Home » Milk : Almond Milk चे शरीराला होणारे फायदे कोणते?

Milk : Almond Milk चे शरीराला होणारे फायदे कोणते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Milk
Share

आजच्या काळात अनेक जणं उत्तम फिटनेस मिळवण्यासाठी, आपले आरोग्य निरोगी बनवण्यासाठी विविध उपाय करताना दिसतात. यासाठी विविध डाएट देखील ते फॉलो करतात. अनेक लोकं शाकाहारी अर्थात व्हेजिटेरियन होतात तर काही लोकं विगन डाएट फॉलो करण्यास सुरुवात करतात. सध्या आपण जर पाहिले तर विगन डाएट खूपच ट्रेंडमध्ये आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील विगन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. विगन म्हणजे काय तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्जित करणे. दूधासोबतच त्यापासून बनवलेले कोणताही पदार्थ हे लोकं खात नाही. (Milk)

मात्र दूध तर शरीराला चांगले असते. त्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते, मग दूध बंद केल्यानंतर त्यातून मिळणारे पोषकद्रव्य असे विगन लोकं कसे मिळवतात आणि दुधाला पर्याय कसा उपलब्ध करतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. दूध बंद केल्यामुळे अनेक गोष्टी खाण्यावर मर्यादा येतात. अशावेळेस दुधाला पर्याय कोणता? चला जाणून घेऊया. (almond milk)

विगन लोकं दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ जेव्हा बंद करतात तेव्हा ते दुधाला पर्याय म्हणून Almond Milk चा वापर करतात. नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की, हे Almond Milk बदामापासून बनवलेले किंवा बदामाचे दूध असते. दुधाला अतिशय उत्तम, हेल्दी आणि सकस पर्याय म्हणून Almond Milk चा वापर कमालीचा वाढल्याचे आपल्याला दिसते. जसे बेदम आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तसेच हे दूध देखील आपल्यासाठी खूपच उत्तम आहे. जाणून घेऊया या Almond Milk चे फायदे कोणते आहेत. (Marathi News)

वजन कमी करण्यास मदत
बदामाच्या दुधात शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ई, लोह आणि मॅग्नेशियम असते. शिवाय यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. त्यामुळे अनेक आजारांवर मात करण्यास आपल्याला या दुधाची मदत होते. या दुधाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या दुधात कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट नसते आणि कॅलरीज देखील कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे दूध अत्यंत उपयुक्त असते. (Marathi Top News)

=========

हे देखील वाचा : Cancer : जाणून घ्या जो बायडेन ग्रस्त असलेल्या प्रोस्टेट कॅन्सरबद्दल

=========

Milk

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
बदामाच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई आढळते. तसेच यात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बदामाचे दूध फायदेशीर आहे. (Marathi)

पचण्यास हलके
बदामाचे दूध हे प्लांट बेस्ड आहे, त्यामुळे ज्यांना लैक्टोज फ्री दुधाची गरज आहे त्यांच्यासाठी ते उत्तम आहे. या दुधात पाणी असते, त्यामुळे ते पचायला सोपे असते.

हृदयासाठी उपयुक्त
बदामाचे दूध हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बदामाचे दूध बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होत नाही आणि ह्रदय देखील निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. (Social News)

त्वचेसाठी उपयुक्त
बदामाच्या दुधात असणारे व्हिटॅमिन-डी त्वचेला सुर्याच्या अतिनील किरणांपासून आणि हानिकारक बॅक्टेरियापासून वाचवतात तर व्हिटॅमिन-ईमुळे त्वचेला एक प्रकारचे संरक्षण कवच प्राप्त होते. यामुळे त्वचेचे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. (Marathi Trending News)

केसांसाठी फायदेशीर
केसांसाठी बदाम जसे फायदेशीर असतात तसेच बदामाचे दूध खूप फायदेशीर ठरू शकते. यात आढळणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि टोकोफेरॉलसारखे घटक केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात.

हाडांसाठी उपयुक्त
बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम आढळते. त्यामुळे हे दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि हाडांचा विकास होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे बदामाचे दुध मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. (Marathi Top News)

Milk

बदामाचे दूध कसे बनवतात?
१ कप बदाम ते २ कप पाणी या गुणोत्तराने घ्या. जर तुम्हाला पातळ दूध हवे असेल तर जास्त पाणी वापरा. घट्ट दूध मिळवण्यासाठी बदामाचे प्रमाण जास्त आणि पाण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवावे. बदाम रात्रभर किंवा २ दिवस भिजत ठेवा. बदाम फुगतात कारण ते पाणी शोषून घेतात. बदाम जेवढा जास्त काळ भिजतील तेवढेच बदामाचे दूध अधिक मलईदार होईल. यानंतर बदाम धुवून चांगले गाळून घ्या म्हणजे पाणी निघून जाईल. आता मिक्सरमध्ये २ कप पाण्यात बदाम मिसळा, आणि २ मिनिटे हाय स्पीडवर ब्लेंडरमधून काढा.बदाम चांगले क्रश होऊ द्या. (Social Update)

=========

हे देखील वाचा : Indian Spy : शत्रूने कापले होते ज्यांचे स्तन अशा भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य

=========

यानंतर, गाळणीतून मिश्रण गाळून घ्या. यानंतर एका भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यावर स्वच्छ कापड ठेवा. त्यात बदामाचे मिश्रण टाका आणि थोडा वेळ राहू द्या. यानंतर, हे कापड पिळून घ्या आणि तुमचे मलईदार बदामाचे दूध तयार झाले आहे. कापडावर उरलेली बदामाची पेस्ट तुम्ही जेवण, कुकीज, ओटमील, डेजर्ट आदी गोष्टींमध्ये वापरू शकता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.