Winter Health Care : हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. खरंतर सध्या सर्वत्र थंडी वाढल्याने बहुतांशजण घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर परिधान करतात. अशातच शरिराला उब मिळावी म्हणून लोकरीचे कपडेही परिधान केले जातात. पण शरिर आतमधून गरम राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया अधिक…..
शरीर हाइड्रेट ठेवा
शरिराला हिवाळ्यात हाइड्रेट ठेवण्याची काय गरज आहे असा विचार तुम्हाला आलाच असेल.. खरंतर हिवाळ्यात देखील शरीर हाइड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कारण हिवाळ्यात आपण कमी प्रमाणात पाण्याचे सेवन करतो. आपले शरीर हाइड्रेट राहिल्यास पोटासंबंधित समस्यांसह रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होईल.
गरम पेय
हिवाळ्यात शरीर आतमधून गरम राहण्यासाठी डाएटमध्ये गरम पेयांचा समावेश करावा. तुम्ही चहा, कॉफीशिवाय सूप पिऊ शकता.
खाद्य पदार्थ
तुम्ही अशा खाद्य पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करू शकता जे तुमच्या शरिराला हिवाळ्यात आतमधून गरम ठेवण्यास मदत करतील. तुम्ही गुळ, तीळ, शेंगदाणे खाऊ शकता. याशिवाय हिरव्या पालेभाज्याही खाऊ शकता. (Winter Health Care)
चयापचय मजबूत करा
तुम्ही जे काही खात आहात ते नीट पचणे महत्वाचे आहे. तुमची चयापचय क्रिया मजबूत असावी. तुम्ही जे काही खात आहात ते नीट पचत नाही, असे होऊ नये. यासाठी तुमच्यासाठी कोणताही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही एकाच जागी बसून राहिल्यास तुमच्या शरीरात अन्न पचणार नाही आणि तुम्हाला भूकही लागणार नाही. त्यामुळे त्यासाठी एक तास काढून वर्कआउट करणे महत्त्वाचे आहे. यामुळे रक्तप्रवाही सुरळीत राहतो. यासोबतच शरीरातील आळसही निघून जाईल.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)