हिंदू धर्मात श्रावणाचा महिना हा शंकराला समर्पित केला जातो. यंदा श्रावण १८ जुलैपासून सुरु होणार आहे. शंकराला त्रिदेवांपैकी एक मानले जाते आणि श्रावण महिन्यात शंकराची पूजा-अर्चना मोठ्या भक्तीभावाने केली जते. श्रावण महिन्यात शंकराची मनापासून केलेली उपासना आणि उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.अशातच भारतातील शंकराची अशी काही मंदिर आहेत जेथे तुम्ही यंदाच्या श्रावण महिन्यात दर्शन घेऊ शकता. खरंतर ही प्राचीन मंदिर आपल्या भव्यतेसाठीचनव्हे तर परदेशातील पर्यटकांसाठी सुद्धा आकर्षणाचा बिंदू आहेत. (Shravan 2023)
-अमरनाथ गुहा (कश्मीर)
अमरनाथ गुहा ही बाबा बर्फानी नावाने सुद्धा ओळखली जाते. जी कश्मीरच्या बर्फाच्छादित घाटांमध्ये आहे. येथील सर्वाधिक मोठी विशेषता अशी की, येथे नैसर्गिक पद्धतीने बर्फाचे शिवलिंग तयार होते. पौराणिक कथांनुसार या गुहेत शंकराने माता पार्वतीला अमर कथा ऐकवली होती. त्या दरम्यान कबुतरांच्या जोड्याने सुद्धा ती कथा ऐकली होती.आज सुद्धा ते जोडपे भाविकांना पहायला मिळते.
-सोमनाथ मंदिर (गुजरात)
गुजरातच्या सौराष्ट्र येथे असलेले सोमनाथ मंदिर देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराचा उल्लेख महाग्रंथांमध्ये सुद्धा केलेला आहे. या मंदिराचे बहुतांशवेळा पुर्ननिर्मिती करण्यात आलेली आहे. पौराणिक कथांनुसार चंद्रदेवांनी येथे भगवान शंकराची आराधना केली होती, ज्यांना सोम अशा नावाने ओळखले जाते. त्याच कारणास्तव या ठिकाणाचे नाव सोमनाथ असे पडले. हे मंदिर समुद्र किनाऱ्यापासून काही दूरवर आहे. याच कारणास्तव त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
-भोजपुर मंदिर (मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यकील बेतवा नदीजवळ असलेले भोजपुर शिव मंदिर आपल्या अपूर्ण निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. हे येथील सर्वाधिक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराल एक मोठे शिवलिंग सुद्धा आहे. त्याची निर्मिती एका पर्वतातून केली गेली आहे. त्याची उंची जवळजवळ १८ फूट आहे. आपल्या आकारामुळेच हे शिवलिंग फार प्रसिद्ध आहे.
–महाकालेश्वर मंदिर (मध्य प्रदेश)
मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये असलेले महाकालेश्वर मंदिर आपल्या भव्य भस्म आरतीसाठी देशात-विदेशात फार प्रसिद्ध आहे. महाकाल नगरीत हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिरात शिवलिंगाचा श्रृंगार स्मशानातून आणल्या गेलेल्या राखेपासून केला जातो. श्रावण महिन्यात शंकराला समर्पित या मंदिराचे दर्शन केल्याने तुम्ही अधिक प्रसन्न झाल्यासारखे होता. (Shravan 2023)
–अन्नामलाई मंदिर (तमिळनाडू)
तमिळनाडू मधील अन्नामलाई स्थित मंदिर आपल्या उंची आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी भगवान शंकराने ब्रम्ह देवाला श्राप दिला होता. या मंदिराच्या भव्य परिसरात चार भव्य प्रवेशद्वार आहेत. ज्यांना गोपरम नावाने ओळखले जाते. मंदिराची स्थापना चोल वंशाच्या शासनकाळात झाली होती. त्याची पुर्ननिर्मिती अन्य शासकांच्या द्वारे केली गेली. प्रत्येक पौर्णिमेलाया मंदिरात जत्रेचे आयोजन केले जाते.
हेही वाचा- उत्तराखंडातील गोपीनाथ मंदिर झुकल्यानं खळबळ…
-त्र्यंबकेश्वर मंदिर (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील नाशिक पासून जवळजवळ ३० किमी दूरवर गोदावरी नदीजवळ त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर काळ्या खडकापासून तयार करण्यात आलेले आहे. या मंदिराची निर्मिती पेशवा बालाजी बाजीराव यांनी केली होती.