Stress Management Tips : मॉर्डन लाइफस्टाइल आणि धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण समस्येच्या जाळ्यात अडकला गेला आहे. भलेही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू दिसून येत असेल. पण त्या व्यक्तीच्या खऱ्या आयुष्यात अनेक समस्याही असू शकतात.
अत्याधिक तणावाची स्थिती निर्माण झाल्यास याचा परिणाम तुमच्या कामावरही होऊ शकतो. व्यक्तीसाठी तणाव अत्याधिक तणाव घेणे जीवघेणेही ठरू शकते. मानसिक तणावामुळे पॅनिक अटॅक, डिप्रेशन, एंग्जायटी आणि झोपेसंदर्भात समस्या उद्भवू शकतात. यामुळे स्ट्रेस मॅनेज करणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच पुढील काही टिप्स वापरून तुम्ही तणावाची स्थिती कमी करू शकता.
फिजिकल अॅक्टिव्हिटी
आजकाल व्यक्तींचा संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसून निघून जातो. पण फिजिकल अॅक्टिव्हिटी करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचा आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे दररोज 20-30 मिनिटे व्यायाम किंवा वॉक करावा.
मेडिटेशन
आपल डोकं शांत राहण्यासाठी मेडिटेशन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी दररोज सकाळी एका शांत ठिकाणी बसा आणि डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यावेळी तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तणाव कमी होण्यास मदत होईल.
सोशल मीडियाचा वापर
नेहमीच म्हटले जाते की, सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी नवी गोष्ट शिकणार असाल जी तुमच्या फायद्याची आहे ती आवर्जुन करा. जसे की, ऑनलाइन डान्सिंग, पेंटिंग. (Stress Management Tips)
सकारात्मक विचार करा
आयुष्यातील तणाव कमी करण्यासाठी नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे. जेणेकरुन एखादी समस्या उद्भवली तरीही तुम्ही निराश न होता त्यावर सकारात्मक दृष्टीकोनातून तोडगा काढू शकता.
सेल्फ केअर
पुरेशी झोप, हेल्दी डाएट आणि मानसिक आरोग्य जपणे फार अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घेतली पाहिजे. याशिवाय पौष्टिक आहाराचे सेवन करावे.