पॅलेस्टाईनचा अतिरेकी गट, हमासने इस्रायलवर 5000 हजाराहून अधिक रॉकेटद्वारे हल्ला केला. या हल्ल्याचे स्वरुप व्यापक होते. आकाशातून हल्ला होत असतांना इस्रायलच्या सिमेवरची कुंपणे कापून हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासमोर जे जे इस्रायली नागरिक आले, त्यांच्यावर बेछुट गोळीबार झाला. पण या सर्वात त्यांचे मोठे लक्ष होते, ते इस्रायली महिला. युद्धातील सर्वात सोप्पा टार्गेट पॉईंट या महिला होतात. हमासच्या अतिरेक्यांनीही हाच टार्गेट पकडत इस्रायली महिलांना ताब्यात घेतले. त्यातील अनेकांवर बलात्कार झाले. या महिलांना हमासच्या अतिरेक्यांनी आपल्या गाड्यांमध्ये भरले, शिवाय आपल्या भागात जाऊन या महिलांची धिंड काढल्याची माहिती आहे. हमासच्या या क्रूरतेचा फटका फक्त इस्रायली महिलांना बसला असे नाही तर या सर्वात अधिक होरपळली गेली ती एक जर्मन तरुणी. इस्रायल मध्ये होणा-या एका संगी कला महोत्सवासाठी आलेली जर्मन तरुणी हमासच्या ताब्यात सापडली. काय होत आहे, हे कळण्यापूर्वीच या तरुणीवर बलात्कार झाला. जिवंतपणीच्या यातना कमी की काय, पण हमासच्या अतिरेक्यांनी या जर्मन तरुणीला नग्न करुन तिच्या नग्न देहाची धिंड काढली. हमासच्या या अतिशय क्रर कृत्यानं अवघ्या जगाला हादरवलं आहे. (Israel-Hamas War)
हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यातील आता वास्तव जगासमोर येत आहे. हमासच्या या हल्ल्यात इस्रायलच्या हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. पण त्यासोबत अतिशय निंदनीय वृत्त म्हणजे, हमासने इस्रायली महिलांचे अपहरण केले आहे. या महिलांचे फोटोच जाहीर करुन हमासने आपल्या कृत्याची कबूली दिली आहे. यात काही परदेशी महिलाही आहे. त्यात जर्मन युवती, शनी लौक हिचा समावेश आहे. जर्मनीमध्ये टॅटो गर्ल म्हणून शनी ओळखली जायची. ती टॅटू कलाकार होती. इस्रायलमध्ये होणा-या संगीत कला महोत्सवासाठी शनी आली होती. मात्र हा महोत्सव जिथे होत होता, त्या कलादालनावरही हमासनं हल्ला केला. त्यातील अनेकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्यात शनी ही हमासच्या अतिरेक्यांच्या तावडीत सापडली. हमासनं तिला इस्रायली सैनिक समजून पकडले, शिवाय तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच हमासचे अतिरेकी थांबले नाहीत तर तिचा देह नग्न करुन खुलेआम वाहनावर परेड करण्यात आली आणि घोषणा देण्यात आल्या. हमासच्या या कृत्यानं अवघ्या जगाला हादरवलं आहे. शिवाय हमासचा वास्तविक चेहरा ही जगासमोर आला आहे. (Israel-Hamas War)
हमासच्या या अमानवी कृत्यानं सर्वात मोठा धक्का लागला आहे, तो शनीच्या आईला. शनीचा मृतदेहाची विटंबना झाली होती. तिचा मृतदेह ओळखण्याचा पलिकडे विद्रुप करण्यात आला. आपल्या मुलीचा मृतदेह तिच्या आईनं पायाच्या टॅटूवरुन ओळखला आहे. शनीच्या नग्न देहावर कोणी पाय देऊन बसला आहे, अशा व्हिडिओनं तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. शनीच्या सोबत झालेल्या क्रूरतेनं तिची आई, प्रचंड धक्यात आहे. तीस वर्षाची शनी ही कलाकार होती. ती दुस-यांचा मदतीसाठी कायम तयार असायची. अशा मुलीची क्रूरपणे झालेली हत्या, हा अमानवीय प्रकार आहे, या हत्येचे कधीही समर्थन होणार नाही. अशा शब्दात शनीच्या कुटुंबियांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (Israel-Hamas War)
==========
हे देखील वाचा : नॉर्थ कोरियाच्या हुकूमशाहाची बहिणही आहे सर्वाधिक खतरनाक महिला
==========
हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात सर्वात बळी गेल्या आहेत, त्या इस्रायली महिला. अनेक महिलांना हमासच्या अतिरेक्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. सध्या सोशल मिडियावर असे अनेक व्हिडीओ फिरत आहे. या व्हिडिओमध्ये महिलांवर झालेले अत्याचार पाहून, अनेक व्हिडिओ हे बॅन करण्यात आले आहेत. कारण या महिलांवर अत्याचार तर झालाच आहे, शिवाय त्यांना शारीरिक इजा पोहचवण्यात आली आहे. त्यांचे कपडे रक्तबंबाळ आहेत. रक्तबंबाळ अवस्थेतील महिलांना बंदिस्त करतांना आणि गाड्यांमध्ये जबरदस्तीनं भरताना हमासनं व्हिडिओ करुन आपल्या निंदनीय कृत्याला अधिक निंदनीय केले आहे. अशा व्हिडिओमध्ये इस्रायलची 25 वर्षीय नोआ अर्गामानी या महिलेचा समावेश आहे. नोआचेही शांतता उत्सवातून हमासच्या अतिरेक्यांनी अपहरण केले आहे. नोआ व्हिडीओमध्ये दहशतवाद्यांच्या मोटरसायकलवर बसून जीवाची भीक मागताना दिसत आहे. इस्रायल वॉर रूमने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अपहरण झालेल्या महिलांची चित्रे जाहीर केली आहेत. युद्ध होणे हे मानवतेसाठी कधीही चांगले नाही. पण सत्तेच्या या युद्धामध्ये बळी जात आहेत, त्या महिलाच.
सई बने