Home » रतन टाटांनी असा घेतला होता फोर्डने केलेल्या अपमानाचा बदला (TATA’S way of Revenge)

रतन टाटांनी असा घेतला होता फोर्डने केलेल्या अपमानाचा बदला (TATA’S way of Revenge)

by Correspondent
0 comment
When Ratan Tata Took Revenge Marathi info
Share

काही लोकांची बदला घेण्याची पद्धत एकदम निराळी असते. कोणी कुणाचं आर्थिक नुकसान करुन आपल्या अपमानाचा बदला घेतं, तर कुणी शारीरिक हिंसेचा मार्ग अवलंबतो. मात्र फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून आपल्या अपमानाचं उत्तर देतात. असं करणाऱ्या व्यक्तींमधलं देशातलं एक महत्त्वाचं आणि नावाजलेलं नाव म्हणजे प्रसिद्द उद्योगपती रतन टाटा. आज आम्ही तुम्हाला त्यांचा एक प्रसिद्ध किस्सा सांगणार आहोत (TATA’S way of Revenge). 

सन १९९१ मध्ये रतनजी टाटा समूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी टाटा मोटर्स ही सर्वात मोठी ट्रक उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर १९९८ मध्ये टाटा मोटर्सने कार बनवण्याचा निर्णय घेतला आणि वर्षाच्या शेवटी टाटा इंडिका लाँच करण्यात आली. एखाद्या भारतीय कंपनीने डिझाईन केलेली ही पहिली आधुनिक कार होती. रात्रंदिवस काम चालू होतं. 

हा प्रोजेक्ट रतनजींचा ड्रीम प्रोजेक्ट होता. म्हणून जेव्हा ही कार बाजारात आली, तेव्हा या कारकडून त्यांच्या खूप जास्त अपेक्षा होत्या. परंतु रतन टाटांचे हे स्वप्न साकार होण्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला. रतन टाटा यांनी या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र एक केले होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना या प्रोजेक्टमध्ये यश मिळाले नाही. टाटा मोटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागलं. नुकसान भरपाई करण्यासाठी शेअरहोल्डर्सने कंपनी विकण्याचा सल्ला दिला.

रतन टाटा कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटरच्या मुख्य ऑफिसमध्ये गेले. त्यांच्यासोबत कंपनीचे शेअर होल्डर्सही होते. फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा यांची ३ तास चर्चा झाली. 

यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांची थट्टा केली आणि “जर तुम्हाला व्यवसायाचं कोणतंही ज्ञान नव्हतं, तर तुम्ही ही कार लॉन्च करण्यासाठी एवढा पैसा का गुंतवला? आम्ही तुमची कंपनी विकत घेऊन तुझ्यावर उपकार करत आहोत”. असं म्हणत त्यांचा अपमान केला.  

फोर्डच्या चेअरमनचं बोलणं रतनजींच्या जिव्हारी लागलं. कंपनी विकावी लागणार या विचारानेच रतन टाटा ग्रासले होते. त्यातच एवढा मोठा अपमान. एखादा सामान्य माणूस असता, तर झालेला अपमान सहन करून गप्प बसला असता, पण ते रतन टाटा होते. सुरु असलेली चर्चा अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स विकण्याचा निर्णय बदलला. त्यांनी पुन्हा एकदा शुन्यापासून विश्व निर्माण करायचे ठरवले आणि खरोखरच त्यांनी फिनिक्स पक्षासारखी राखेतून गगनभरारी घेतली. (TATA’S way of Revenge)

=====

हे देखील वाचा: WhatsApp Vs Telegram: स्पर्धा फिचर्सची! तंत्रज्ञानाच्या विश्वात या दोन ॲप्समध्ये प्रचंड स्पर्धा

=====

सन २००८ पर्यंत टाटा मोटर्सचा नफा तुम्ही विचार करु शकत नाही एवढ्या पटींनी वाढला आणि विशेष म्हणजे, टाटांचा अपमान केलेली फोर्ड कंपनी नुकासानात जाऊ लागली. आता तुम्ही याला नशिब समजा किंवा आणखी काही. मात्र,फोर्ड कंपनीचं पुरतं दिवाळं निघालं. 

फोर्डचं सर्वात जास्त नुकसान रेंज रोव्हर आणि जॅग्वार या लक्झरी कार्समुळे झालं. त्यानंतर वाचून आश्चर्य वाटेल रतन टाटांनी या दोघी कंपन्या विकत घेण्याचा निर्णय घेतला. यासाठीच विचारविनीमय करण्यासाठी विल फोर्ड आणि त्यांचे काही शेअरहोस्डर्स भारतात आले होते. म्हणतात ना, “जैसी करनी वैसी भरनी”, तसंच झालं. भेटायला आलेल्या लोकांनी तेव्हा रतन टाटा यांना म्हटलं की, “तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार मोठे उपकार करत आहात”. 

आज रेंज रोव्हर आणि जॅग्वार जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या प्रिमिअम कार ब्रँडमध्ये आहेत. टाटा मोटर्स ही जगातील सर्वात मोठी कार कंपनी आहे आणि रतन टाटा सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत त्यांना अजिबात आपल्या कर्तृत्वाचा आणि हुशारीचा गर्व नाहीये. तुम्हाला वाचून आनंद वाटेल की, टाटा समूह आपल्या नफ्यातील ६६% हिस्सा चॅरिटीवर खर्च करतो.

रतन टाटा शक्य तितकं चंदेरी दुनिया आणि झगमगाटापासून लांब राहणं पसंत करतात. ते १९९१ पासून २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे चेअरमन होते. टाटा गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील कुलाबा येथे पुस्तकांनी भरलेल्या घरात एकटेच राहत आहेत.

– प्रशांत पाटील 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.