भारतातील देवींची 51 शक्तीपिठे ही कायम भक्तांनी गजबजलेली असतात. यातील देवीचे सुंदर रुप बघण्यासाठी भक्तांची गर्दी असते. मंदिरातील देवीचे हे प्रसन्न रुप मनात ठेऊन भक्त घराकडे परतात. पण या देवीच्या 51 शक्तीपीठांमधील प्रमुख मंदिर कुठलं आहे आणि त्यात देवीचे रुप कसे आहे, हे कधी जाणून घेतले आहे का ? (Chhinnamasta Temple)
51 शक्तीपीठांपैकी प्रमुख असलेल्या या देवीचे रुप बघून भक्त काही काळ संभ्रमीत होतात. देवीचे हे विक्राळ रुप असले तरी या मंदिरात भक्तांची सदैव गर्दी असते. कारण हे मंदिर जगातील दुसरे सर्वात मोठे शक्तीपीठ मानले जाते. हे मंदिर आहे, छत्तीसगड राज्यात. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रांचीपासून सुमारे 80 किमी अंतरावर देवी छिन्नमस्तिका देवीचे मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या छिन्नविच्छिन्न मस्तकीची पूजा केली जाते.
आपला भारत देश हा अनेक अनोख्या संस्कृती, परंपरांसाठी ओळखला जातो. शिवाय आपल्या देशातील प्रत्येक मंदिरांचा वेगळा इतिहास आहे. त्यांचे पौराणिक महत्त्व आहे. असेच एक मंदिर म्हणजे, रांची येथील देवी छिन्नमस्तिका देवीचे मंदिर. झारखंडची राजधानी रांचीपासून 80 किमी अंतरावर राजरप्पा येथील छिन्नमस्तिका मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा भाविक देवीचे उग्र रुप बघून भयभीत होतात. मात्र या देवीचा महिमा समजल्यावर देवीच्या चरणी लीन होतात. (Chhinnamasta Temple)
या मंदिरात मस्तक नसलेल्या देवीची पूजा केली जाते. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणा-या छिन्नमस्तिका देवीच्या मंदिरात (Chhinnamasta Temple) वर्षभर भाविक गर्दी करतात. हे मंदिर 6000 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.
या मंदिराबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. देवी छिन्नमस्तिकेचे रुप बघून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, देवी मातेने आपले छिन्नविच्छेदन केलेले मस्तक हातात का धरले आहे. त्यासाठी एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार, एकदा देवी आपल्या मैत्रिणींसोबत गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेली होती. तिथे काही काळ राहिल्यानंतर तिच्या दोन्ही मैत्रिणी भुकेने व्याकूळ झाल्या. तीव्र भूक लागलेल्या या मैत्रिणींची अवस्था बिकट झाली. मैत्रिणींची ही अवस्था पाहून देवीने स्वतःचेच मुंडके कापले. त्यातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या. देवीनं तिच्या मैत्रिणींना दोन प्रवाह दिले आणि उरलेल्या प्रवाहातून स्वतः रक्त पिण्यास सुरुवात केली.
देवीचे हे रुप शत्रूंवर वियज मिळवण्यासाठी कायम पूजले जाते. तंत्र मंत्र देवता म्हणूनही छिन्नमस्तिका देवीची पूजा केली जाते. देवीची मुर्ती उग्र असली तरी ही मुर्ती अप्रतिम आहे. यात छिन्नमस्तिका देवी कमळाच्या फुलावर बसवली आहे. देवीला तीन डोळे आहेत. देवीने तिच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात स्वतःचे छिन्नविच्छेदन केलेले डोके पकडले आहे.(Chhinnamasta Temple)
देवीच्या पायाखाली कामदेव आणि रती विरुद्ध मुद्रेत बसलेले आहेत. देवीचे केस मोकळे आणि विखुरलेले आहेत. देवीनं नागाची आणि मुंडमाळ घातली आहे. माता देवी तिच्या दिव्य आणि विशाल रूपात नग्न अवस्थेत आहे. दागिन्यांनी सजलेल्या छिन्नमस्तिका देवीचे दर्शन घेण्यासाठी पश्चिम बंगाल, आसाम आणि नेपाळमधील भाविकही मोठ्या संख्येनं येतात.
छिन्नमस्तिका देवीचे मंदिर (Chhinnamasta Temple) भैरवी आणि दामोदर नद्यांच्या संगमावर आहे. हा सर्व परिसर नितांत सुंदर आहे. वेद आणि पुराणांमध्ये, दुर्गा सप्तशतीमध्ये या मंदिराचा आणि देवीच्या रुपाचा उल्लेख आहे. शक्तीची देवता म्हणून छिन्नमस्तिका देवीची पुजा केली जाते. शुद्ध अंतःकरणाने माता छिन्नमस्तिकेची पूजा केल्यास देवी सर्व मनोकामना पूर्ण करते, अशी भक्तांची धारणा आहे. पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री येथे मोठी गर्दी असते. तसेच आता विवाहांचा काळ सुरु झाला असून यावेळी येथे विवाहसोहळेही मोठ्या प्रमाणावर होतात.
============
हे देखील वाचा : इथे आहे, सौदर्याची राणी क्लियोपात्रा
============
मुख्य मंदिराव्यतिरिक्त, सूर्य, हनुमान आणि शिव अशी विविध देवतांची दहा मंदिरे या परिसरात आहेत. याशिवाय मंदिराजवळच तारा, षोडशी, भुवनेश्वरी, भैरवी, बगला, कमला, मातंगी, धुमावती अशी महाविद्येची मंदिरे आहेत.
डिसेंबर महिन्यात या छिन्नमस्तिका माता मंदिर (Chhinnamasta Temple) परिसरात मोठी गर्दी असते. हा परिसर निसर्गानं नटलेला आहे. येथे मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत. हे सर्व बघण्यासाठी आणि छिन्नमस्तिका देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी असते. तसेच या दरम्यान स्थानिक आदिवासी देवीची मोठी यात्रा भरवतात. या यात्रेसाठी झारखंड सोबत, पश्चिम बंगाल, आसाम आणि नेपाळमधील भाविक येतात.
सई बने