचित्र गोष्ट?  आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत. यातल्या काही गोष्टी तर आपल्या आजूबाजूला घडत असतात किंवा दैनंदिन जीवनाचा भाग असतात, पण त्याबद्दल आपल्याला फारशी कल्पना नसते.  (Strange Things) 

१) यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जगभरात ७०० कोटी लोक असून त्यातील जवळपास ५१० कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. परंतु, जगात फक्त ४२० कोटी लोकच दात घासण्याचा ब्रश वापरतात. याचा अर्थ पृथ्वीवर असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन तर आहे, पण ब्रश नाही. 

२) जेव्हा मानवाचा जन्म पृथ्वीतलावर झाला होता तेव्हा २००० लोक अस्तित्वात होते. त्यानंतर हळूहळू मानवाची लोकसंख्या वाढून २ लाख वर्षांनी ती १०० कोटीपर्यंत पोहोचली. त्यानंतर ७०० कोटी लोकसंख्या होण्यासाठी फक्त २०० वर्ष लागली.  

३) चीनमध्ये राहणाऱ्या मुलीने केलेला अजब कारनामा वाचाल तर थक्क व्हाल. या मुलीला २० बॉयफ्रेंड्स होते. त्या सर्वांकडे तिने आयफोन मोबाईल गिफ्ट मागितला. त्यातील एका आयफोनची किंमत जवळपास १.३ लाख रुपये होती. तिने त्या मोबाईलच्या विक्रीतून जवळपास १५ लाख रुपये कमावले आणि घर विकत घेतले. घर घेतल्यानंतर मात्र तिने सर्व बॉयफ्रेंडला सोडून दिले. 

४) काही कोड्यांमध्ये एकच रंग वेग वेगळ्या रूपात दाखवला जातो. परंतु, खरं तर एकच रंग असतो, पण त्याला शषरीय पद्धतीने ठेवले की, त्याचे दोन रंग दिसतात. 

५) आयुष्यात ज्या लोकांना दुसऱ्याला सल्ला द्यायला आवडतो, मुळात तीच लोक खूप चिंताग्रस्त आयुष्य जगत असतात. त्यामुळे इथून पुढे कोणी सल्ला द्यायला आला तर, पहिल्यांदा त्याला कसली चिंता तर नाही ना हे पाहण्यास विसरू नका. (Strange Things)

६) मोबाईल चॅट मध्ये वापरल्या जाणाऱ्या स्माइलीबद्दलची आहे. जेव्हा आपण एखाद्याशी संवाद साधत असतो तेव्हा सर्वात जास्त वापरली जाणारी स्माईली म्हणजे हसत हसत रडणारी  स्माईली. 

७) इंग्लंड देशात असणाऱ्या वेम्बली स्टेडियम बद्दल एक अजब गजब गोष्ट सांगितली जाते. त्या ठिकाणी जवळपास २६१८ टॉयलेट आहेत. 

८) जेव्हा सर्वात जास्त कंटाळतो तेव्हा साफसफाई जर केली तर आपल्याला ताजेतवाने वाटते. त्यामुळे साफसफाई करून प्रयत्न करायला हरकत नाही. 

९) सामान्यतः सफरचंदाची किंमत असते ७० ते ८० रुपये किलो. मात्र ब्लॅक डायमंड अँपल नावाच्या सफरचंदाची किंमत आहे तब्बल १२०० रुपये. 

१०) बॉब मारले हा जगातील सर्वात श्रीमंत गायक होता. परंतु, मरताना त्याने “आयुष्य विकत घेऊ शकत नाही”, हे शब्द उच्चारले होते. 

११) रशियात एका माणसाने चक्क पिझासोबत लग्न केले होते कारण त्याचे म्हणणे होते की, या जगात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे प्रेम आहे जे मी पिझ्झावर करतो. (Strange Things)

१२) पाब्लो इस्कोबार याने एकदा मुलीला थंडी लागली म्हणून तब्ब्ल १४ कोटी रुपयांच्या नोटांचा अग्नी पेटवून दिला होता. 

१३) दक्षिण इटलीमधील एक बेट डॉल्फिन माशासारखे दिसते. हे एक जगातील आश्चर्य असून चकित करणारी गोष्ट आहे. 

१४) सूर्याचा खरा रंग पांढरा असून वातावरणानुसार तो कधी लाल, तर कधी पिवळा दिसत असतो. (Strange Things)

====

हे देखील वाचा: मलेशियन एअरलाइन्स फ्लाईट 370 – एक न उलगडलेलं कोडं!

====

१५) दूरचित्रवाहिनीवर मारुती आणि हुंदाई सारख्या गाड्यांच्या जाहिराती दाखवल्या जातात. पण जेव्हा लॅम्बोर्गिनी आणि फेरारी गाड्यांचा विषय येतो तेव्हा या कंपन्या जाहिरात दाखवत नाहीत. कारण या गाड्या घेणाऱ्या ग्राहकांना जाहिरात पाहायला वेळच नसतो. 

१६) रागात एखादी व्यक्ती काही बोलून गेली, तर ते खरं असतं कारण तेव्हा ती मनातले सांगून टाकत असते. 

१७) बिहार राज्य प्रगतीच्या बाबतीत पिछाडीवर असूनही भारतात सर्वात जास्त कलेक्टर, आयपीएस याच राज्यातले आहेत.  (Strange Things)

====

हे देखील वाचा: उघड्या डोळ्यांनी बघता येणार धूमकेतू आणि ग्रहांच्या स्वर्गीय भेटी! २०२२ मध्ये घडणार १५ विशेष खगोलशास्त्रीय घटना

====

१८) मंगळ ग्रहावरून पृथ्वी एका बिंदुएवढीच दिसती. 

१९) आपण जेव्हा सम आणि विषम क्रमांकांना इंग्लिश भाषेत लिहितो तेव्हा त्यामध्ये प्रत्येक वेळी E हे अक्षर येतेच. (Strange Things)

२०) जेव्हा आपण रेल्वे पाहतो तेव्हा तिचा रंग सामान्यतः निळा असतो. कारण काही वर्षांपूर्वी निळ्या रंगाची म्हणजे नवीन ब्रेक सिस्टीम असलेली रेल्वे असे समजण्यात येई. पण आजकाल मात्र सरसकट सर्वच रेल्वेमध्ये नवीन ब्रेक पद्धतीची रचना केलेली असते. 

नवीन नवीन गोष्टी माहित करून आपणही हुशार झाले असाल ना? 

विवेक पानमंद 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.