Home » डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आरोप लावणारी डेनियल्स कोण?

डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आरोप लावणारी डेनियल्स कोण?

by Team Gajawaja
0 comment
Stromy Daniels
Share

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि लैंगिक शोषणाचे आरोप. हे काही नवे नाही. २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीदरम्यान डोनाल्ड ट्रंप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये सुद्धा तीन महिलांनी एका पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आरोप लावले की, त्यांनी त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणूका होणार आहेत. अशातच ट्रंप यांच्यावर एका पॉर्न स्टार सोबत संबंध ठेवले आणि गप्प राहण्यासाठी तिला पैसे दिल्या प्रकरणी नवा वाद सुरु झाला आहे. (Stromy Daniels)

जर ट्रंप या प्रकरणी दोषी ठरल्यास तर हे अशाप्रकारचे पहिलेच प्रकरण असेल. यापूर्वी ते आता पर्यंत कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी अपराधिक आरोपांचा सामना केलेला नाही. एका टेलिव्हिजन इंटरव्यूमध्ये डेनियल हिने असे सांगितले की, कशा पद्धतीने ट्रंप यांनी तिला आधी आपली मुलगी म्हटले आणि नंतर तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले.

लैंगिक शोषण आणि नंतर प्रकरण लपवण्यासाठी पैसे दिल्याच्या आरोपाखाली डोनाल्ड ट्रंप यांच्या डोक्यावर अटकेची तलावर आहे. खरंतर ही सामान्य बातमी आहे. परंतु खरी गोष्ट अशी की ज्या डेनियलमुळे ट्रंप संकटात आहेत ती चौथे लग्न करुन आपले आयुष्य आनंदाने घालवत आहे.

पत्रकार व्हायचे होते डेनियल्सला
स्टॉर्मी डेनियल्स अमेरिकन पॉर्न स्टार आणि स्ट्रिपर आहे. ती एक लेखक-दिग्दर्शक ही आहे. डेनियल्स हिने काही पुरस्कार ही पटकावले आहेत. ती नाइटमुव्स, एवीएन आणि एक्सआरसीओ हॉल ऑफ फेमची मेंबर ही आहे. डेनियल्स एक एवरेज लोअर क्लास परिवारात जन्मलेली. तिच्या घरात कधीच वीजेचे कनेक्शन नव्हते.

१९९७ मध्ये स्टॉर्मीने बॅटन रुजमध्ये स्कॉटलँन्डविल मॅग्नेट हायस्कूलमध्ये आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेव्हा तिला पत्रकार व्हायचे होते. मात्र तसे झाले नाही. वयाच्या १७ व्या वर्षात पहिल्यांदा तिने स्ट्रिपिंग केले. त्यानंतर तिला उत्तम पैसे मिळू लागले आणि पैशांसाठीच ती स्ट्रिपिंग करु लागली.

गुपचुप केले चौथे लग्न
स्टॉर्मी डेनियल्सने जवळजवळ तीन महिन्यांपूर्वी गुपचुत लग्न केले आहे. डेली मेल आणि न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये असे सांगितले की, गेल्या वर्षात डिसेंबर मध्ये अडल्ट फिल्म स्टार बॅरेट ब्लेडसोबत तिने लग्न केले आहे. सोशल मीडियात पोस्ट करत स्टॉर्मी हिने असे म्हटले की, जेव्हा तुम्ही तुमच्या उत्तम मित्राशी लग्न करता तेव्हा आयुष्य ही सुंदर होते. त्या काळात सुद्धा जेव्हा तुम्ही वाईट काळातून जात असाल, मला माझ्या स्वप्नातील घर, आयुष्य आणि परिवार देण्यासाठी बॅरेट ब्लेड याचे आभार. (Stromy Daniels)

डेनियलने पहिल्यांदा २००३ मध्ये पॉर्न स्टार पॅट माइने याच्याशी लग्न केले होते. २००५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोन वर्षानंतर तिने माइक मोजेज उर्फ माइकल मोस्नी याच्याशी लग्न केले. ते लग्न सुद्धा अधिक काळ टिकले नाही. २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर पुन्हा एका पॉर्न स्टार ग्लेंडन क्रॅन सोबत तिसरे लग्न केले. ज्याने ब्रेंडन मिलर नावाने एक सिनेमा केला होता. २०१५ ते २०१८ पर्यंत ते एकत्रित होते पण नंतर त्यांच्या ही घटस्फोट झाला. तिने आता बॅरेड ब्लेडशी चौथे लग्न केले आहे.

हे देखील वाचा- डोनाल्ड ट्रंप यांच्या डोक्यावर अटकेची तलवार

डेनियल्स आणि बॅरेट पहिल्यांदा १९९८ मध्ये भेटले होते. ते पहिल्यांदा एका बारमध्ये भेटले होते. दोघ ही एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. मात्र नुकतेच त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कॅलिफोर्नियात जन्मलेला ब्लेड पॉर्न सिनेमांमधील कलाकार असण्यासह एक व्यावसायिक सुद्धा आहे. त्याची एलियनवर्क्स नावाची कंपनी आहे. तो एक सिनेमॅटोग्राफर ही आहे, डेनियल्स सध्या Lawless नावाच्या एका पॉर्न सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. जो ब्लेड शूट करत आहे. बातमीनुसार डेनियल्सने ब्लेड सोबत राहण्यासाठी आपले टेक्सास मधील घर सोडले असून दोघे आता फ्लोरिडा हॉर्स फार्म येथील एका घरात एकत्रित राहत आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.