Summer Health Care : उन्हाळ्याच्या दिवसात कडाक्याचे ऊन आणि गरम्यामुळे आरोग्य बिघडले जाऊ शकते. यामुळे वेळीच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात डिहाइड्रेशन आणि त्वचेसंबंधित समस्या होणे सामान्य बाब असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. काहींना कडाक्याच्या उन्हामध्ये चक्कर आल्यासारखे देखील होते. यामागे काही कारणे असू शकतात. कडाक्याच्या उन्हामुळे अत्याधिक घाम शरीरातून निघून जाताना शरीरातील पाण्यासह इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. अशातच डिहाइड्रेशनची समस्या उद्भवली जाऊ शकते.
कडाक्याच्या उन्हामध्ये दीर्घकाळ राहिल्याने शरीराचे तापमान वाढले जाते. शरीराचे तापमान वाढल्याने थकवा आणि चक्कर येण्यासारखी समस्या होऊ शकते. अशातच चक्कर येण्याच्या स्थितीत घाबरुन जाऊ नये. यावेळी काही गोष्टी कराव्यात.
फॉलो करा या टिप्स
कडाक्याच्या उन्हामध्ये चक्कर आल्यास सावलीच्या ठिकाणी जावे. जेणेकरुन थेट उन्हासोबत पुन्हा संपर्क येणार नाही. यानंतर एका ठिकाणी थोडावेळ शांत बसा. दीर्घ श्वास घ्या जेणेकरुन शरीराला ऑक्सिजन मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे. पाणी किंवा लिंबू पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढली जाईल.(Summer Health Care)
=======================================================================================================
हेही वाचा :
प्रिबियोटिक्स आणि प्रोबायोटिक्स यामधील फरक माहित आहे का? जाणून घ्या
Milk : Almond Milk चे शरीराला होणारे फायदे कोणते?
=======================================================================================================
जर मीठ-साखरयुक्त ओआरएस प्यायल्यासही बरे वाटू शकते. यामुळे शरीराला इन्स्टंट उर्जा मिळू शकते. याशिवाय चेहरा आणि मानेवर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. असे केल्याने शरीराचे तापमान थोडे कमी होईल. घट्ट कपडे उन्हाळ्यात घालणे टाळावे. सैल आणि सुती कपडे घालावेत. जेणेकरुन ब्लड फ्लो व्यवस्थितीत राहिल. हे उपाय करुन देखील प्रकृती सुधारत नसेल तर डॉक्टरांना संपर्क साधा.उन्हाळ्याच्या दिवसात खासकरुन कडक उन्हावेळी घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर जाताने चेहरा स्कार्फने झाका. पुरेशा प्रमाणात पाणी प्या.