Home » वैज्ञानिकांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती…

वैज्ञानिकांनी तयार केली इलेक्ट्रॉनिक माती…

by Team Gajawaja
0 comment
Scientists
Share

शेतीचे उत्पादन हे शेतात माती कशी आहे, यावर अवलंबून असते.  माती जर सुपीक असेल तर भरघोस उत्पादन होतं.  मात्र आता या मातीलाच बाद करत वैज्ञानिकांनी इलेक्ट्रॉनिक प्रकारची माती तयार केली आहे.  ही माती म्हणजे, कमी जागेत जास्त पिक पिकवण्याचे साधन असल्याचे मानले जाते.  या इलेक्ट्रॉनिक मातीचा वापर करत इमारतींच्या छतावर किंवा घराच्या अंगणातही शेती करता येणार आहे.  इलेक्ट्रॉनिक माती  हा एक प्रकारचा थर आहे.  याचा वापर करुन कमी दिवसात जास्त शेती उत्पादन काढता येईल, अशी हमी वैज्ञानिक (Scientists) देत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यापद्धतीचा वापर करण्यात आला होता. आता त्यावर अधिक संशोधन करुन शेतक-यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  यामुळे अवेळी हवामानाच्या तडाख्यात सापडणा-या शेतपिकांना वाचवता येणार आहे. 

सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. पण या तंत्रज्ञानाच्या युगाचा फटका शेतजमिनीला बसला आहे.  शेतजमिनींचा कस जास्त खतांचा वापरुन कमी होत आहे.  अशा जमिनीची मग विक्री बांधकामासाठी करण्यात येत आहे.  एकीकडे जगभरात लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे.  अशावेळी अन्नधान्याची गरज वाढत असतांना शेतजमिनीच्या अभावी शेती उत्पादन कमी होत आहे. परिणामी महागाई वाढत आहे.  यासर्वावर आता एक प्रभावी साधन आलं आहे, ते म्हणजे, इलेक्ट्रॉनिक माती.  हा एक प्रकारचा थर आहे.  या इलेक्ट्रॉनिक मातीच्या थराचा वापर करत धान्यउत्पादन केल्यास  अवघ्या 15 दिवसांत 50 टक्क्याहून अधिक पिके तयार होतात, असा दावा शोधकर्त्यांनी केला आहे.  (Scientists)

अर्थातच या इलेक्ट्रॉनिक मातीचा आणि शेतातील मातीचा काहीही संबंध नाही.  मातीशिवाय शेती करण्याच्या या तंत्राला हायड्रोपोनिक्स म्हणतात. हे तंत्रज्ञान आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वापरण्यात आल आहे. यामध्ये खनिजे, पाणी आणि वाळूचा वापर पिकांसाठी केला जातो. हायड्रोपोनिक्समध्ये खनिज पोषक द्रावणाच्या साहाय्याने पिके घेतली जातात आणि या तंत्राने कुठेही पिके घेता येते. हे इलेक्ट्रॉनिक मातीचे तंत्रज्ञान स्वीडनच्या लिंकोपिंग विद्यापीठाने शोधून काढले आहे.(Scientists)

जगभरात लोकसंख्या वाढत आहे. हवामान बदलाची समस्याही आहे.  या बदलत्या परिस्थितीनुसार शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करणे गरजेचे आहे, हे साध्य समोर ठेऊनच स्विडनच्या विद्यापीठात यासंदर्भात संशोधन सुरु आहे.  त्यातीलच इलेक्ट्रॉनिक माती हा एक यशस्वी प्रयोग ठरला आहे.  सध्या प्रायोगित तत्वावर जरी या मातीचा वापर सुरु असला तरी, हे तंत्रज्ञान जगभरातील सर्वच शेतक-यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.  शिवाय मोठ्या सोसायट्या, बंगले,  सार्वजनिक उद्याने येथेही या तंत्रज्ञानाचा वापर करुन अल्प प्रमाणात का होईना, पण शेती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  

शहरी भागात या हायड्रोपोनिक पद्धतीने शेती उत्पादने घेता येणे अधिक लाभदायक ठरणार आहे.  विशेष म्हणजे या प्रकारची शेती बंद ठिकाणी करता येणार आहे, आणि त्यासाठी  पाण्याचा वापरही कमीत कमी लागतो.  ग्लोबल वॉर्मिंगच्या या काळत हे इलेक्ट्रॉनिक मातीचे  तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. 

=============

हे देखील वाचा : शून्य रूपयाच्या नोटेबद्दल तुम्ही ऐकलंय का? 5 वर्ष चलनात वापरली होती ही नोट! 

=============

हा इलेक्ट्रॉनिक मातीचा थर कसा काम करतो, हे जाणणेही उत्सुकतेचे आहे.  हा मातीचा थर प्रकाशाच्या मदतीने उत्तेजित केला जातो. प्रकाशाच्या साहाय्याने पिकाच्या पृष्ठभागाला अधिक पोषण मिळते आणि पिकाची मुळे जलद गतीने सक्रिय होतात.  त्याचा फायदा असा होतो की, त्यामुळे पिकाची वाढ लवकर होते.  या तंत्रज्ञानाचा अजून एक फायदा म्हणजे,  शेताच्या एका पट्ट्यात एकाचवेळी अनेक प्रकारची उत्पादने घेत येऊ शकतात.  तंत्रज्ञानाच्या मदतीने, हा हायड्रोपोनिक्स सेटअप उभारला की, एकाच ठिकाणी अनेक प्रकारची पिके घेता येऊ शकतात.  हा सेटअप एकदा उभारण्याचा फक्त खर्च होतो.  त्यानंत या सेटअपवर वर्षभर तरी धान्य उत्पादन घेतले जाऊ शकते.  त्यामळे शेती उत्पादनावरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचतही होणार आहे, आणि त्यातून मिळणा-या फायद्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.   

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.