नुकतेच ICICI बँकेच्या माजी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंदा कोचर यांच्यासह त्यांचे पती यांना अटक केली गेली. त्यानंतर काही दिवसांनी व्हिडिओकॉन (Videocon) ग्रुपचे चेयरमॅन वेणुगोपाल धूत यांना सुद्धा आता अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने त्यांना कथित आयसीआयसीआयच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्यावर असा आरोप लावण्यात आला आहे की, या फसवणूकीत वेणुगोपाल धूत यांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये ७१ वर्षीय देशाचे दिग्गज उद्योगपतींपैकी एक असलेले वेणुगोपाल धूत आता न्यायालयीन कोठडीत आहेत. बजाज स्कूटरच्या डीलरशिपसोबत संबंध असलेले वेणुगोपाल धूत यांनी काही दशकांपूर्वीच इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सच्या श्रेणीत आपली कंपनी घराघरांमध्ये पोहचवली होती.
गेली काही वर्ष ही धूत यांच्यासाठी उत्तम राहिली नाही आणि तेथूनच सातत्याने त्यांची आर्थिक घसरण सुरु झाली होती. याच दरम्यान, आयसीआयसीआयच्या बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाच्या मुख्य स्तरावर झालेला घोटाळा समोर आल्याने त्यांची स्थिती अधिकच बिघडली. या प्रकरणी आता त्यांना सीबीआयने अटक केली आहे. वेणुगोपाल धुत यांची दिवाळी ते दिवाळं निघण्यापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात.
यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर उताराकडे प्रवास
सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने कर्ज घोटाळ्याप्रकरणातील एका केसमध्ये त्यांना २८ डिसेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. वेणुगोपाल धूत यांनी आपला प्रवास एका लहान शहरातील एका व्यावसायिकापासून केली होती. नंदलाल माधवलाल धूत यांचे मोठे पुत्र वेणुगोपाल यांनी आपल्या प्रयत्नांनी वीडियोकॉन ग्रुपचा विस्तार घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांव्यतिरिक्त गॅस, रियल एस्टेट आणि किरकोळ व्यवसायात ही केला.
सीबीआयच्या मते वीडियोकॉन समूहाकडून कर्ज घेण्यासाठी धूत यांनी कथित रुपात चंदा कोचर आणि त्यांच्या परिवाराला लाच दिली होती. २०१० आणि २०२१२ दरम्यान चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील बँकेतून ३२५० कोटी रुपयांचे त्यांना कर्ज मिळाले होते. काही महिन्यांमध्ये त्यांना कथित रुपात काही शेल कंपन्यांच्या माध्यमातून दीपक कोचर यांच्या न्यपॉवर रिन्युएबल्समध्ये ६४ कोटी रुपयांची रक्कम गुंतवली. वीडियोकॉनला उधार दिलेली बहुतांश रक्कम NPA मध्ये सामील झाली.(Videocon)
एजेंसीने असा ही आरोप लावला आहे की, सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज घोटाळ्यात कोचर, वेणुगोपाल धूत आणि नूपावर रिन्युएबल्स आणि वीडियओकॉन इंडस्ट्रीज यांच्यासह काही कंपन्यांच्या विरोधात केस दाखल केली. सीबीआयने आयपीसी आणि प्रिवेंशन ऑफ करप्शन अॅक्ट अंतर्गत केस दाखल केली आहे.
आरोप असा आहे, चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेला फसवण्यासाठी एक गुन्हेगाराच्या कटाअंतर्गत काही खासगी कंपन्यांना कर्ज दिले. या केसमध्ये सुप्रीम एनर्जी प्राइवेट लिमिटेड, वीडियओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि अज्ञात पब्लिक ऑफिसर्स यांना सुद्धा आरोपी बनवले आहे. याच केसमध्ये वेगणूगोपाल आता तुरुंगात पोहचले आहेत.
कशा पद्धतीने वेणुगोपाल यांनी टीव्हीचे जग बदलले
वेणुगोपाल धूत यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर मधील एका कृषी परिवारात झाला होता. त्यांच्या वडिलांची कापूस पिंजण्याची एक मिल होती. तसेच धान्याचा घाऊक व्यापार सुद्धा ते करायचे. मात्र १९८२ मध्ये देशातील रंगीत टेलिव्हिजनची सुरुवात होण्यासह परिवाराला एक नवा उद्योगपती सुद्धा दिसला आणि त्यांनी रंगीत टीवी सेट बनवण्याचा विचार केला.
