उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच उन्हात घरातून बाहेर पडल्यानंतर त्वचा काळवंटते. खरंतर कडक उन्हामुळे त्वचा टॅन होते. यामुळे चेहऱ्याचा ग्लो ही निघून जातो. खरंत टॅन पासून सुटका मिळवण्यासाठी पार्लर मध्ये ही तुम्ही जाऊ शकता. मात्र पार्लरमध्ये काही वेळेस केमिकल युक्त ट्रिटमेंट केली जाते. अशातच आम्ही तुम्हाला टॅनिंग काढण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ते नियमित केल्यास तुमच्या त्वचेवरील टॅनिंग कालांतराने कमी होईल. (Skin Care Tips)
दूध आणि केळ्याचा फेस पॅक
दूध आणि केळ्यापासून तयार करण्यात आलेला फेस पॅक तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर करु शकतो. यामुळे चेहऱ्यावर ग्लो टिकून राहतो आणि तुमची त्वचा कोमल होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक पिकलेले केळ घ्यायचे आहे आणि ते दूधासह मिक्स करत पेस्ट तयार करायची आहे. ही पेस्ट व्यवस्थिती चेहऱ्यावर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर चेहरा हा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
बेसन आणि एलोवेरा जेल
बेसन आणि एलोवेराचा फेस पॅक सुद्धा टॅनिंग कमी करण्यासाठी उपयोगी मानली जाते. बेसन आणि एलोवेरा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वात प्रथम अर्धा कप बेसन घ्या आणि यामध्ये दोन-तीन चमचे एलोवेरा जेल मिक्स करुन त्याचा पॅक अर्धा तास ठेवावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.
हळद आणि मध, एलोवेरा फेस पॅक
टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी चिमुटभर हळद घेऊन त्यात एक चमचा मध आणि एलोवेरा जेल एकत्रित करा. याची एक पातळ पेस्ट तयार करा. पेस्ट तयार केल्यानंतर ही चेहऱ्यासह मान आणि हाताला लावा. ती पेस्ट २० मिनिटांपर्यंत ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. तुमची त्वचेवर ग्लो आलेला तुम्हाला दिसेल.
मुल्तानी माती आणि एलोवेरा
त्वचेवरील टॅनिंग काढायचे असेल तर तुम्ही मुल्तानी माती, एलोवेरासह गुलाब पाणी वापरा. या सर्व गोष्टी एकत्रित करुन त्याचा पॅक बनवा. त्वचेची चमक वाढवण्यासाठी मुल्तानी मातीचा वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. हा एक नैसर्गिक उपाय आहे. हा पॅक तयार करुन आठवड्यातून एकदा तरी टॅन झालेल्या त्वचेवर लावा.
टॅन त्वचेसंदर्भात विचारले जाणारे प्रश्न
सन टॅन जाण्यासाठी किती वेळ लागतो?
सन टॅन कमी होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागतात. मात्र तुम्ही वरील घरगुती उपायांनी सन टॅन दूर करु शकता. पण आठवड्यातून एकदा तरी पॅक हे टॅन झालेल्या त्वचेवर जरुर लावले पाहिजेत. (Skin Care Tips)
हे देखील वाचा- तुम्हाला ‘हा’ त्रास असेल तर नक्की कढीपत्त्याचा करा वापर…
सनस्क्रिनमुळे त्वचा टॅन होत नाही?
सनस्क्रिन ही त्वचेला सुर्याच्या हानिकारक किरणांपासून दूर ठेवते. पण ती सुद्धा एका मर्यादित वेळेपर्यंतच. टॅनिंग पासून दूर राहण्यासाठी तुम्ही प्रत्येक तीन ते चार तासांनी सनस्क्रिन लावली पाहिजे. पण काही वेळेस असे ही होते की, सनस्क्रिन लावल्यानंतर ही तुमची त्वचा टॅन होऊ शकते. अशातच तुम्ही टॅनिंग घालवण्यासाठी वरील उपाय वापरु शकता. लक्षात ठेवा जर काही घरगुती उपायांनी तुम्हाला एलर्जी किंवा पुरळ येण्यास सुरुवात झाली तर त्याचा वापर करणे थांबवा. अशातच त्वचेसंदर्भातील तज्ञांच्या सल्ल्याने उपाय करा.