Home » कोणत्या शहरात राहतात जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती?

कोणत्या शहरात राहतात जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती?

by Team Gajawaja
0 comment
World Richest People
Share

रेजीडेंसी अॅडवायजरी फर्म हेनले अॅन्ड पार्टनर्स ग्रुपच्या एका रिपोर्ट्सनुसार, न्युयॉर्क, टोक्यो आणि सॅन फ्रांन्सिसको मध्ये सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती राहतात. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, सर्वाधिक करोडपती असणाऱ्या मुख्य १० शहरांपैकी अर्धे संयुक्त राज्य अमेरिकेत आहे. तरीही आकडेवारीवर नजर टाकल्यास कळते की, न्यूयॉर्क शहरात २०२२ च्या पहिल्या सहामाईमध्ये हाय नेट-वर्थ असणाऱ्या व्यक्तींमध्ये १२ टक्क्यांनी घट आली आहे. तर सॅन फ्रांन्सिसको क्षेत्रात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.(World Richest People)

चौथ्या स्थानावर काबिज आणि कॉस्ट ऑफ लिविंग संकटामधून जाणाऱ्या लंडनमध्ये सुद्धा ९ टक्क्यांची कमी आली आहे. रिपोर्टमध्ये करोडपतींना १ मिलियन डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता असल्याने त्यांना अहवालात दाखल करण्यात आले आहे. तर गु्प्तहेर कंपनी न्यू वर्ल्ड वेल्थ द्वारे एकत्रित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार असे दिसते की, मध्य पूर्व मध्ये असलेल्या सौदी अरबची राजधानी रियाद आणि संयुक्त अरब अमीरातचे शहर शारजाहात आतापर्यंत सर्वाधिक करोडपती असणारे शहर आहे.

World Richest People
World Richest People

त्याचसोबत अबू धाबी आणि दुबईत सुद्धा वेगाने करोडपतींची संख्या वाढत आहे. कारण युएई आपल्या कम कर व्यवस्था आणि नव्या निवास योजनेसह अल्ट्रा-रिच लोकांना आकर्षित करतो. संपन्न रशियन लोकांचे स्थलांतर सुद्धा संयुक्त अमीरातीचे रॅंकिंग सुधारण्यास मदत करतात.

हे देखील वाचा- १३०० वर्षांपूर्वी समुद्रात बुडाले होते जहाज, आता मौल्यवान सामान आले पाण्याबाहेर

मात्र बीजिंग आणि शंघाई जे सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या लिस्टमध्ये आहेत ते आता नवव्या आणि १०व्या स्थानावर आहेत. यांना सुद्धा नुकसान सहन करावे लागले. हेनले अॅन्ड पार्टनर्सचा असा अनुमान आहे की, यंदा रशियानंतर सर्वाधिक चीनी श्रीमंत व्यक्ती देश सोडून जात आहेत. चीन मधील उद्योगांवर सरकार अधिकाधिक नियंत्रण करु लागल्याने असे होत असल्याचे बोलले जात आहे.(World Richest People)

या व्यतिरिक्त संयुक्त अरब अमीरातसह नॉर्वे, आयरलँनड, स्विर्त्झलँन्डसह कतर, मकाओ, लक्जमबर्ग, सिंगापुर, ब्रुनई आणि कुवैत हे देश सुद्धा सर्वाधिक श्रीमंत दैशांच्या यादीत येतात. तेल आणि नैसर्गिक वायूच्या भरपूर साठ्याने समृद्ध असलेला कतर देश सुद्धा नेहमीच श्रीमंत देशांच्या यादीच उच्च स्तरावर असतो. तर युरोपीय देश लक्जमबर्जचा आर्थिक विकास हा गुंतवणूक आणि खासगी बँकांमुळे अधिक फायद्यात आहे. तर अमेरिका आणि चीन जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असल्याचे मानले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.