पुणे युनिव्हर्सिटीतून इंजिनिअरिंगचा अभ्यास करणारे वेणुगोपाल यांनी टेलिव्हिजनच्या निर्मितीबद्दल बारकाईने शिक्षण घेण्यासाठी जापानला गेले. तेथे त्यांनी त्याचे अधिक प्रशिक्षण घेतले. तेथून परतल्यानंतर १९८६ मध्ये वेणुगोपाल यांनी व्हिडिओकॉन इंटरनॅशनलचा पाया रचला ज्याचा उद्देश प्रत्येक वर्षाला एक लाख टीव्ही सेट बनवण्याचा होता. त्यासाठी कंपनीने जापानी कंपनी तोशिबा यांच्यासोबत तांत्रिक मदतीचा करार सुद्धा केला होता.
…अशा प्रकारे उभारला व्यवसाय
रंगीत टीवी सेटच्या क्षेत्रात जम बसवल्यानंतर वीडियोकॉनने फ्रीज, वॉशिंग मशीन, एयर कंडीशनर आणि अन्य लहान इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या क्षेत्रात पाऊल टाकले. याच दरम्यान, त्यांनी ओनिडा, सलोरा आणि वेस्टन सारख्या कंपन्यांना मागे टाकले, समस्या तेव्हा पासून सुरु झाली जेव्हा धूत यांनी व्हिडिओकॉनचा विस्तार अन्य क्षेत्रात सुरु केला. खासकरुन वीडियोकॉनला टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून सेल्युलर सेवेमध्ये फार मोठे नुकसान झाले. त्यासाठी १८ सर्किलचे लाइसेंस मिळाले होते पण कंपनी फक्त११ सर्किलमध्येच कमर्शियल संचार सेवा सुरु करु शकली.(Videocon)
कशा प्रकारे लागली उतरती कळा?
वर्ष २०२१ मध्ये १२२ दूरसंचार लाइसेंस निरस्त करण्यासाठीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा वीडिओकॉन समूहावर भारी पडला. रद्द करण्यात आलेल्या परवान्यांमधील फक्त २१ वीडिओकॉनच होते. दरम्यान, नंतर झालेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावात समूहाला सहा सर्किलचे परवाने मिळाले. पण त्यांनी त्याला भारती एयरटेलला विक्री करुन आपला दूरसंचारचा व्यवसाय बंद केला. या व्यतिरिक्त नव्वदीच्या दशकाच्या अखेरीस एलजी आणि सॅमसंग व्यतिरिक्त सोनी सारख्या दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना भारतात आल्याने त्यांची बाजारातील हिस्सेदारी कमी होऊ लागली. बदललेल्या स्थितीमुळे कंपनीचा महसूल सातत्याने घसरु लागला होता आणि हळूहळू त्यांच्यावर कर्जाचा बोझा वाढत गेला.
हे देखील वाचा- ट्विटरच्या सीईओच्या पदावरुन राजीनामा देणार असल्याची एलॉन मस्क यांची घोषणा, पण ठेवली ‘ही’ अट
आणि अशा पद्धतीने ढासळली कंपनी
आपल्यावरील कर्जाची परतफेड होत नसल्याने त्रस्त झालेल्या बँकांनी वर्ष २०१८ मध्ये वीडियोकॉनच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्याचे अपील राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) मध्ये केली.. त्यांच्या विरोधावर कंपनीला दिवाळखोर समान प्रक्रिया सुरु झाली आणि वीडिओकॉन इंडस्ट्रीजमध्ये समूहाच्या १२ अन्य कंपन्यांना सामील केले. दरम्यान, अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील ट्विन स्टार टेक्नॉलॉजीकडून दिली गेलेली फक्त २६९२ कोटींच्या बोलीला जून, २०२१ मध्ये एनसीएसटीने मंजूरी दिली होती. मात्र नंतर ती वादाच्या कचाट्यात अडकली गेली. स्थिती अशी आहे की, वीडियोकॉनच्या कर्जदात्यांना आता सुद्धा आपले पैसे परत मिळतील अशी अपेक्षा आहे.