Home » एका अपूर्ण शिवमंदिराचे रहस्य

एका अपूर्ण शिवमंदिराचे रहस्य

by Team Gajawaja
0 comment
Mystery Of Shiva Temple
Share

भारतात भगवान शंकराची सर्वाधिक मंदिरे आहेत. केदारनाथ मंदिर, उत्तराखंड, श्री अमरनाथ गुहा, जम्मू आणि काश्मीर, सोमनाथ मंदिर, गुजरात, काशी विश्वनाथ मंदिर, उत्तर प्रदेश, ओंकारेश्वर मंदिर, मध्य प्रदेश, मुरुडेश्वर मंदिर, कर्नाटक, त्र्यंबकेश्वर मंदिर, महाराष्ट्र ही त्यातली निवडक प्रसिद्ध मंदिरे आहेत. या आणि अन्यही शिवमंदिरांचा इतिहास हा पौराणिक आहे. (Mystery Of Shiva Temple)

यातील काही मंदिरांची उभारणी तर पांडवांनी केलेली आहे. अशाच एका मंदिरात मध्यप्रदेशमधील मंदिराचा समावेश होतो. हे मंदिरही वैशिष्टपूर्ण आहे. मुळात हे जगातले एकमेव मंदिर असावे, ज्याचे बांधकाम हजारो वर्षापासून अपूर्ण राहिले आहे. ते कोणीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही. शिवाय याच शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंगही आहे. हे मंदिर आहे, मध्यप्रदेशमध्ये. मध्य प्रदेशातील भोपाळजवळील भोजपूर शहरात भगवान शंकराला समर्पित असे हे मंदिर आहे. भोजपूर शहरामुळे या मंदिराला भोजेश्वर महादेव मंदिर असे नाव मिळाले आहे.

मध्यप्रदेशमधील जगप्रसिद्ध भोजेश्वर महादेव मंदिरात हजारो शिवभक्त नित्यनेमानं येतात. या मंदिरात श्रावण महिन्यात भक्तांची मोठी गर्दी होते. श्रावण महिन्यात या भोजेश्वर महादेव मंदिरात रोज महादेवाला अभिषेक घालण्यात येतो. हा सोहळा बघण्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविकांची गर्दी होते. या मंदिराला पौराणिक वारसा आहे. हे शिवमंदिर १०१० ते १०५५ या काळात परमार वंशातील प्रसिद्ध राजा भोज याने बांधले. असे सांगितले जाते. मात्र हे मंदिर अपूर्ण आहे. या मंदिराला कळस चढवण्यात आला नाही. त्यामुळे हे मंदिर अपूर्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर अपूर्ण का राहिले, याची एक पौराणिक कथा सांगितली जाते.(Mystery Of Shiva Temple)

त्यानुसार महाभारत काळात या भागात पांडव आणि त्यांची माता कुंती यांचे वास्तव्य होते. येथील भोपाळजवळील भीमबेटका येथे काही काळ पाच पांडव रहात होते. पांडवांची माता कुंती, ही भगवान शंकराची निस्सिम भक्त होती. माता कुंती रोज महादेवाच्या पिंडींवर अभिषेक करत असे. मात्र या परिसरात महादेवाचे मंदिर नसल्यामुळे माता कुंतीला महादेवाची पुजा करण्यास अडचण होत होती. त्यामुळे पांडवांनी भगवान शंकाराची आराधना करुन भाजपूरमध्ये मंदिर स्थापन करण्याची परवानगी मागितली.

भगवान शंकरानं पांडवाना एका रात्रीत मंदिर उभं करा, असे सांगितले. भीमानं हे भगवान शंकराचे आव्हान स्विकारले. त्यांनी एका रात्रीत मंदिर उभारले, शिवाय विशाल असे शिवलिंग तयार केले. मात्र त्याचवेळी सूर्योदय झाला आणि भिमाला मंदिराचे काम थांबवावे लागले. माता कुंती या मंदिरात नित्य पूजा करण्यासाठी येत असे. याच मंदिराच्या जवळून वाहणाऱ्या बेटवा नदीत स्नान करुन माता कुंती मंदिरात येत असे. राजा भोजच्या काळात या मंदिराचा अधिक विकास करण्यात आला. भोजेश्वर मंदिरातली शिवलिंग हे जगातील सर्वात उंच शिवलिंग म्हणून ओळखले जाते. एकाच खडकापासून बनलेल्या या शिवलिंगाची उंची २.३ मीटर, घेर ५.४ मीटर आणि व्यासपीठासह एकूण उंची १२ मीटर आहे. (Mystery Of Shiva Temple)

या भोजेश्वर मंदिराच्या वास्तुशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक वास्तुशास्त्राचे विद्यार्थी या मंदिर परिसरात येतात. हे मंदिर ११ व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंत बांधण्यात आले आहे. त्या-त्या काळातील राजांनी या मंदिरात बांधकाम केले, त्यामुळे मंदिराच्या वास्तुशास्त्रात विविधता आहे. मंदिरातील खांबांवर बारीक नक्षीकाम केलेले आहे. दगडावर केलेले हे काम बघण्यासाठी अनेक भाविक येतात. मंदिराची प्रवेशद्वारेही मोठी असून त्यावर नक्षीकाम केलेले आहे.

============

हे देखील वाचा : राष्ट्रध्यक्षांच्या निधनानंतर इराणमध्ये आनंदोत्सव का झाला ?

============

मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजुला गंगा आणि यमुनेच्या मुर्ती आहेत. शिवाय शिव-पार्वती, सीता-राम, लक्ष्मी-नारायण आणि ब्रह्मा-सावित्री यांच्या मूर्ती चार स्तंभांमध्ये कोरण्यात आल्या आहेत. हे खांब ४० फूट उंच आहेत. या विशाल खांबाना कोरण्यात आले आहे. गर्भगृहाचे अपूर्ण छत या चार खांबांवर आहे. या भोजेश्वर मंदिरातील शिवपिंडीचा आकार सर्वात मोठा आहे. त्यामुळे येथे भगवान शंकाराची पूजाही अनोख्या पद्धतीनं करण्यात येते. या शिवलिंगाचा अभिषेक जमिनीवर उभे राहून करता येत नाही. मंदिराच्या गर्भगृहात संपूर्णपणे शिवलिंग पसरले आहे. त्यामुळे शिवलिंगाची पूजा करण्यासाठी पुरेशी जागा नाही. म्हणून या शिवलिंगाचा अभिषेक आणि पूजा नेहमी त्याच्या जलहरीवर चढून केली जाते. काही काळापर्यंत सामान्य भाविकही जलहरीला जाऊ शकत होते, परंतु आता फक्त पुजारीच दिवसातून दोनदा जलहरी चढून अभिषेक आणि पूजा करतात.(Mystery Of Shiva Temple)

भोजेश्वर मंदिरात मकर संक्रांती आणि महाशिवरात्रीला वार्षिक जत्रा भरते. महाशिवरात्रीला येथे तीन दिवसीय भोजपूर महोत्सवाचेही आयोजन करण्यात येते. भोजपूर शिव मंदिरासमोर पश्चिम दिशेला एक गुहा आहे, ती पार्वती गुहा म्हणून ओळखली जाते. या गुहेतही अनेक कलाकृती कोरण्यात आल्या आहेत. त्यांचा योग्य अभ्यास व्हावा अशी मागणी करण्यात येत आहे.
सई बने

 

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.