युनाइटेड नेशनची सायन्स आणि कल्चर एजेंसी युनेस्कोने असे म्हटले आहे की, विद्यार्थ्यी शाळेत स्मार्टफोन वापरत असतील तर त्यावर बंदी घालावी. युएनने असे म्हटले आहे की, वर्गात मुलांचे दुर्लक्ष आणि डिजीटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्याऐवजी फेस टू फेस टीचिंग लर्निंग प्रोसेसवर लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ असा होतो की, युनेस्कोने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन वापराबद्दलची ही गोष्ट अयोग्य मानली आहे. (Smartphone use)
युनेस्कोने मुलांच्या शिक्षणासाठी डिजीटल लर्निंग संदर्भात पॉलिसी बनवणाऱ्यांना असा इशारा दिला आहे, असे गरजेचे नाही की प्रत्येक बदल हा फायदेशीर असेलच. मात्र जर एखादी गोष्ट होण्यासारखी असेल किंवा आपण ती करु शकतो तर असे गरजेचे नाही की ती आपण करावी. त्या ऐवजी आपण अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला फायदा होईल. युनेस्कोने पॉलीसी तयार करणाऱ्यांना शिक्षणाच्या सोशल पैलूंवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
प्रत्येक मुलाच्या हातात दिसतोय मोबाईल
अंकुरा हॉस्पिटल द्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेत 186 मुलांना सहभागी करण्यात आले. यामध्ये शंभर टक्के मुलं ही 3-5 वयोगटातील, 6 ते 10 वयोगटातील आणि 11-15 वयोगटातील होती. या सर्वेत असे समोर आले की, प्रत्येक एज ग्रुप मधील मुलं आपल्या स्क्रिन टाइमच्या मर्यादेपक्षा अधिक वेळ इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालवत आहे.
मुलांमध्ये अधिक स्क्रिन टाइम
या सर्वेत असा खुलासा झाला की, मुलं इलेक्ट्रॉनिक डिवाइसवर गेम खेळणे, अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ घालवतात. परंतु पीडियाट्रिशियन यांनी सांगितल्या गेलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ आहे. 3-5 वयोगटातील 45 टक्के मुलं अभ्यास करताना इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करतात. 6-10 वयोगटातील आणि 11-15 वयोगटातील 48 आणि 39 टक्के मुलं सुद्धा असेच करतात. डिवाइसवर सातत्याने येणारे नोटिफिकेशन, सोशल मीडिया आणि एंटरटेनमेंट कंटेटमुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाहीयं. हा सर्वे पुण्यातील हॉस्पिटल द्वारे करण्यात आला होता. (Smartphone use)
या देशात स्मार्टफोनवर बंदी
काही देशांमधील शाळेत मुलांच्या स्मार्टफोनव वापरावर बंदी घातली गेली आहे. फ्रांन्समध्ये आधीपासूनच अशी एक पॉलिसी आहे जी 2018 मध्ये लागू करण्यात आली होती. नेदरलँन्ड मध्ये सुद्धा 2024 मध्ये अशी पॉलिसी लागू केली जाऊ शकते.
डचच्या एज्युकेशन मिनिस्टर यांनी असे म्हटले आहे की, मुलांनी अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी काही पर्याय शोधले पाहिजेत. मात्र स्मार्टफोनच्या कारणास्तव तसे होत नाहीयं. मोबाईलमुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे मुलांना यापासून दूर ठेवले पाहिजे. युके मधील सरकारकडून सुद्धा मुलांना शिस्त लागावी म्हणून मोबाईल फोनवर बंदी घालण्याची तयारी करत आहे.
हेही वाचा- सोशल मीडियात मुलांचे फोटो-रिल्स शेअर करताय तर व्हा सावध
पालकांनी काय केले पाहिजे?
सर्वात प्रथम तुम्ही मुलांसाठी स्क्रिन टाइमसाठी मर्यादा ठेवली पाहिजे. त्यांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन केले पाहिदे. मुलांना फार वेळ फोन वापरण्यास देऊ नका. या व्यतिरिक्त त्यांना दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.