तुम्ही कोणत्याही इंटरनेट डिवाइसचा वापर करत असाल तर वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट करण्याची गरज भासते. तुम्ही ते अपडेट सुद्धा करत असाल. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का, अखेर या डिवाइसमध्ये सॉफ्टवेअर अपडेटची काय भुमिका असते? खरंतर, सॉफ्टवेअरची सिक्युरिटी, कार्यक्षमता, कस्टमाइजेशन आणि एकूणच क्वालिटी सुनिश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेटची गरज असते. सॉफ्टवेअरला नियमित रुपात अपडेट केल्याने समस्यांवर सोडवल्या जातात, नव्या सुविधा मिळतात आणि डेव्हलप होत असलेल्या टेक्नॉलॉजीची माहिती सुद्धा मिळते. सध्या वेगाने बदलत चाललेल्या टेक्नॉलॉजीमुळे दररोज नवे नवे अपडेट्स युजर्सला उपलब्ध करून दिले जातात. (software update)
-सिक्युरिटी
सॉफ्टवेअर अपडेट गरजेचे असण्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सिक्युरिटी संदर्भातील त्रुटी दूर करणे, जसा-जसा सॉफ्टवेअरचा वापर आणि टेस्ट युजर्सद्वारे केला जातो त्यामुळे संभाव्य रुपात यामधील त्रुटींबद्दल कळते. हॅकर्स याच त्रुटींचा फायदा घेत सिस्टिम पर्यंत अनऑथोराइज्ड एक्सेस मिळवतात, डेटा चोरू शकतात. अथवा दुसऱ्या प्रकारे नुकसान पोहचवू शकतात. सॉफ्टवेअर अपडेट मध्ये नेहमीच पॅचचा समावेश असतो, जो या त्रुटींना ठीक करतो आणि सॉफ्टवेअरची सुरक्षितता मजबूत करतो.
-बग फिक्स
कोणताही सॉफ्टवेअर बग किंवा त्रुटी पूर्णपणे काढून टाक नाही. युजर्सला सॉफ्टवेअरचा वापर करतेवेळी येणारा बग आणि समस्यांबद्दल रिपोर्ट करतात आणि डेव्हलपर्स अपडेटच्या माध्यमातून या समस्या ठिक करण्यासाठी काम करतात. बग फिक्स सॉफ्टेअरची स्थिरता, विश्वसनीयतेत सुधारणा करू शकतात.
-युजर एक्सपीरियंस
डेव्हलपर्स युजर्सच्या गरजा आणि प्राथमिकता समजून घेण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडून फिडबॅक मिळवतात. अपडेटचा वापर त्या बदलावाला लागू करण्यासाठी केला जाऊ शकतो, जो युजर्सला उत्तम अनुभव देईल.
-युजर्सची प्रतिक्रिया
डेव्हलपर्स नेहमीच आपल्या सॉफ्टवेअरला रिफाइंड करण्यासाठी युजर्सच्या प्रतिक्रियेचा वापर करतात. अपडेट युजर्स द्वारे रिक्वेस्ट करण्यात आलेल्या बदलावाला लागू करण्याचा एक पर्याय आहे, ज्यामुळे सॉफ्टवेअरकडून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात मदत होईल. (Software update)
हेही वाचा- इंटरनेटशिवाय तुम्ही करू शकता अधिक पैशांचे ट्रांजेक्शन
-रेग्युलेटरी कम्प्लायंस
सॉफ्टवेअरचे बदलेले नियम, इंडस्ट्री स्टँन्डर्ड किंवा कायदेशीर गरजांचे पालन केले आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी सॉफ्टवेअर अपडेटची गरज असू शकते. जसे-जसे सॉफ्टवेअर डेव्हलप होते, काही सुविधा युजर्सला मिळतात. सॉफ्टवेअर अपडेट डेव्हलपर्सला युजर्सच्या समोर येणाऱ्या समस्या रिमोटने सॉल्व करण्यास सक्षम बनवू शकतो.