Home » श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागील वैज्ञानिक कारण माहितेय?

श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागील वैज्ञानिक कारण माहितेय?

येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार असणार आहे. श्रावणात बहुतांशजण मांसाहार करणे टाळतात. अखेर श्रावण महिन्यात मांसाहार न करण्यामागील वैज्ञानिक कारण काय हे जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Shravan 2024
Share

Sharavan 2024 : श्रावण महिना सुरु झाला की, भगवान शंकराची पूजा केली जाते. हिंदू धर्मात श्रावण महिना शुभ असण्यासह या काळात केल्या जाणाऱ्या पूजा-प्रार्थनेला फार महत्व असते. यामुळेच काहीजण श्रावणात मांसाहार करणे टाळतात. पण श्रावणात मांसाहार न करण्यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेऊया…

श्रावण महिन्याचे महत्व
श्रावण महिना भगवान शंकरला समर्पित असतो. श्रावणातील प्रत्येक सोमवार खास मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. हिंदू धर्मात भगवान शंकराचे स्थान देवांचे देव म्हणून आहे. अशातच मांसाहर न करण्यामागील कारण पाहूया…

श्रावणात मांसाहार न करण्यामागील कारण
-श्रावणात महिन्यात बहुतांशजण धार्मिक कारणास्तव मांसाहार करत नाही. पण वैज्ञानिक कारणही यामागे आहे. खरंतर पावसाळ्यात वातावरणात दमटपणा अधिक वाढला जातो. यामुळेच फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला जातो. खाण्यापिण्याच्या वस्तू लवकर खराब होऊ लागतात. कारण पावसाळ्यात पुरेसा सुर्यप्रकाश मिळत नसल्याने असे होते.

-वातावरणात आद्रता अधिक वाढली जाते. यामुळे पचनक्रिया मंदावली जाते. अशातच मांसाहार केल्यास ते पचवण्यास वेळ लागतो. पदार्थ व्यवस्थितीत न पचल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे फुड पॉइजनिंगचा धोका वाढला जातो.

-पावसाळ्यात किटक-किड्यांचे प्रमाण वाढले जाते. याशिवाय चिकनगुनिया, डेंग्यूसारखे आजारही फैलावले जातात. याचा परिणाम व्यक्तीसह जनावरांवरही होतो. यामुळेच मांसाहार करणे टाळले जाते. (Sharavan 2024)

-पावसाळ्यात पाणी दूषित असते. याचा परिणाम मासे यांच्यावर होते. यामुळेच पावसाळ्यास मासे खाल्ले जात नाहीत.

-श्रावणाच्या काळात मसे, पशू आणि पक्षांचा प्रजननाचा काळ असतो. अशातच मांसाहारही केला जात नाही.


आणखी वाचा :
चारकोलच्या मदतीने किचनमधील या वस्तू करता येतील स्वच्छ
भारतातील या ठिकाणी फिरण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्था होते फुकटात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.