Success Story: भावेश चंदूभाई भाटिया यांनी आपल्या जिद्द आणि धैर्याच्या जोरावर ते करुन दाखवले जे आजवर कोणीही केले नसेल. नेत्रहिन असूनही त्यांनी मेणबत्तीचा व्यवसाय सुरु करुन इतरांच्या आयुष्यात प्रकाशाचा दिवा लावला. आज ते करोडोंच्या कंपनीचे मालक आहेत. मात्र येथवर पोहचण्याचा प्रवास मात्र सोप्पा नव्हता. त्यांनी मेणबत्तीचा व्यवसाय रस्त्यावर त्या विक्री करुन सुरु केला होता. आज त्यांचे नाव एका यशस्वी व्यावसायिकामध्ये घेतले जाते.
भावेश भाटिया यांनी 9 हजार दिव्यांगांना रोजगार दिला. देशच नव्हे तर जगभरातून सुद्धा त्यांचे काही प्रोडक्ट्स आवर्जून खरेदी केले जातात. 52 वर्ष जुनी भाटिया यांची कंपनी सनराइज कँन्डल सध्या 10 हजारांपेक्षा अधिक कँन्डल्सच्या डिझाइन्स तयार करते. जगभरात 1 हजार मल्टिनॅशनल कंपन्या आहेत ज्या त्यांचे प्रोडक्ट्स खरेदी करतात.
भावेश चंदू भाटिया यांच्या आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ते गुजरातमध्ये राहणारे. कामाच्या शोधात त्यांचा परिवार महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाला. भाटिया यांना बालपणापासून डोळ्यांनी अंधुक दिसायचे. मात्र त्यांच्या आईने त्यांना एका सामान्य शाळेतच घातले होते.जेणेकरुन त्यांनी स्वत: ला वेगळे समजू नये. भावेश यांना शाळेपासूनच क्राफ्ट हा विषय खुप आवडायचा. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर भावेश यांनी आपल्या एका दिव्यांग मित्रासोबत डबल पॅडल असणाऱ्या सायकलवरुन गोंदिया ते नेपाळ असा प्रवास केला.
गोंदिया येथून भावेश यांनी अर्थशास्रात एमए केले. शिक्षणानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. याच दरम्यान आईला कॅन्सर ही झाला होता. आईच्या उपचारासाठी सर्व बचत खर्च केली. मात्र तिचा मृत्यू झाला. या दु:खात अधिक खचून न जाता त्यांनी आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्याकडे पूर्ण लक्ष दिले आणि त्यासाठी प्रयत्न ही केले.
भावेश भाटिया यांना आधीपासूनच क्राफ्टची आवड होती. याच कारणास्व त्यांनी नॅशनल एसोसिएशन फॉर द ब्लाइंडमध्ये बेसिक कॅन्डल मेकिंगसह काही कोर्स केले. येथे एक वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर 1994 मध्ये सनराइज कँन्डलची स्थापना केली. (Success Story)
त्यांनी 50 रुपयांत एक हँन्ड कार भाड्याने घेतली आणि लोकांना मसाज करुन 5 हजार रुपये जमवले. त्यानंतर त्यांनी कँन्डल तयार करण्याचे काम सुरु केले. ते महाबळेश्वर मधील होली क्रॉस चर्च समोर असलेल्या एका दुकातून मेणबत्ती विक्री करु लागले. त्यांना यामधून प्रतिदिन 25 रुपये मिळायचे. त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नीचा मोलाचा वाटा आहे. ती त्यांना एका टुरिस्टच्या रुपात भेटली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. ती मात्र दिव्यांग नव्हती ती एका श्रीमंत घरातील होती. भावेश यांना तिने मेणबत्त्या बनवण्यासाठी वाट्टेल ती मदत केली.
लग्नानंतर भावेश भाटिया आणि त्यांची पत्नी नीता यांनी दिवस-रात्र मेहनत करुन मेणबत्त्यांचा व्यवसाय पुढे सुरु ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. अशातच त्यांनी पैसे जमा करुन एक दुचाकी गाडी खरेदी केली आणि ठिकठिकाणी फिरून त्यांनी मेणबत्तीची विक्री करण्यास सुरुवात केली. नीता या व्यापार वाढावा म्हणून बाजार ज्या मेणबत्त्या खुप विक्री केल्या जायच्या त्याच्या डिझाइन बद्दल भावेश यांना सांगायची. त्यानंतर भावेश त्या कँन्डल्स स्पर्श करुन पहायचे आणि घरी येऊन त्यापेक्षा सुद्धा उत्तम डिझाइन्सच्या कँन्डल तयार करण्यााच ते प्रयत्न करायचे. हळूहळून त्यांनी कँन्डलसाठी एक वॅन खरेदी केली आणि ती चालवण्यास ही शिकले.
हेही वाचा- Success Story: वयाच्या 17 वर्षी सोडले होते घर, आज आहेत यशस्वी व्यावसायिक
परंतु 2007 मध्ये भावेश यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला.तेव्हा एका मित्राच्या मदतीने त्यांना 12 हजार मेणबत्त्यांचे डिझाइन करण्याची संधी मिळाली. यानंतर ते ऐवढे लोकप्रिय झाले की,त्यांना अन्य कंपन्यांकडून सुद्धा ऑर्डर येऊ लागल्या. भावेश यांना स्पोर्ट्समध्ये फार आवड आहे. ते एक पॅरा ओलंपियार्ड सुद्धा आहेत आणि देशासाठी त्यांनी जॅवलिन थ्रो मध्ये काही पुरस्कार ही मिळवले आहेत.