कामाच्या कारणास्तव आपल्याला बहुतांशवेळा उन्हातून फिरावे लागते. आपण स्किन प्रोटेक्शनशिवाय उन्हात फिरल्याने सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्येचा सामना करतो. मात्र काही वेळेस या कडक उन्हामुळे सन पॉइजनिंग सारखी समस्या होऊ शकते. हे सन बर्नचे घातक रुप आहे. जे दीर्घकाळापर्यंत सूर्य किरणांच्या संपर्कात आल्याने असे होते. (Sun Poisoning)
सन पॉइजनिंगिची लक्षणे
सन पॉइजनिंगच्या कारणास्तव त्वचेवर पुढील काही लक्षणे दिसून येतात. वेळीच जर लक्षणे ओळखली तर त्याच्या गंभीर समस्येपासून दूर राहता येईल. जर तुम्ही दीर्घकाळ कडक उन्हात राहत असाल तर पुढील काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
-त्वचेवर रॅशेज
-डोकेदुखी
-चक्कर येणे
-डिहाइड्रेशन
-मळमळ किंवा उलटी
-बेशुद्ध पडणे
-ताप येणे
सन पॉइजनिंगपासून असे रहा दूर
हे शक्य नाही की,आपण उन्हात जाण्यापासून सोडून देऊ. पण थोडीशी काळजी घेतली तर आपण सन पॉइजनिंगच्या समस्येपासून दूर राहू शकतो.
सनस्क्रिनचा वापर
जेव्हा तुम्ही कधी उन्हात जाता तेव्ही एसपीएफ ३० च्या वरील सनस्क्रिनच्या लोशनचा वापर करा. बाहेर निघण्यापूर्वी अर्धा तास तरी सनस्क्रिन लावा. जर तुम्हाला अधिक घाम येत असेल तर प्रत्येक २ तासांनी सनस्क्रिन जरुर लावा. सनस्क्रिन लावल्याने युवी रेज अवशोषित होत नाहीत. यामुळे स्किन अधिक डॅमेज होण्यापासून दूर होता.
स्वत:ला कव्हर करा
आपला चेहरा आणि हात पूर्णपणे कव्हर करूनच घराबाहेर पडा.जेणेकरुन टॅनिंगच्या समस्येपासून दूर रहाल. डोक्यावर टोपी घाला, उत्तम ग्लासेस असणारे गॉगल्सचा वापर करावा.
कॉटन कपड्यांना प्राथमिकता द्या
उन्हातून बाहेरून जात असाल तर कॉटन कपडे घाला. प्रयत्न करा की, अधिक घट्ट कपडे घालू नका. खरंतर घट्ट कपडे घातल्याने अधिक घाम येतो. अशातच बॅक्टेरियल ग्रोथ वाढली जाते. (Sun Poisoning)
योग्य रंगाची निवड करा
जेवढे शक्य होईल तेवढे डार्क रंग घालण्यापासून दूर रहा. लाल, निळा किंवा काळा रंग सुर्याची किरणे अवशोषित करतात. सफेद रंग हा सुर्याची किरणे अवशोषित करण्याऐवजी त्यांना परावर्तित करतात.
स्वत:ला हाइड्रेट ठेवा
अधिकाधिक स्वत:ला हाइड्रेट ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवत थोडे थोडे पाणी प्या. उन्हात अधिक घाम येत असेल तर वेगाने शरीरातील पाणी बाहेर पडत राहते. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिकाधिक पाणी प्या.
हेही वाचा- सणासुदीच्या दिवसात केमिकल फ्री उपायांनी उजळवा तुमचे सौंदर्य