Home » Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक

Maghi Ganpati : गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमधील फरक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Maghi Ganpati
Share

येत्या २२ जानेवारी रोजी माघी गणपती अर्थात गणेश जयंती साजरी साजरी होणार आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला श्रीगणेश जयंती, गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनाही ओळखले जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असेही म्हटले जाते. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. (Maghi Ganpati)

गणपतीचा पहिला अवतार वैशाख पौर्णिमेचा आहे. हा दिवस पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा अवतार माघ शुक्ल चतुर्थीचा म्हणजेच गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या दिवशी आवर्जून गणपती अथर्वशीर्ष, श्री संकष्टनाशन गणपतिस्तोत्राचे पठण करावे, असे सांगितले जाते. मात्र माघ महिन्यात येणारी गणेश जयंती आणि भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी यात नक्की काय फरक आहे? (Marathi)

गणेश जयंती साजरी करण्यामागचे कारण
माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी अर्थात गणेश जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हटले जाते. षोडशोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात. या दिवशी ढुंढिराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते. काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते. या संदर्भांचा आधार घेता असे लक्षात येते की, गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे. (Todays Marathi Headline)

Maghi Ganpati

धार्मिक परंपरेनुसार, माघ गणेश जयंती हा गणपतीचा खरा जन्मदिवस आहे. जरी त्याच्या जन्माशी संबंधित अनेक कथा आणि पौराणिक कथा असल्या तरी त्यातील सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे देवी पार्वतीने भगवान गणेशाला जन्म दिला ती कथा. भगवान शिवाच्या अनुपस्थितीत, तिने तिच्या अंगावर चंदनाचा लेप लावून त्यापासून गणेशाची मूर्ती तयार केली आणि आंघोळीसाठी गेली असताना तिच्या संरक्षणासाठी तिने गणेशाला बाहेर पहारा देण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे केले. जेव्हा भगवान शिव तिथे आले आणि त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे भगवान गणेशाशी भांडण झाले. (Top Stories)

रागाच्या भरात शिवाने गणेशाचे मस्तक छाटले. त्यानंतर भगवान शंकराकडे उपाय शोधून श्रीगणेशाला हत्तीचे मस्तक बसवले. भगवान शिवाने आपल्या शक्ती सामर्थ्याने पुन्हा त्याला जिवंत केले. यानंतर भगवान शिवाने पार्वतीला वचन दिले की पृथ्वीवरील इतर सर्व देवतांच्या आधी तिच्या मुलाची अर्थात गणेशाची पूजा केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार गणेश जयंतीला गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता. या दिवशी मध्यान्हात गणेशाची पूजा केली जाते. आणि पौराणिक कथेनुसार, भाद्रपदातील गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येतात. (Top Marathi News)

गणेश चतुर्थी साजरी करण्यामागचे कारण
गाणपत्य सांप्रदायातील महत्त्वाचे पुराण म्हणून गणेश पुरणाची ओळख आहे. हे पुराण ब्रह्मदेवाने व्यासांना, व्यासांनी भृगू ऋषीला आणि भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितले आहे. उपासनाखंड आणि क्रीडाखंड असे या पुराणाचे दोन भाग आहेत. गणेश पुराणानुसार, एक गरीब क्षत्रिय होता. त्याने कुटुंबपोषणासाठी अनेक व्यवसाय केले. पण, त्याला द्रव्यप्राप्ती होत नव्हती, शेवटी संसाराला कंटाळून तो रानात गेला. तिथे त्याला सौभरी ऋषींचे दर्शन झाले. (Latest Marathi Headline)

त्याला श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत गणपतीची आराधना करण्यास सांगितले. त्याने त्याप्रमाणे करताच त्याला संपत्ती आणि संपदा प्राप्त झाली. पुढील जन्मी तो कर्दम नावाचा ऋषी झाला. गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे. गणेश गीतेनुसार (गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय १३८-१४७) भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाची वाहन-आयुधयुक्त मूर्ती तयार करून तिची विधियुक्त पूजा करील आणि सात वेळा गणेशगीता वाचेल त्याला सर्व सुख-संपत्ती मिळेल. (Top Trending News)

=========

Maghi Ganpati : जाणून घ्या माघी गणेशोत्सवाची तारीख, मुहूर्त आणि शुभ तिथी

=========

परंतु, गणेश पुराणानुसार गणपतीचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला नाही. या चतुर्थीला महासिद्धीविनायकी चतुर्थी असेही म्हणतात. यासोबतच याबद्दल अजून आख्ययिका सांगितली जाते, गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी(शुक्ल पक्ष) किंवा संकष्टी चतुर्थी (कृष्ण पक्ष) म्हणूनही ओळखलं जातं. भगवान गणेशाचे त्याच्या दैवी निवासस्थान कैलासपर्वतापासून ते पृथ्वीवर होणारे वार्षिक आगमन म्हणून भाद्रपदातील गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पुराणानुसार, असंही म्हटलं जातं की आपला भाऊ भगवान कार्तिकेयाला भेटण्यासाठी गणेशाने कैलास पर्वत सोडला, जिथे देवी पार्वती आणि भगवान शिव राहत होते, कार्तिकेयाच्या भेटीनंतर ११ दिवसांनी गणेश मूळ घरी परतले. याचीच आठवण म्हणून भाद्रपदात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. (Social News)

(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.