पृथ्वीच्या बाह्य कवचाला भूकवच असे म्हणतात. प्रावरणाचा सर्वात वरचा कठीण, खडकाळ थर भूकवचाला जोडलेला असतो. एकत्रितपणे ते लिथोस्फियर नावाचा एक थर तयार करतात, जो लिथोस्फेरिक प्लेट्स म्हणून ओळखल्या जाणा-या या संरचना तयार करतात. यात डझनभर मोठ्या टेक्टोनिक प्लेट्साचाही समावेश असतो. पृथ्वीच्या याच प्लेट्स विरळ होत असल्याची धक्कादायक माहिती शास्त्रज्ञांना समजली आहे. ही स्थिती जपानपासून न्यूझीलंडपर्यंत आहे. त्यामुळे पृथ्वीचा स्फोट होऊन मोठ्या विध्वंसाची भीती शास्त्रज्ञानी व्यक्त केली आहे.
पृथ्वीचे कठीण बाह्य कवच डझनभर मोठ्या टेक्टोनिक प्लेट्समध्ये विभागले गेले आहे. बाह्य कवचाचा मुख्य भाग असलेल्या या पॅसिफिक प्लेट (Pacific plate) एकमेकांपासून वेगळ्या होत असल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. यामुळे संपूर्ण मानवी अस्तित्वच धोक्यात आले आहे. यासंदर्भात टोरोंटो विद्यापीठातील संशोधक काही वर्ष पहाणी करत आहेत. त्यांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे की, पॅसिफिक प्लेटला महासागराच्या आत असलेल्या अंतर्गत हालचालींमुळे मोठे नुकसान झाले आहे. यात समुद्रात होत असलेल्या भुकंपाचाही समावेश आहे. या सर्वांमुळे या टेक्टोनिक प्लेटस फाटत आहेत. टोरोंटो विद्यापीठातील केलेले हे संशोधन जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. हा शोधनिबंध प्रकाशित झाल्यापासून शास्त्रज्ञांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत अधिक तपास करता यावा म्हणून जगभरातील मान्यवर शास्त्रज्ञ जपान आणि न्यूझिलंडच्या समुद्रकिना-यावर जाऊन पहाणी करत आहेत.
या शोधनिबंधात जपानपासून न्यूझीलंडपर्यंत पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागाचा स्फोट होत असल्याचा अहवाल शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे पॅसिफिक महासागरात मोठ्या प्रमाणात उलथपालथ झाली आहे. महासागरांखाली असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स जमिनीवरील प्लेट्सपेक्षा जास्त मजबूत असतात. मात्र आता या शोधामुळे याच टेक्टोनिक प्लेटस कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे संपूर्ण पृथ्वीवर स्फोट होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. पृथ्वीचे कठीण बाह्य कवच अनेक टेक्टोनिक प्लेटपासून बनलेले आहे. याच टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे पृथ्वीवर भूकंप होतात. जपानमध्ये भूकंप होण्याचे प्रमाण जास्त आहे. पण जपानजवळील समुद्रातही भूकंपप्रवण पट्टा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जपानपासून न्यूझीलंडपर्यंत पसरलेली पॅसिफिक टेक्टोनिक प्लेट तुटत आहेत. यासंदर्भात जे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत, त्यांना महासागराच्या आत पॅसिफिक प्लेटचे (Pacific plate) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. समुद्राखालचे हे नुकसान शेकडो किलोमीटर लांब आणि हजारो मीटर खोल असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.
यासंदर्भात टोरोंटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक समितीची स्थापना करण्यात आली आहे. संशोधक एर्कन गन त्यासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत.
पॅसिफिक प्लेट (Pacific plate) ही जगातील सर्वात मोठी टेक्टोनिक प्लेट आहे. या प्लेटच जर कमकुवत झाल्या असतील तर प्रशांत महासागरातील हालचालीमुळे विनाश होऊ शकतो. तो टाळण्यासाठी या संदर्भात टोरोंटो विद्यापीठातील संशोधन पथकाने पश्चिम पॅसिफिक महासागरातील चार पठारांचा अभ्यास केला. त्यात ओंटॉन्ग जावा, शात्स्की, हेस आणि मनिहिकी यांचा समावेश आहे. हवाई, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेला हा एक विशाल प्रदेश आहे. या सर्वांची माहिती मग एका सुपर कॉम्प्युटरला देण्यात आली. याच सुपर कॉम्प्युटरनं हा धक्कादायक अहवाल दिला आहे. यामुळे पृथ्वीवर विनाशकारी भूकंप आणि ज्वालामुखीच्या घटनांमध्ये वाढ हाण्याची शक्यता आहे.
असे भुकंप झाले तर या भागात तेवढ्याच विनाशकारी त्सुनामीचीही शक्यता आहे. यावर शोधकरणा-या शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात समुद्रकिना-यावरील मानवी जीवनावर याचा परिणार होणार असून, समुद्रकिनारे गडप होण्याची शक्यता वर्तवली आहे. हा शोध लागल्यापासून शास्त्रज्ञ अधिक जोमानं अभ्यासाला लागले आहेत. आपल्याला समुद्रात किती गुपिते दडवून ठेवलेली आहेत, याची फार कमी माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्राच्या अंतरंगाचा अधिक सखोल अभ्यास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच समुद्रकिना-यावर होणा-या कामांनाही त्वरित थांबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. समुद्रावर होणारे मोठे पूल आणि त्यासाठी होणारे बांधकाम, ड्रिलींग यामुळेही समुद्रतळाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
सई बने