Home » वाढत्या गरमीमध्ये शरीराल थंड ठेवतील या भाज्या…

वाढत्या गरमीमध्ये शरीराल थंड ठेवतील या भाज्या…

by Team Gajawaja
0 comment
Vegetables
Share

तापमानाचा पारा जसजसा वाढत आहे, तशा आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही भागात तर तापमानानं 45चा आकडा पार केला आहे.  सकाळी दहा नंतर सुर्याची उष्णता एवढी जाणवत आहे की, अनेक भागात सकाळी दहा नंतर रस्त्यावरची वर्दळही कमी होत चालली आहे.  अशा या तप्त वातावरणात सर्वाधिक परिणाम आरोग्यावर होत आहे. सतत पाणी प्यायल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे भूकही मंदावल्याचे जाणवते. यासर्वात शरीरातून घामही बराच बाहेर पडतो. परिणामी अनेकांना थकवा जाणवतो. या उष्णेतेमध्ये शरीराला थंड ठेवणारा आहार महत्त्वाचा असतो. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. गरमीमध्ये कांदा, काकडी, टोमॅटो, भोपळा यासारख्या भाज्या (Vegetables) खूप मदतशीर पडतात. या भाज्या खाल्यास तहानही भागते आणि भूकही. शिवाय उष्णतेचे परिणाम कमी करण्यासाठी या भाज्या फायदेशीर ठरतात.  

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आहार महत्त्वाचा आहे. शरीरात योग्य आहार गेल्यास  उष्माघातापासून शरीराचे संरक्षण होऊ शकते.  उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भाज्या (Vegetables) फायदेशीर पडतात. त्यामध्ये पहिला नंबर लागतो तो कांद्याचा. कांदा हा प्रत्येक घरात हमखास असतो.  उन्हाळ्यात तर हा कांदा वरदान ठरतो.  उन्हाळ्यात पांढ-या रंगाचा कांदा खाल्ला जातो. हा कांदा उन्हाळी कांदा म्हणूनही ओळखला जातो.  याची चव थोडी गोड असली तरी त्यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी आहारात कांद्याचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरी देतात. उन्हाळ्यात पचनाच्या समस्या निर्माण होतात. अशावेळी कांदा खाल्ल्याने फायदा होतो.  जेवणात एका तरी कच्च्या कांद्याचा समावेश असावा. कांदा पचनक्रिया मजबूत करतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो.  तसेच नियमीत कांद्याचे सेवन केल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो. तसेच कर्करोगापासूनही बचाव होतो असे सांगण्यात येते.  (Vegetables)

उन्हाळ्यात कांद्यापाठोपाठ मागणी असते ती काकडीला. काकडीमध्ये नव्वद टक्के पाणी असल्याचे सांगण्यात येते. काकडीचे नियमीत सेवन केल्यास त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जातात. तसेच काकडीच्या सेवनानं पोटाशी संबंधित आजार कमी होतात आणि पचनसंस्थाही चांगली काम करु लागते. काकडी खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत होते.  काकडी ही उन्हाळ्यात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या भाज्यांपैकी (Vegetables) एक आहे. काकडीत अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी हे गुणधर्म असल्यामुळे काकडी खाल्यास शरीराचा उष्माघातापासून बचाव होतो. काकडीपाठोपाठ टोमॅटोला सुद्धा उन्हाळ्यात मोठी मागणी असते.  उन्हाळ्यात कच्चा टोमॅटो खाल्यास त्याचा शरीराला मोठा फायदा मिळतो. उन्हाळ्यात टोमॅटोचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण होते. विशेष म्हणजे टोमॅटो कच्चे खाल्ल्याने 94 टक्के पाणी मिळते. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम या गुणधर्मांचा समावेश असतो. त्यामुळे शरीराचा उष्माघातापासून बचाव होतो.  (Vegetables)

याशिवाय वांग्याची भाजीही उन्हाळ्यात फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांचे आरोग्य राखण्याचे काम करते. त्याच वेळी, वांग्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते. अन्न लवकर पचते. त्यामुळे उष्णता वाढायला लागल्यास वांग्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय आणखी एक भाजी (Vegetables) या उष्म्यापासून बचाव करु शकते. ती म्हणजे भोपळा. भोपळा उन्हाळ्यात आरोग्यासाठी वरदान ठरतो. भोपळ्याची भाजी खाल्लीच जाते. शिवाय भोपळ्याची फुलेही उन्हाळ्यापासून बचाव करु शकतात. भोपळ्याची खीर केली जाते. ही खीर पूर्ण अन्नासारखी उपयोगी पडते. भोपळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्याची तत्वे आहेत. भोपळ्याचे नियमित सेवन या दिवसात केल्यास त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो.  

=======

हे देखील वाचा : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे !

=======

या सर्वांसोबत उन्हाळ्यात सर्वात चांगले ठरते ती कोथिंबीर. आपल्या स्वयंपाकघरात कोथिंबीरीचे स्थान सर्वात प्रथम आहे. पण उन्हाळ्यात कोथिंबिर महाग झालेली असते. त्यामुळे ती खरेदी केली जात नाही. पण उन्हाळ्यात कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.  तसेच कोथिंबीरीची चटणी वा त्याचा वापर सॅलेडमध्ये करण्याचे सांगितले जाते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पोटही साफ राहते.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.