Dabro Diet : डब्रो डाएटचा सध्या ट्रेन्ड आहे. हे डाएट सेलिब्रेटीज खूप फॉलो करतात. हे डाएट टीव्ही पर्सनालिटी हीदर डब्रो आणि त्यांचे पती डॉ टेरी डब्रो यांनी डिझाइन केले आहे. हे डाएट इंटरमिटेंट फास्टिंगच्या कॉन्सेप्टच्या आधारावर आहे. यामध्ये टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग म्हणजेच मर्यादित काळात खाण्याची पद्धत वापरली जाते. वजन कमी करण्यासह डेब्रो डाएट त्वचेचे आरोग्य आणि अँटी-एजिंगला प्रमोट करण्याचा दावा करते.
सर्वाधिक खास गोष्ट अशी की, डब्रो डाएट तीन फेजमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये जंपस्टार्ट, समर रेडी आणि लूक हॉट वाइल लिविंग लाइक अ ह्यूमन असे म्हटले जाते. पहिल्या फेजमध्ये खाण्याचे तास अधिक स्ट्रिक्ट असतात. ही फेज वजन वेगाने कमी करण्यास मदत करते. दरम्यान, काहीजणांना भूक, थकवा आणि चिडचिडेपणाची समस्या उद्भवू शकते.
अन्य फेजबद्दल अधिक…
दुसऱ्या फेजमध्ये फास्टिंग आणि खाण्याचे तास फ्लेक्सिबल असते. यामुळे डाएट दीर्घकाळापर्यंत फॉलो करणे शक्य होते. या फेजचा उद्देश वजन कमी करणे आहे. जेणेकरुन शरीराला या डाएटची सवय व्हावी. यामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि लो-कार्ब भाज्या खाल्ल्या जातात. यामुळे भूक कमी लागते आणि मेटाबॉलिज्म सक्रिय होतो.
तिसरी फेज मेंटेनन्स फेज असते, जी तुम्ही लाइफस्टाइलप्रमाणे फॉलो करू शकता. यामध्ये आठवड्याभरात काही दिवस फास्टिंग करावे. अन्य दिवस सूट असते. याचा उद्देश देखील वजन कमी करणे आहे. ही फेज फॉलो करणे सोपे आहे. कारण यामध्ये चीट डेज आणि सोशल लाइफ लक्षात घेतली जाते.(Dabro Diet)
=======================================================================================================
हेही वाचा :
स्विमिंग केल्यानंतर झोप का येते? वाचा कारणे
या 5 अँटी-एजिंग ड्रिंक्सचा करा डाइटमध्ये समावेश, चाळीशीतही दिसाल तरुणी
=======================================================================================================
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
डब्रो डाएटमुळे बहुतांशजणांना वजन कमी करण्यास मदत होते. खासकरुन अशा व्यक्तींनी ज्या इंटरमिटेंट फास्टिंग सूट करते. यामध्ये इन्सुलिनचा स्तर कंट्रोलमध्ये राहतो आणि शरीर फॅट बर्निंग मोडवर जाते. याशिवाय डेब्रो डाएटमध्ये तुम्ही शुगर आणि प्रोसेस्ड फूड्सपासून दूर राहता. अशातच वेगाने वजन कमी होण्यास मदत होते. पण हे डाएट सर्वांनाच सूट होईल असे नाही. ज्या व्यक्तींना ब्लड शुगरची समस्या असल्यास त्यांनी डब्रो डाएट फॉलो करू नये.