साउथ एशियन गेम्स मध्ये ‘वुशू’ खेळात भारताने नुकतेच सुवर्ण पदक पटकावले आहे. पण या वुशू बद्दल कित्येक भारतीयांना माहीत देखील नाही. केरळ येथे राहणाऱ्या अनियन मिथुन (Aniyan Midhun) या २८ वर्षीय तरुणाने २६ मार्चला नेपाळ येथे झालेल्या दक्षिण अशियाई वुशू स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. यात त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मार्च महिन्यात झालेल्या साउथ एशियन स्पर्धेत ७० वजनी गटात खेळून भारताला विजय मिळवून देणारा अनियन हा एकमेव खेळाडू आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा नेपाल येथे पार पडली.
काय आहे वुशू खेळ?
वुशू (Wushu) हा मूळचा चीनमधील खेळ असून स्वसंरक्षण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. मिक्स मार्शल आर्टसचा प्रकार असणारा हा खेळ महाराष्ट्र, हरियाणा आणि दाक्षिणात्य राज्यात प्रामुख्याने खेळला जातो. यात स्टान्स, कीक, पंचेस, बॅलन्स याचा समावेस असतो. यात कुस्ती, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग या खेळांचा एकत्रित प्रकार आहे. केरळ येथील त्रिशूर येथे राहणारा अनियन हा ७० किलो वजनी गटात सहभागी झाला. तो आणि त्याची १० जणांची टीम दक्षिण अशियाई वू शू स्पर्धेत सहभागी झाली होती. या खेळाडूंमध्ये हा एकटाच भारतीय आहे. त्याने वुशू आणि किकबॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षिसे पटकावली आहेत. अनियन मिथुन हा कुलदीप हांदू यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कुलदीप हे ‘अर्जुन’ पुरस्कार विजेते असून वुशू चे प्रख्यात प्रशिक्षक आहेत.
अनियन हा केरळ येथे लहान मुलांना वुशू चे प्रशिक्षण देतो. सध्या कोरोनाच्या काळात मैदाने, तसेच सराव केंद्रे बंद होत असल्याने त्याला सरावास अडचणी येत आहेत. तसेच कोरोनामुळे प्रायोजकत्वही मिळत नसल्याने त्याला खर्चाचा समतोल साधताना अडचणी निर्माण होत आहे. वुशू हा खेळ जास्त प्रत्यक्षाने खेळण्याचा असल्याने ऑनलाईन शिकू शकत नाही. यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षणाची गरज असते, असेही अनियनने सांगितले. सर्वसामान्य माच्छिमारी करण्याऱ्या कुटुंबात वाढलेला आणि लहानपणापासूनच खेळाची आवड असणाऱ्या अनियन ने वयाच्या ११व्या वर्षापासून स्वत:ची आर्थिक जबाबदारी उचलली होती. मित्रपरिवारात अनेकांनी इतर क्षेत्रात कामाची संधी शोध असे सांगितले. मात्र देश प्रेम आणि खेळ यापुढे कसलाच विचार न करणारा अनियन आपल्या निर्णयांवर शेवटपर्यंत ठाम राहिला.
पुढे भारतासाठी जास्तीत जास्त खेळून जास्तीत जास्त विजय मिळवून द्यायचा एवढं एकच उद्धिष्ट असल्याचे अनियन ने सांगितले आहे. एका परकीय देशाचा खेळ समजून, शिकून त्यावर नैपूण्य मिळवून एखादा भारतीय परदेशात जावून विजय देखील पटकाउन येतो. आणि याबद्दल आपल्या भारतीयांना कल्पनादेखील नसते……….
शब्दांकन – शामल भंडारे.