हिंदू धर्मात प्रत्येक समाजाच्या विविध परंपरा आहेत. मात्र भगवान शंकराची पूजा ही हिंदूंकडून फार मोठ्या भक्तिभावाने केली जाते. मात्र आपण सर्वांनी ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग बद्दल ऐकले असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दूध, जल, पाणी, फूल वाहिले जाते. ज्योतिर्लिगाची पुजा केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ति होती. बहुतांश लोकांना वाटते की, ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग हे दोन्ही एकच असतात. मात्र असे नाही आहे. या दोघांमध्ये फार मोठे अंतर आहे. तर जाणून घेऊयात ज्योतिर्लिंग आणि शिवलिंग मधील फरक नक्की काय आहे. (Shivlinga-Jyotirlinga Difference)
ज्योतिर्लिंगाची कथा
शिवपुराणातील एका कथेनुसार ब्रम्हाजी आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये यावरुन वाद झाला होता की, या दोघांमध्ये मोठं कोण? या वादावर तोडगा काढण्यासाठी भगवान शंकर हे एक मोठ्या ज्योति स्तंभाच्या रुपात प्रकट झाले आणि त्यामुळे या दोघांना ते असाह्य झाले. अशातच त्यांच्या भ्रमाचा नाश झाला. याच ज्योति स्तंभाला ज्योतिर्लिंग असे म्हणतात. लिंगाचा अर्थ प्रतीक होतो. त्यामुळेच ज्योतिर्लिंग देवाच्या ज्योतिच्या रुपात प्रकट होण्यासह सृष्टीच्या निर्माण करण्याचे प्रतीक आहे.
ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगमधील अंतर
ज्योतिर्लिंग ही आपोआप प्रकट होतात. शिवलिंग ही मानवनिर्मित किंवा स्वयंभू सुद्धा असू शकतात. हिंदू धर्मात एकूण १२ ज्योतिर्लिंग आहेत त्याबद्दल ही सांगण्यात आले आहे.
हे देखील वाचा- २६४ वर्षांपूर्वी प्लासी युद्धानंतर ‘अशा’ पद्धतीने सुरु झाली होती बंगाल मध्ये पहिल्यांदा दुर्गा पूजा
१२ ज्योतिर्लिंगांची नावे
आज ज्योतिर्लिंग आहेत त्याची नावे पुढीलप्रमाणे- सोमेश्वर किंवा सोमनाथ, श्रीशैलम मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ महादेव, नागेश्वर महादेव, रामेश्वरम आणि घुष्मेश्वर सारखे भव्य मंदिर उभारण्यात आली आहेत. सोमनाथला प्रथम ज्योतिर्लिंग मानले जाते आणि ते गुजरात येथे स्थित आहे.(Shivlinga-Jyotirlinga Difference)
तर सोमनाथ ज्योतिर्लिंगाला पौराणिक महत्व आहे. हे शिवलिंग चंद्राने स्थापन केले होते आणि ज्योतिर्लिंगाची पुजा करुन शंकराची कृपा मिळवली होती. जेणेकरुन प्रजापतिच्या श्रापापासून बचाव करता येईल. याला पापानाशक धाम अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. तसेच तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग ब्रम्हगिरी पर्वतावर आहे. येथूनच गोदावरीचा उगम होतो. गोदावरीला पाच पवित्र नद्यांपैकी एक मानले जाते. असे मानले जाते की, गोदावरी व गौतम ऋषिंच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन शंकर या शिवलिंगाच्या रुपात येथे विराजमान झाले होते.