Home » Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?

Kinder Joy या चॉकलेटचा इतिहास काय ?

by Team Gajawaja
0 comment
Kinder Joy
Share

गेल्या काही दिवसांत सर्वात जास्त hype कोणत्या चॉकलेटला मिळाली असेल, तर ती किंडर जॉय (Kinder Joy) या अंड्याचा आकार असणाऱ्या चॉकलेटला. लहान मुलांसाठी बनवलं गेलेलं हे चॉकलेट मोठी माणसं सुद्धा अचानक विकत घेऊ लागली. एकेकाळी जिथे लहान मुलं आपल्या पालकांकडे या चॉकलेटचा हट्ट करायचे, तिथे आता गर्लफ्रेंडस आपल्या बॉयफ्रेंडसना हट्ट करून किंडर जॉय या चॉकलेट मागू लागल्या. बघता बघता प्रत्येक ठिकाणी किंडर जॉय चॉकलेट आउट ऑफ स्टॉक झालं. त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे किंडर जॉयचं हॅरी पॉटर एडिशन, फक्त या एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे किंडर जॉय आउट ऑफ स्टॉक कसं जाऊ लागलं आणि या किंडर जॉय या चॉकलेटचा इतिहास काय, जाणून घेऊ.

सुरुवात करूया किंडर जॉयच्या इतिहासापासून, म्हणजे चॉकलेटसोबत हे असं काहीतरी छोटी खेळणी देण्याची idea सुचली ती मिशेल फेरेरो (Michele Ferrero) यांना. इटलीच्या इस्टर परंपरेतून त्यांना ही आयडिया मिळाली होती. या परंपरेनुसार इस्टर डेच्या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक एकमेकांना अंडी लाल रंगाने रंगवून भेट म्हणून देतात. लहान मुलांसाठी खास चॉकलेटची अंडी बनवली जातात, ज्यात त्यांना काही ना काही सरप्राइस गिफ्टसुद्धा मिळतं, म्हणून दरवर्षी लहान मुलं या दिवसाची वाट पाहतात. पण मग रोजच सरप्राइस गिफ्ट मिळालं तर काय? याचं प्रश्नाचं उत्तर म्हणजे किंडर जॉय, अंड्यासारखं पॅकेजिंग असणारं, ज्यात चॉकलेट आणि गिफ्ट म्हणून एक छोटी खेळणी सुद्धा असेल अशी आयडिया लावून हे प्रॉडक्ट मिशेले फेरेरो मार्केटमध्ये आणलं. फेरेरो यांच्या कंपनीचं आणखी एक प्रॉडक्ट जे भारतात खूप फेमस आहे, ते म्हणजे फेरेरों रोशर हे चॉकलेट. पण सध्या विषय किंडर जॉयचा आहे. (Marathi News)

तर किंडर जॉयच्या हॅरी पॉटर या स्पेशल एडिशनमुळे फेरेरोच्या रेव्हेन्यूमध्ये १५ % वाढ झाली, आणि जगभरात सुमारे ५० मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई झाली आहे. या प्रॉडक्टचा टार्गेट audience हा 3 ते 12 वर्ष वयोगटातील मुलं असतात. पण हॅरी पॉटर एडिशनमुळे या टार्गेट ऑडियन्समध्ये आणखी एक वयोगट ॲड झाला, तो म्हणजे २५ ते ४० वर्षे, म्हणजेच या मुलांचे पालक.(Marathi News)

कारण हॅरी पॉटर (Harry Potter) या मूवी सीरीजला भारतीय प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हे मूवीज बघितले नसतील तरी मोबाईलवर आणि लॅपटॉपवर ते पायरेट करून बघितलेच असतील. त्यामुळे किंडर जॉयच्या हॅरी पॉटरच्या एडिशनला आपोआपचं लोकांचं एक भावनिक कनेक्शन जोडलं गेलं. मार्केटिंगच्या क्षेत्रात एक म्हण फेमस आहे, don’t sell products, sell emotions.. आणि फेरेरो कंपनीने सुद्धा तेच केलं. लोकांना फक्त गिफ्ट असणारं चॉकलेट नाही विकलं, त्यांचा नॉस्टॅल्जिया सुद्धा त्यांना विकला. मुळात लिमिटेड एडिशनमुळे किंडर जॉयची खपत आणखी वाढली. त्यात या मूवी सीरीजचं प्रमुख कॅरेक्टर हॅरी पॉटर याची खेळणी किंवा स्पेशल गुडी मिळवण्यासाठी शर्यतच सुरू झाली. बरं, ज्यांना पहिल्याच प्रयत्नात किंडर जॉयमध्ये हॅरी पॉटर मिळाला त्यांनी इतर कॅरेक्टरससाठी किंडर जॉय विकत घेतलं. (Kinder Joy)

==============

हे देखील वाचा : Space Waste And Volcano : या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर !

=============

सोशल मिडीयामुळे किंडर जॉयच्या या campaign ला आणखी hype मिळाली. लोकं बल्कने किंडर जॉय विकत घेऊन त्याच्या unboxingच्या व्हिडिओ सुद्धा बनवू लागले. त्यामुळे ज्यांना या हॅरी पॉटर स्पेशल एडिशनबद्दल माहिती नव्हतं, त्यांना सुद्धा याची माहिती मिळाली. आणि हे campaign आणखी boost झालं. थोडक्यात, किंडर जॉयच्या या मार्केटिंगमुळे एक शिकता येईल, की प्रॉडक्ट हे कोणत्याही वयोगटासाठी असलं तरी एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे ते वयोगटाची मर्यादा ओलांडून विकलं जाऊ शकतं. हॅरी पॉटर एडिशनच्या यशानंतर, आता किंडर जॉय कोणत्या थीमचं ॲडिशन आणेल हे पाहण्यासारखं आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.