Home » हमासमध्ये स्पंज बॉम्बची दहशत…

हमासमध्ये स्पंज बॉम्बची दहशत…

by Team Gajawaja
0 comment
Hamas War
Share

7 ऑक्टोबर रोजी इस्रायल देशावर हमासच्या अतिरेक्यांनी पाच हजार मिसाईल टाकून हल्ला केला.  त्यानंतर हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश करुन अत्यंत निर्दयपणे इस्रायली नागरिकांची हत्या केली.  या भयानक हल्ल्यानंतर हादरलेल्या इस्रायलनं लगेच हमासवर आक्रमणाची तयारी सुरु केली.  अगदी काही तासातच इस्रायल या देशातर्फे हमासविरोधात युद्धाची घोषणा झाली.  इस्रायल आणि त्यांचे गुप्तदल मोसाद यांच्याबाबत जगभरात आदर आहे.  मोसाद या गुप्तचर संघटनेला माहित नाही, अशी जागा या जगात नाही, असे बोलले जाते. (Hamas War)

मात्र त्याच मोसादला चुकवून हमासनं एवढा मोठा हल्ला केला कसा हा प्रश्न सर्वत्र विचारला जाऊ लागला.  हा हल्ला करुन हमासचे अतिरेकी गायबही झाले.  त्यामुळे हमास नेमकं काय केलं, याची चर्चा सुरु झाली.  मात्र जेव्हा इस्रायलने गाझापट्टीमध्ये हमासविरोधात कारवाई केली तेव्हा हमासचे सर्वात मोठे गुपित जगासमोर उघड झाले.  हे गुपित म्हणजे, हमासनं गेल्या काही वर्षात संपूर्ण गाझामध्ये एक सुसज्ज असे भुयारांचे जाळे पसरले आहे.  या भुयारांमध्ये एकाचवेळी हजारो हमासचे अतिरेकी राहू शकतात.(Hamas War)

याशिवाय यात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा आहे.  वर्षभराचा अन्नधान्याचा साठा आहे,  शिवाय युद्धात ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, अशा सर्वांचा विपुलसाठी या भुयारात आहे. आता युद्ध सुरु केल्यावर ही भुयारेच इस्रायलसाठीच मोठी डोकेदुखी ठरली आहे. पण इस्रायलनं आता या भुयारांवर अत्यंत घातक शस्त्र बाहेर काढलं आहे.  या शस्त्राचं नाव आहे, स्पंज बॉम्ब.  सुरुवातीला एका स्पंजच्या स्वरुपात असणारा हा बॉम्ब नंतर दगडासारखा कठीण होऊन जातो.  मग याला कुठल्याही हत्यारानं, बॉम्बनं तोडता येऊ शकत नाही.  इस्रायलनं असे स्पंज बॉम्ब, हमासच्या भुयारांच्या तोंडावर लावायला सुरुवात केली आहे.  यामुळे हमासचे अतिरेकी भुयारांमध्ये जिवंत गाडले जाणार आहेत.  पण प्रश्न येतोय तो त्यांच्यासोबत असलेल्या घातक हत्यारांचा.  स्पंजबॉम्बमुळे ही हत्यारेही गाडली जाणार आहेत.  त्यामुळे भविष्यात या हत्यारांच्या वर असलेली गाझापट्टी नवा धोकाच ठरणार आहे.  (Hamas War)

हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यासाठी आता इस्रायली सेना पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे.  आधुनिक हत्यारानं सुसज्ज असलेल्या इस्रायली सैन्याला मात्र गाझापट्टीमधील भुयारांनी त्रस्त केले आहे.  मैलोनं मैल पसरलेल्या या भुयारांचा अतिरेक्यांनी लपण्यासाठी आधार घेतला.  तसेच गाझापट्टीत गेलेल्या इस्रायली सैनिकांवरही या भुयारांच्या आधारे हमासनं हल्ला केला आहे.  काही सैनिकांनाही हमासनं या भुयारांमध्ये ओढून नेले आहे.  या भुयारांच्या आधारानं हमासची युद्धात सर्शी होणार असे चित्र असतांनाच इस्रायलनं आपलं हुकमी अस्त्र पुढे केलं आहे.  हे अस्त्र म्हणजे, स्पंज बॉम्ब. (Hamas War) 

गाझा मधील हमासचे अतिरेकी ज्या भुयारांच्या जोरावर इस्रायली सैन्यावर हल्ला करीत आहेत, तिच भुयारे आता बंद करण्यासाठी हे स्पंज बॉम्ब फायद्याचे ठरणार आहेत.  इस्रायल स्पंज बॉम्बच्या माध्यमातून ही भुयारे कायमचे बंद करणार आहे.  हा एक प्रकारचा रासायनिक बॉम्ब आहे.  ज्याप्रमाणे स्पंज असतो, तसाच स्पंज यातून बाहेर येतो.  त्यामुळे त्याचे नावच स्पंज बॉम्ब ठेवण्यात आले आहे.  हा बॉम्ब टाकल्यावर त्यातून फोमच्या स्वरूपात रसायन बाहेर येते. रासायनिक पदार्थ बाहेर आल्यानंतर कुणाला काही समजण्याच्या आधी काही सेकंदात हा फेस दगडासारखा कडक होतो.  यासाठी एक मोठी प्लास्टिकची पिशवी ठेवली जाते.  ही पिशवी उघडताच त्यातच तो फोम अडकून राहतो. (Hamas War)  

या पिशवीतील फोम इतका कडक होतो, त्याला तोडता येत नाही.  अगदी त्यावर मिसाईल टाकलं तरी ते तुटू शकत नाही, असा इस्रायलचा दावा आहे.  इस्रायल आता या स्पंज बॉम्बचा वापर हमासच्या भुयारांवर करत आहे. या स्पंज बॉम्बची अनेक वैशिष्टे आहेत.  त्यातलं एक प्रमुख म्हणजे, त्याचा स्फोट होतो परंतु आवाज येत नाही.  पण त्यातून येणारा फोम अत्यंत घातक असतो.  बोगद्यांवर अशा बॉम्बचा वापर केल्याने ते पूर्णपणे बंद होतील आणि त्यात लपलेले मोसादचे अतिरेकी जिवंत गाडले जातील. (Hamas War)

===========

हे देखील वाचा : ‘नो शेव नोव्हेंबर’ म्हणजे काय माहितेय का ?

===========

अमेरिकन सैन्याने 90 च्या दशकात सोमालियामध्ये दंगलखोरांना रोखण्यासाठी अल्ट्रा स्टिकी फोम बुलेटचा वापर केला. विशेष म्हणजे या गोळ्यांमधून निघणाऱ्या फेसामुळे दंगलखोरांचे हात-पाय स्थिर झाले होते. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली.  आता हमासमध्ये शेकडो किलोमीटर लांब आणि 80 मीटरपर्यंत खोल भुयारांचे जाळे या स्पंज बॉम्बच्या आधारानं बंद करण्यात येणार आहेत.  मात्र हे करतांना अतिरेक्यांसोबत त्यांची घातक हत्यारेही गाडली जाणार आहेत.  ही हत्यारे भविष्यासाठी घातकी ठरणार आहेत.  त्यामुळेच जगभरात अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.