Home » घरात दररोज ‘या’ दिशेला लावा दिवा, होईल धनवर्षाव

घरात दररोज ‘या’ दिशेला लावा दिवा, होईल धनवर्षाव

कधी ना कधी व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. तर कधी स्थिती अशी होते अधिकच आर्थिक स्थिती बिघडली जाते आणि याचा आयुष्यावर परिणाम होतो.

by Team Gajawaja
0 comment
Vastu Tips for Diya
Share

कधी ना कधी व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. तर कधी स्थिती अशी होते अधिकच आर्थिक स्थिती बिघडली जाते आणि याचा आयुष्यावर परिणाम होतो. त्यावेळी कळत नाही, अचानक पैशांचे खर्च कसे वाढले गेलेत. त्याचसोबत कधी कधी घरातील एखादी वस्तू खराब होते तर कधी घरातील सदस्याची तब्येत बिघडली जाते. यासर्व गोष्टींमुळे व्यक्तीला फार मनस्ताप होतो. त्याला नक्की कळत नाही या गोष्टी आपल्यासोबत का घडत आहेत. (Vastu Tips for Diya)

प्रत्येकालाच वाटत असते आपण आयुष्यात खुप पैसे कमावले पाहिजे. पण आर्थिक तंगीमुळे काहीही करता येत नाही आणि पैसे येण्याऐवजी ते हातातून निघून जात असतात. कधीकधी आर्थिक तंगी ग्रह नक्षत्र किंवा घरात नकारात्मक उर्जेच्या कारणास्तवही होऊ लागते.

वास्तु शास्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याच्या मदतीने व्यक्ती आपल्या आयुष्यात यश मिळवू शकतो. वास्तु शास्रात दिवा लावण्याचे काही उपाय सांगितले आहे. जेणेकरुन देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीच आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. जाणून घेऊयात घरात कोणत्या ठिकाणी आणि कसा दिवा लावायचा याचबद्दल अधिक.

Vastu Tips For Diya: पूजाघर की इस दिशा में रखें दीपक, धन-वैभव से भरा रहेगा घर | Vastu Tips For Diya: Keep the lamp in this direction of worship house, house will

दिवा लावण्यासंदर्भातील नियम
वास्तुनुसार योग्य दिशेला दिवा लावल्याने आर्थिक समस्यांपासून दूर राहता येते. कारण दिवा कधीही आणि कोणत्याही वेळी लावायचा नसतो. तो लावण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विज्ञानानुसार घरात दररोज तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने वातावरण शुद्ध राहते. त्यामुळे धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा दररोज दिवा लावल्याने तुम्ही देवाजवळ लावण्यास सांगितला जातो. जेणेकरुन घरात सकारात्मकता येते. दिवा कधीच दक्षिण दिशेला लावू नये.

तुळशीसमोर दिवा लावणे
हिंदू धर्मात तुळशीला पवित्र स्थान दिले आहे. प्रत्येकाच्या घरात तुळशीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, जी लोक आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत त्यांनी दररोज सकाळी-संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. असे केल्याने त्यांचे नशीब पालटले जाते आणि तिजोरी ही रिकामी राहत नाही. कारण हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. (Vastu Tips for Diya)

घराच्या मुख्य द्वारावर
वास्तु शास्रात नेहमीच असे सांगितले जाते की, घराचा मुख्य द्वार सजलेला आणि स्वच्छ असावा. असे असेल तर त्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहतो. जर तुम्ही घराच्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला दररोज संध्याकाळी दिवा लावत असाल तर घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच सुख-समृद्धि आयुष्यात येते. असे दररोज केल्याने तुम्हाला पैशांसंबंधित समस्यांचा सामनाही करावा लागत नाही.


हेही वाचा- दिवाळीत पीठाचा दिवा लावण्यामागे ‘हे’ आहे खास कारण


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.